कॅरी कल्लोळाच्या निमित्ताने

Submitted by मेधा on 19 May, 2011 - 09:31

वृत्तांत लिहिणारे लिहितील तेंव्हा लिहितील , तो पर्यंत या काही नोंदी :

इन नो पर्टिक्युलर ऑर्डर

कल्लोळात जितक्यावेळा टचकन पाणी आलं लोकांच्या डोळ्यात त्यांनी प्रत्येकांनी दर वेळेस एकेक डाईम ( १० सेंट्स ) मायबोलीला दिल्यास मायबोली डॉनल्ड ट्रंपच्या एम्पायरपेक्षा जास्त गडगंज होईल . एरवी देखील मायबोलीवर रडिवलंत अन टचकन पाणीला एकेक डाईम चार्ज केल्यास मायबोली वॉरेन बफेटला मागे टाकेल .

स्वाती अगदी निरागस, साधी भोळी आहे, तिला कुण्णाकुण्णचंही कुण्णाशीही भांडण झालेलं आवडत नाही

अंजलीने एक क्लटर कंट्रोल लेखमालिका लिहायला हवी. आपल्या घरातील खोल्यांचे फोटो पाठवल्यास तिने (विनामूल्य) डेकोरेशन टिप्स पाठवायचे कबूल केले आहे. त्यांच्या घरातील रंगसंगती अतिशय सुंदर , प्रसन्न आहे.

मसाल्याची देवाणघेवाण / झाडांची- बियांची देवाणघेवाण हे अचूक किनार्‍यावरच्या गटगचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे काय ? वविला, किंवा इतर गटग ने हे महत्वाचे कार्यक्रम झाल्याचे कुठल्याही व्रुत्तांतात वाचले नाहीये.
अंजलीने सगळ्यांकरता मोगर्‍याची रोपं आणून ठेवली होती.

बुवांनी १०-१२ तास गाडी चालवली तरी एकदाही लेनमधून वेव्हर झाली नाही की करकचून ब्रेक्स दाबण्याची वेळ आली नाही. गाडीत चालणार्‍या महत्वाच्या गप्पा लक्षात घेता ड्रायव्हिंगवरचे लक्ष विशेष कौतुकास्पद.

अंजली अन पन्ना येणार असतील तर कुठल्याही गटगच्या होस्ट/ होस्टीण बाईंनी आकाशातील बापाचे धन्यवाद द्यावेत, दोघीही नॉनस्टॉप किचन सांभाळणे , वाढणे , आग्रह करणे, आवरा आवरी करणे करत असतात.

बुवांनी मला कमितकमी सहा वेळा शोनू तुला मार्गारिटा की मोहिटो असे विचारले पण शेवटपर्यंत दोन्ही पैकी काही दिले नाही. नाईलाजाने मी आदित्यच्या स्वर्गावर ड्ल्ला मारला शेवटी.

पुढच्या गटगना बाल मायबोलीकरांचे मॉलिक्यूलर गॅस्ट्रोनॉमीचे प्रयोग आवर्जून ठेवावेत.

गटग अन कल्लो़ळामधे प्रत्येक पाहुण्यांना काहीतरी सौंस्कृतीक आयटेम सादर करण्याची सक्ति असावी. पूर्वतयारीनिशी काही कार्यक्रम सादर केले तर किती झकास होतात हे पुराव्याने शाबीत झालं.

व्हर्जिनिया इज फॉर लव्हर्स - हे पण एका सुरेख द्वंद्व गीतातून शाबीत झालं

मायबोलीमुळे अनेकांना माहेर मिळालं , व्यक्त होण्याची संधी मिळाली, प्रसिद्धी, माहिती, मदत, समव्यसनी मित्र्/मैत्रिणी मिळाले. पण मायबोलीच्या व्यापात वेमांचा वेळ त्यांच्या कन्येला पुरेसा मिळाला नाही. याची अगदी प्रकर्षाने जाणीव झाली. त्याबद्दल आता वाईट वाटून घेण्याव्यतिरिक्त मायबोलीकरांना काय करता येईल ? यापुढे मायबोलीचे कामकाज संभाळणार्‍यांना याच अडचणीतून जावे लागू नये म्हणून आपण काय करू शकतो ?

गटगमधे तोंडं सतत चालू असतात -बडबड तरी नाहीतर खादाडी तरी .

जु जा मायबोलीकर ज्या प्रमाणे वाहत्या बा फ वर ' टोटल' न मागता बोलू शकतात तशाच स्वाती अन पन्ना अधे मधे संभाषणात भाग घेत होत्या, मधेच डुलक्या काढत असल्याने गायब होत होत्या.

