उत्तराखंड कॉलिंग — "ताल" से "ताल" मिला (भीमताल, सातताल, नौकुचियाताल)

Submitted by जिप्सी on 24 May, 2011 - 00:23

भाग १:
देवभूमी उत्तराखंड कॉलिंग — नानकमत्ता साहिब (खटिमा)
http://www.maayboli.com/node/25900

भाग २:
उत्तराखंड कॉलिंग — झील के उसपार "नैनिताल"
http://www.maayboli.com/node/25944

===============================================
===============================================
भीमताल
नैनितालची भटकंती करून आम्ही निघालो ते भीमताल या कुमाँऊ प्रदेशातील सर्वात मोठ्या तलावाकडे. नैनितालहुन साधारण २२ किमी अंतरावर भीमताल आहे. जसे आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे हलद्वानीहुन एक रस्ता भवालीमार्गे नैनितालला जातो त्याच रस्त्यावर भीमताल आहे. येथुन हलद्वानी साधारण ४०-४५ मिनिटावर आहे. समुद्रतळापासुन १३७०मी उंचीवर हे तळं आहे. काहि लोकं म्हणतात कि वनवासाच्या दरम्यान भीम येथे थांबला होता आणि त्यानेच आपल्या गदेच्या प्रहाराने या तलावाची उत्पत्ती केली. तर काहिंच म्हणणे "भीमकाय" आकार असल्याने या तलावाचे नाव "भीमताल" पडले आहे. :-). येथुनच "गोला" नदीचा उगम होतो जी पुढे काठगोदामला "रामगंगा" नदीला जाऊन मिळते. येथे एक छोटेसे धरणही बांधले आहे जे जवळपासच्या गावच्या शेतीसाठी उपयुक्त ठरले आहे. मुंबई-पुण्यात शोधत असलेलो "नीलमोहर" (जॅकरांदा) येथे मात्र डोळेभरून पाहता आला. भीमतालात पडलेली जॅकरांदाची फुले मन मोहुन घेत होती. भीमताल, नौकुचियाताल, सातताल आणि हनुमानगढीची सफर करताना आभाळ भरून आले होते आणि शेवटी पावसाने आम्हाला गाठलेच. त्यामुळे मनासारखे फोटो काढता आले नाही. Sad

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

===============================================
===============================================
सात ताल
नैनितालहुन सात ताल २२ किमी अंतरावर आहे तर भीमतालपासुन अवघ्या ४ किमी अंतरावर. हा तलाव सात "ताल" मिळुन बनलेला असल्याने याचे नाव "सात ताल". येथे भरपूर हॉटेल्स आहेत आणि तलावाच्या किनारी बसुन थंड हवेत तुम्ही आरामात जेवण करू शकतात. आम्हीही येथेच आमचे दुपारचे जेवण उरकले. Happy येथे निवांत बसण्यासाठी पायर्‍या आणि फिरण्यासाठी एक छोटासा पूलही आहे. बरेच पर्यटक येथे कुमॉऊ पद्धतीचे पेहराव घालुन फोटो काढत होते. (रच्याकने तो "कुमाँऊ" पेहराव, "काश्मिरी" जास्त वाटतं होता. ;-).

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

===============================================
===============================================
नौकुचियाताल
नैनितालपासुन साधारण २८ किमी अंतरावर असलेले एक सुंदर ठिकाण.नऊ किनारे असलेला तलाव म्हणुन नौकुचियाताल आणि याचे नऊ किनारे म्हणजे नवग्रहांचे वास्तव्य. असं म्हणतात कि ज्या कुणाला या तलावाचे नऊ किनारे दिसेल त्याला मोक्षप्राप्ती होते. शोधुन काढुन मला ६ कोने दिसले, म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी अजुन ३ कोने दूरच. Happy नैनितालच्या गर्दीपासुन दूर निवांत अशी हि जागा. नैनीलेकमध्ये असलेली गर्दी टाळुन आम्ही येथेच नौकाविहाराचा आनंद घेतला.

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

===============================================
===============================================
हनुमानगढी
नौकुचियाताल आणि भीमतालच्या वाटेवर असलेले हे हनुमानची भव्य मूर्ती असलेले ठिकाण. येथे वैष्णोदेवीच्या मंदिराची सुंदर प्रतिकृती आहे.

