Submitted by बागेश्री on 19 May, 2011 - 04:12
घट्ट विण
असलेली नातीही,
कधी ढिली पडतात...
कळवळतो, विव्हळतो जीव!
सतत शस्त्र खाली टाकून
'गरज' आहे, असं सांगण्याची
सवय आडवी येते!!
'आपलचं माणूस' आहे ना?
असा आवाज पुन्हा येतो...
मनाला समजावणं, की
भुलावणं?
वरच्यालाच ठाऊक....!
मग एक 'अस्फूटसं' हास्य,
मन हारल्याची आपली जाणिव...
अन्
जग जिंकल्याचा 'विजयी' भाव
त्याच्या चेहर्यावर.....
नाती अशी टिकतात का?
'एकाच्याच' गरजेखातर??
कळत नाही...
पण;
दरवेळी असंच घडतं खरं.......!!
गुलमोहर:
शेअर करा
आवडली ग प्रत्येकाला वाचताना
आवडली ग

प्रत्येकाला वाचताना आपल्या नात्यांवर लिहीलीय असे वाटेल
थँक्स वर्षे... कित्ती पट्टकन
थँक्स वर्षे...
कित्ती पट्टकन अभिप्राय दिलास!
प्रचंड आवडली.. !! आता
प्रचंड आवडली.. !!
आता प्रत्येक वेळी आपल्याला सांगायला हवयं का की, ही कविता कैच्याकै मधून हलवा असे?
आवडली..
आवडली..
अरे अमित अशा मुक्त छंदातल्या
अरे अमित
अशा मुक्त छंदातल्या कवितांना 'तिकडे' भाव नाही अरे!!
छान आहे कविता...
छान आहे कविता...
छान !
छान !
सही! वो कहते रहें और सुनते
सही!
वो कहते रहें और सुनते रहें हम,
ये रिश्ता निभाने का नुस्खा है शायद!
मस्तच गं बागेश्री. मी तशी
मस्तच गं बागेश्री. मी तशी व्यक्त्-अव्यक्तपणे खुपशा फॅन क्लबात आहे. आता तुझ्यापण क्लबात घे ना, प्लिज.
किती विविध विषयांवर आणि प्रभावी लिहितेस. विनोदी कविता जितकी हसवुन गेली, तेवढीच प्रेमकविता हळवं करुन गेली. आणि वरच्या कवितेतली वेदना पण तितकीच मनाला भिडली. खुपच छान.
क्रांति, क्या बात कही है,
क्रांति,
क्या बात कही है, दोस्त!!
माऊडी,

फॅन क्लब वगैरे काय गं?
तू कौतुक करतेस अन् लिहायला हुरुप येतो हे मात्र १०१% खरं.....
हि कविता या ढमाईने परत काकाक
हि कविता या ढमाईने परत काकाक मध्ये टाकली होती आधी म्हणून राग आला होता.
चुक सुधारल्याबद्दल धन्स. मस्तच आहे कविता !
बागुडी..मस्त मस्त मस्त..
बागुडी..मस्त मस्त मस्त.. जियो
@ विकु.. तुला काय झालं रे रागवायला???
आवडली अशा चांगल्या कविता
आवडली
अशा चांगल्या कविता का.का.क. मधे टाकणे कधी थांबणार गो बाय?
घट्ट विण असलेली नातीही, कधी
घट्ट विण
असलेली नातीही,
कधी ढिली पडतात...
कळवळतो, विव्हळतो जीव!
नाती अशी टिकतात का?
'एकाच्याच' गरजेखातर??
कळत नाही...
पण;
दरवेळी असंच घडतं खरं.......!!
हे कळलं म्हणून आवडलं... त्यांच्या मधली कविता असेल...
(No subject)
वर्षू , मंदार,
वर्षू , मंदार, हितचिंतक

