जगलो असामी

Submitted by bnlele on 19 May, 2011 - 01:35

बादशहाच्या ऐटीत,भल्या पहाटे चौपाटीवर गेलो,
द्रोणात चाट घेऊन ऊंटाच्या पाठीवरून फिरलॊ,
दूरून खवळून येणार्‍या लाटा निवळल्या मला बघून !
नमन करून,किनारी लोटून, गेल्या माघारी फिरून.
बांधला महाल रेतीचा,शंखशिंपल्या झोळीत भरून,
"दामाजीने" ओतून दिल्या त्या मोहोरा गोळा करून.
आकाशात तो अचानक हसला ढग पिस्कारून,
विखुरला महाल गगन भेदी हास्य ऐकून.
दामाजी तर दिसलाच नाही, आली पोतीचपोती भरभरून !
लाट सरता किनारी, उरली -फक्त, ओली रेती फिरून,
रिकामीच सर्व शंखशिंपली - मोती तर सापडला नाही.
ना नफा ना तोटा -आयुष्याची शाई संपून गेली !

गुलमोहर: