Submitted by -शाम on 21 May, 2011 - 10:57
बघ त्याच त्या दिशेने पुन्हा निरोप आला
आई तुझाच बछडा पुन्हा शहीद झाला....
झाली न हौस काही कोर्या सुवासिनीची
अर्ध्यात कुंकवाचा तो चांदवा बुडाला....
पदके तिला कशाला? लुटले अहेव सारे
सन्मान सावरी का उध्वस्त जीवनाला...?
टाके हि सांत्वनाचे तुटतील ऐनवेळी
येतील हुंदके ते उसवीत काळजाला....
आहेत कोण जाणे प्राणी असे कसे ते
ज्यांच्या उरात नाही माया दया कुणाला....
आम्हास संयमाचा आहेच गर्व अजूनी
पोटात दंगली अन् युद्धे उभी उशाला....
माणूस माणसाचा असता इथे शिकारी
शेजार श्वापदांचा होता हवा कशाला?
-- शाम.
गुलमोहर:
शेअर करा
गझलेच्या साच्यात चांगला विषय
गझलेच्या साच्यात चांगला विषय घेतलाय.
माणूस माणसाचा असता इथे शिकारी
शेजार श्वापदांचा होता हवा कशाला?
हा शेर भन्नाट (आणि स्वतंत्रही.. इतर शेर चांगले आहेत. पण स्वतंत्र नसावेत असं दिसतंय )
लब्बा$$$$ड ,... (कोणताही शेर
लब्बा$$$$ड ,...
(कोणताही शेर वेगळा नाही...मुसलसच आहे...आणि रदीफ नसल्याने गैरमुरद्दफ.)
या लब्बाडपणा बद्दल खूप खूप धन्यवाद!
भारी... ग्रेट...!!!
भारी... ग्रेट...!!!
सन्मान आणि युद्धे आवडले..
सन्मान आणि युद्धे आवडले..
मुक्ता, नचिकेत, थँक्यू!
मुक्ता, नचिकेत, थँक्यू!:)
शहीद नावात गझल असल्याने गंडलो
शहीद
नावात गझल असल्याने गंडलो होतो. तुम्ही हिला गझल कुठेच म्हटलेलं नाही. ही कविताच आहे. तेच मला म्हणायचं होतं... ओके.
मुजरा सरकार
मुजरा सरकार