हसायचंय...

Submitted by विशाल कुलकर्णी on 20 May, 2011 - 08:17

आता ठरवलय...
खुप खुप हसायचं
अगदी मनापासून हसायचं !
कधी तुझी आठवण येइल
मग पुन्हा माझ्या कपाळावर
तुझ्या त्या लडिवाळ बटा रेंगाळतील
हलकेच तुझ्या डोळ्यातून ओघळलेला..
एखादा अश्रु माझ्याही गालावर रेंगाळेल...
त्याला हळूवार हातांनी टिपायचं...
जमलंच तर कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात जपायचं,
आता खुप खुप हसायचं.....

कधीतरी वाटेत पुन्हा ते वळण लागेल,
मग आठवेल,
तुझ्या सावलीचा तो मुलायम स्पर्श,
माझ्या हातातुन निसटलेला तुझा रेशमी करपाश
आणि वळणावरून दिसेनासं होताना
तुझ्याही नकळत मागे वळलेली...
तुझी ती ओढाळ, घायाळ नजर
जमलंच तर तिला चुकवायचं... नाहीतर...
आपल्याच नजरेला समजवायचं...
आता खुप खुप हसायचं.....

माझं हसणं हरवलय गं...
तुझ्या पापण्यात अडकलय का?
जरा बघतेस......?

विशाल

गुलमोहर: 

कधीतरी वाटेत पुन्हा ते वळण लागेल,
मग आठवेल,
तुझ्या सावलीचा तो मुलायम स्पर्श,

हा प्रत्येकाचाच अनुभव कदाचित !!!!!................... Happy

क्या बात है
विशाल बाबू ! आप तो गये काम से ...

अब तो कुछ भी नही भाता
बस जुल्फे ही जुल्फे, जुल्फे ही जुल्फे..

धन्यवाद मंडळी !
परवा शाम अन गझलच्या राणी मुखर्जीला भेटलो आणि नकळत कुठलीतरी जुनी विण उसवली गेली आणि थोडासा नॉस्टॅल्जिक झालो खरा..... Proud
किरणभौ, ह्यो बदल लै जुना हे बाप्पा............!

परवा शाम अन गझलच्या राणी मुखर्जीला भेटलो आणि नकळत कुठलीतरी जुनी विण उसवली गेली आणि थोडासा नॉस्टॅल्जिक झालो खरा.....हाहाहा... Lol

आणि वळणावरून दिसेनासं होताना
तुझ्याही नकळत मागे वळलेली...
तुझी ती ओढाळ, घायाळ नजर
जमलंच तर तिला चुकवायचं...

सहीच!

"आणि वळणावरून दिसेनासं होताना
तुझ्याही नकळत मागे वळलेली...
तुझी ती ओढाळ, घायाळ नजर
जमलंच तर तिला चुकवायचं... नाहीतर...
आपल्याच नजरेला समजवायचं...
आता खुप खुप हसायचं....."

..... छानच ..... Happy