अभिप्राया करिता खूप खूप आभार!!
विशाल आणि आपजिगा
इतूका का राग??
विशाल आणि आपजिगा इतूका का
विशाल आणि आपजिगा
इतूका का राग??
>>>
'एकाच्याच' गरजेखातर??
>>>> यावरुन " प्यारका पंचनामा" पिक्चरचा ट्रेलर आठवला ....
Why you think you are doing some favor to HIM ??
(No subject)
आपजिगा I have never
आपजिगा
I have never mentioned, that "Lead" part in the poem favoring anybody here...
If you have thought so, it may be your angle of understanding the poem!
After all, everyone has a different "Frame of Reference" while living and understanding the things....
सांजसंध्या...
धन्यवाद!!
कवीता मस्त जम्ली आहे.....
कवीता मस्त जम्ली आहे.....
बागेश्री, प्रत्येकाच्या
बागेश्री,
प्रत्येकाच्या मनातलं जसंच्या तसं, शब्दात चपखलपणे उतरवलंस..
कवितेत मांडलेलं, एक जळजळित सत्य आहे पण हे होतंच... फक्त एकाच्या गरजेसारखं..
सुंदर कविता. मग ती कुठेही
सुंदर कविता. मग ती कुठेही असो. ती दरवळतेच.
बागेश्री, यात लीड एक स्त्री आहे. हे स्पष्ट आहे..... "जग जिंकल्याचा 'विजयी' भाव
त्याच्या चेहर्यावर....."
पण त्याने काही फरक पडत नाही. कारण हे दोघांना लागू होतं. पण नात्यात या गोष्टी व्हायच्याच. कारण गरज दोघांना असते आणि कधी कधी क्षुल्लक गोष्टीतली 'हार' दुर्लक्ष करण्याजोगी असते. किंचीत 'अहं' बाजूस ठेवला तर 'हारजीत' असलेली चांगली आणि ती दोघांना जाणवत असेल तर अजून उत्तम. नात त्यामुळेच घट्ट होतं आणि मग शस्त्र उचलण्याची वा टाकण्याची गरज उरत नाही.
व्वा कौतुक, पटलं तुझं
व्वा कौतुक, पटलं तुझं मत.....
दक्षिणा,
<<कवितेत मांडलेलं, एक जळजळित सत्य आहे पण हे होतंच... फक्त एकाच्या गरजेसारखं.. >>
खराय्...
प्रतिसादासाठी खूप खूप आभार तुझे!
विनायक,

धन्स, हा!
बागेश्री, खुप आवडली कविता!
बागेश्री, खुप आवडली कविता! ...कधी कधी असं घडतं खरं!
थोड्या शब्दात खुप काही सांगुन गेलीस!!
नाती अशी टिकतात
नाती अशी टिकतात का?
'एकाच्याच' गरजेखातर??
कळत नाही...
पण;
दरवेळी असंच घडतं खरं.......!>>
खुपच छान..
आर्या, मानसी धन्स!
आर्या, मानसी
धन्स!
कविता "कैच्या कै" का म्हणे?
कविता "कैच्या कै" का म्हणे? प्रचंड आवडली.
अरे मस्तच.. !!
अरे
मस्तच.. !!
आधी काढा ती कैच्यकै मधून..
आधी काढा ती कैच्यकै मधून.. मगच प्रतिक्रीया देईन मी!!
प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली..
but u knw what, अशा नात्यांमधलं आपलं समर्पण प्रत्येकवेळी आपल्याला so called शस्त्र खाली टाकायला लावतं.. तेही एक वेगळं समाधान असतं - समजुतदारपणा दाखवल्याचं! कारण तुम्ही म्हटलंय तसं "'आपलचं माणूस' आहे ना?" ही भावना शेवटी प्रबळ होते... शेवटी कसं आहे ना, पैसाअडका, दिखाऊ श्रीमंती, भौतिक सुखं याच्या पलिकडचं जे आपल्याला हवं असतं, ते मिळवण्याच्या प्रवासातले हे अपरिहार्य टप्पे असतात..
जाता जाता - तुम्ही जरी हे स्त्रीच्या बाजूने लिहिलेलं असलं, पुरूषांच्या बाबतीतही हे घडतंच बरं!
after all, समजूतदारपणा हा कुणीतरी दाखवला म्हणजे झालं!!
माझ्या निवडक १०त!
आनंदयात्री, इतका भरभरुन
आनंदयात्री,

इतका भरभरुन आभिप्राय?.... व्वा.. धन्य झाली माझी कविता!
<<तुम्ही जरी हे स्त्रीच्या बाजूने लिहिलेलं असलं, पुरूषांच्या बाबतीतही हे घडतंच बर>>
ह्याला माझं १००% अनुमोदन!
आणि,
टॉप १० मध्ये माझ्या कवितेला स्थान- मनापासून आभार!
Pages