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येतया आभाल Happy

===============================================
===============================================
अशा तर्‍हेने आमची नैनिताल भटकंती पूर्ण झाली. या नैनितालच्या भटकंतीसोबतच सुट्टी नसल्याकारणाने आमच्या दोन मित्रांनी (अमित & प्रीत) यांनी पुढिल भटकंतीपासुन रजा घेतली व मुंबईला परतले. उरलेलो आम्ही चौघे (मी, मेहर, प्रशांत आणि किशोर) राणीखेतच्या दिशेने निघालो.

तळटीप: नैनिताल हि सरोवर नगरी असल्याने वेगवेगळ्या तलावाचे फोटो पाहुन कदाचित तोचतोचपणा (रीपीटेशन) वाटेल, पण प्रत्येक तलावाची कहाणी आणि सौंदर्य वेगवेगळे असल्याने इथे ते फोटो प्रदर्शित करत आहे.

(पुढिल भागात : राणीखेत :-))

===============================================
===============================================

गुलमोहर: 

जिप्स्या हे फोटो दिसतायंत.. Happy
एकसे एक आलेत फोटो. तळ्याचे, आणि जांभळ्या फुलांच्या पाकळ्या पडलेल्या पायर्‍या सुरेख.... सर्वच फोटो एकसे एक आलेत. सगळ्यांनाच एक नंबर... Happy

जांभळ्या फुलांचा फोटो सुरेख... Happy

मला सहज मनात आले.. पूर्वीच्या काळी जेंव्हा इथे पर्यटन नव्हते तेंव्हा किती निवांतपणे मस्त निसर्ग अनुभवता येत असेल नाही... आता कुठेही कधीही जा गर्दी असतेच... Sad

अतिशय सुंदर फोटो...

जॅकरांदाचे सगळेच्या सगळे फोटो खुप आवडले. अगदी पाय-यांपासुन ते शेवटचा फोटो तिथपर्यंत...

पुढचे फोटोही टाक पटापट..

GHD is one of the world’s leading monster headphones engineering, architecture and environmental consulting companies.bose oe Wholly-owned by its people, GHD is focused exclusively on client success.GHD is recognised for its chi nano commitment to sustainable development chi hair dryer, safety and innovation. We care for chi flat iron the wellbeing of our people, babyliss pro straightener communities and the environments in which dr dre headphones we operate. www.newelectroniclife.com .

Marilyn Monroe spoke for women designer shoes all over the world when she said, "I don't know who invented yves saint laurent shoes high heels, but all women owe ysl pumps him a lot!" And, really, ysl booties what's not to love? A pair of high heel pumps can do wonders for your posture, give you that ysl sandals extra boost of confidence, and lengthen your legs like no other shoe.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

पूर्वीच्या काळी जेंव्हा इथे पर्यटन नव्हते तेंव्हा किती निवांतपणे मस्त निसर्ग अनुभवता येत असेल नाही... आता कुठेही कधीही जा गर्दी असतेच...>>>>>>अगदी, अगदी Happy

लेओपर्द, तुमचाही प्रतिसादही आवडला Wink मराठीत असता तर अजुन जास्त आवडला असता Proud

व्वाह.... जॅकरांडाच्या मनमोहक फुलांनी व विशाल जलाशयांच्या फोटोजनी खूप मजा आली. पाण्यातल्या जॅकरांडाच्या गालिच्याला पाहून तर मनात अहाहा झाले!! Happy

मस्त! Happy

जांभळ्या फुलांच्या पाकळ्या पडलेल्या पायर्‍या
अप्रतिम...केवळ अप्रतिम...तळ्यांचे फोटो वर्णन करायला शब्द नाहीत बाबा

आणि तो लिओनार्दो स्पॅम आहे रे...हाकल त्याला इकडून

प्रचि ३ मध्ये जांभळ्या कलरच पायर्यांवर पडल आहे ते की आहे. खाली पाण्यात सुधा तेच दिसत आहे प्रचि ६ मध्ये अप्रतिम आहे. हनुमानाची प्रचि सुधा खूप सुरेख जवळून काढली आहे वाटत.

Pages