किंचीत मायबोलीकर जय यांनी घातलेली कोडी एकदम भन्नाट होती.बरेच मायबोलीकर बराच वेळ विचार करत होते Happy

एका व्यक्तीने ' मी पण मायबोलीकर आहे' म्हटल्यावर चिकार कल्ला झाला. त्यांनी सगळ्यांचा आरडाओरडा थांबल्यावर म्हटले ' मी एकच वाक्य सांगतो मग तुम्ही ओळखा कोण आयडी ते' अन त्यांनी त्यांचं सुप्रसिद्ध वाक्य म्हटल्याबरोबर सगळे मायबोलिकर एकमुखाने ओरडले ....

पण त्यापेक्षा जास्त ड्रामॅटिक मोमेंट ती की जेंव्हा स्वातीने खालिद ला ' खालिद म्हणजे काय ' असे विचारले . त्या धक्क्याने, राष्ट्रीय एकात्मता, डिव्हर्सिटी, सारे भारतीय माझे बांधव इत्यादी आठवून माझ्या हातनं दोन चार ग्रिल चिकनचे तुकडे खालीच पडणार होते. तेव्हड्यात खालिदने पूर्णपणे अँटिक्लायमॅक्टिक स्पष्टीकरण दिले अन माझा जीव भांड्यात पडला. अन ग्रिल्ड चिकन व्यवस्थित सर्व्हिण्ग ट्रे मधे पडले.
आता आठवेल तसं अजून लिहीनच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्लोळात जितक्यावेळा टचकन पाणी आलं लोकांच्या डोळ्यात त्यांनी प्रत्येकांनी दर वेळेस एकेक डाईम ( १० सेंट्स ) मायबोलीला दिल्यास मायबोली डॉनल्ड ट्रंपच्या एम्पायरपेक्षा जास्त गडगंज होईल . एरवी देखील मायबोलीवर रडिवलंत अन टचकन पाणीला एकेक डाईम चार्ज केल्यास मायबोली वॉरेन बफेटला मागे टाकेल .>>>>

ही बिझिनेस आयडिया वेमांना दिलीत का? ते उद्योजक होत आहेत ना? Wink

>>>अंजली अन पन्ना येणार असतील तर कुठल्याही गटगच्या होस्ट/ होस्टीण बाईंनी आकाशातील बापाचे धन्यवाद द्यावेत, दोघीही नॉनस्टॉप किचन सांभाळणे , वाढणे , आग्रह करणे, आवरा आवरी करणे करत असतात>>>

पन्नाचं- अगदी अगदी.

मेधा छान लिहिलेस.

>>>अंजली अन पन्ना येणार असतील तर कुठल्याही गटगच्या होस्ट/ होस्टीण बाईंनी आकाशातील बापाचे धन्यवाद द्यावेत, दोघीही नॉनस्टॉप किचन सांभाळणे , वाढणे , आग्रह करणे, आवरा आवरी करणे करत असतात>>>

इतका भक्कम पाठिंबा असेल तर होस्ट बनायला माझी तयारी आहे. Wink

कल्लोळात जितक्यावेळा टचकन पाणी आलं लोकांच्या डोळ्यात त्यांनी प्रत्येकांनी दर वेळेस एकेक डाईम ( १० सेंट्स ) मायबोलीला दिल्यास मायबोली डॉनल्ड ट्रंपच्या एम्पायरपेक्षा जास्त गडगंज होईल . एरवी देखील मायबोलीवर रडिवलंत अन टचकन पाणीला एकेक डाईम चार्ज केल्यास मायबोली वॉरेन बफेटला मागे टाकेल .>> तसचं आज ह्या नंतर काSSहीSSS वाचायचं नाहीये म्हटल्यास ज्यादा आकार पडेल Proud

सायो, हो वेमांसमोरच हा प्रस्ताव मांडला. त्यावर ते मंद मंद असं स्मित करत असल्याने त्यांच्या मनात काय चालू आहे हे नक्की कळलं नाही Proud

नॉनस्टॉप किचन सांभाळणे , वाढणे , आग्रह करणे, आवरा आवरी करणे करत असतात>> अंजली एक मिनिट स्वस्थ नव्हती. एका वेळेला ४-५ ठिकाणी लक्ष देऊन कामं करत होती.. शेवटी तिला एका आरामात बसलेल्या फोटोसाठी आर्जवं करावी लागली! Happy
मी आपली उगाचच इकडून तिकडे, जमेल तितक्या लगबगीने वावरत होते Proud

गाडीत चालणार्‍या महत्वाच्या गप्पा लक्षात घेता ड्रायव्हिंगवरचे लक्ष विशेष कौतुकास्पद. >>>
नाशकात गाडी चालवायची प्रॅक्टीस आहे त्यांना Happy