आठवणींचे पिसारे

Submitted by पैलतीर on 18 May, 2011 - 23:01

क्षणात निसटले सारे,
दूर लोटूनी किनारे...

नभांची पांगली गर्दी,
निखळता ऐकेक तारे..

राख उधळत आसमंती,
निखार फुकंती वारे..

पावले फिरता परत,
बंद झाली ती दारे..

ढासळत्या या देहास,
आता हसती 'सहारे'

अंती का असे बोचती,
मर्म आठवणींचे पिसारे..

- पैलतीर ( १९.०७.२००४ )

गुलमोहर: