सावसावाली

Submitted by bnlele on 19 May, 2011 - 02:18

एक-दुसर्‍याचा पाठलाग, निसर्गाचा नेम,

कशाला,कां,आणि किती ? कळेना सांगून.

आपलीच सावली करते सतत, पण, सदैव मौन !

खडकाळ वाट आयुष्याची, थंडी-पाऊस-ऊन !

आंधळी ती, फरफट जिवाची इजा-जखमा लपवून.

साथ आंधारात, कळेना कां म्हणून !

हलकेच पुन्हा येते सांवरून, म्हणते घे उमजून -

कुशीत तुझ्याच सावध, लपुन, पण कवच बनून !

आले कि नाही बघ नवी उमेद घेऊन ?

संपू देणार नाही शिदोरी,प्राण असेल तोवरी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: