ई मेजवानी

Submitted by दिनेश. on 18 May, 2011 - 15:30

कुणाला कशाचे तर कुणाला कशाचे. मला खाद्यपदार्थांचे, तेही खास करुन स्वतः केलेल्या पदार्थांचे फोटो काढायची हौस आहे.

नेहमीच्या या कामाला मी छंदाचे रुप दिलेय. प्रत्येक पदार्थ दिसायला कसा सुंदर दिसेल. त्याची रंगसंगती कशी आकर्षक दिसेल, असा विचार करत असतो. माझ्यासाठी ती नवनिर्मितीच असते.

पुर्वी मायबोलीवर लिंक देणे मला जमत नसे. त्यामुळे यातले काही फोटो पुर्वी टाकले असतील, तरी ते छोट्या आकारात होते. आता सावलीने शिकवल्यानंतर मला लिंक देणे जमू लागले आहे.
मी ज्या पाककृति लिहितो, त्यासोबत फोटो द्यायचा प्रयत्न करतोच, पण इथे बाकिची मंडळी ज्या पाककृति लिहितात, त्या पण करुन बघायचा प्रयत्न करत असतो. शिवाय यातल्या काही प्रकाशचित्रांशी, काही मायबोलीकरांच्या आठवणी निगडीत आहेत. त्यापण लिहितोच.

तर पानं मांडलीत, या जेवायला.... सावकाश होऊ द्या.

अश्विनीला एकदा पनीरच्या प्रकाराबद्दल लिहिले होते. तर हे पनीर चिली तिच्यासाठी. तसे अरुंधतीला पण पनीर आवडते, ते माहीत आहे.

उपास आहे का कुणाचा ? हे फक्त बटाट्याचे थालिपिठ.

जांभळा कोबी, केशरी गाजरे, हिरवी मिरची आणि पांढरा पास्ता. एक चित्र !

लेकीसाठी केलेला फ्राय लेमन फिश !

आमच्या कडे मिळणारे खास बीन्स. इथे त्याला कोको बीन्स म्हणतात. दिसायला सुंदर आणि चवीलाही छान

आणि हि त्याची भाजी

मिनोतीच्या पॅनकेक वरुन प्रेरणा घेऊन --

शेपू फॅन क्लबची आठवण काढत.

वर्षूचा रवा डोसा..

केनयाचे मूग, केनयाचेच घट्ट दही आणि केनयाचाच चिवडा (इथे त्याला चेवडो म्हणतात ) वापरुन केलेले चाट

साधा वरणभात आणि दह्यातल्या मिरच्या .

केळ्याच्या पानातली गोडाची पानगी

कांदा बटाटा आणि घेवडा बेक. हा पदार्थ मंगला बर्वेंच्या अन्नपुर्णा पुस्तकातला.

तयार कचोरी वापरुन केलेली कोफ्ता करी.

मायबोलीकर कुल (सुभाष) आणि मी, आम्ही दोघांनी नगरच्या रस्त्यावर हा हुरडा खाल्ला होता. आता मानुषी, चंपक, चंपी सोबत खाईन म्हणतो.

कॉर्न आणि ब्रोकोली बेक

साबुदाण्याचे थालिपीठ

माझी आवडती फणसाची भाजी

गोव्यातील खास अनसाफनसाची भाजी (टीमगोवासाठी )

खास वर्षूसाठी
व्हेजीटेबल स्टर फ्राय

छोट्या छोट्या ईडल्या करायचा कंटाळा आल्यावर, त्यच पिठात भाज्या वगैरे घालून केलेली तवा ईडली

जागू आणि साधनाला ला विसरुन कसे चालेल ? गोव्याच्या बांबोलिम बीचवर मित्रमैत्रिणींना खिलवलेले फ्राय फिश.

गुजराथी हांडवो

खाऊन दमला असाल तर चहा घ्या !!

साबुदाण्याची खिचडी

या फोटोबाबत अगदी खास आठवणी आहेत. गिरिराज उभयताचे केळवण आम्ही केले होते. आरतीच्या घरी (इट्स्मी ) त्यावेळी सई (दक्षिणाची ताई ), क्षिप्रा, रुपाली (त्यावेळची सोनचाफा) आणि जी एस होते. पुरणपोळी, करंजी, गुलाबजाम असा जंगी बेत होता.

माझ्या भटक्या मित्रांना विसरुन कसे चालेल. दोन्ही योगेश, रोहन, रोहीत, इंद्रा, आशू आदी मंडळींसाठी. गोरखगडाच्या पायथ्याशी मिळालेली थाळी. (या लेखातला हा एकमेव फोटो, ज्यातले पदार्थ मी रांधलेले नाहीत.)

हा आहे वांगीभात आणि पपईचे सलाद.

हे मामीचे. आलू चलाके

गोव्याच्या पद्धतीचे आंबाड्याचे रायते

ही अवलची गवार ढोकळी (मजहे व्हर्जन )

जागू आणि बागुलबुवा यांच्यासाठी हा मासा !

मला माहीत आहे, काही मित्रमैत्रिणी राहून गेल्यात. त्यांची आवडनिवड कळवली, तर त्यांनाही ई मेजवानी देईनच.

सावकाश होऊ द्या.

गुलमोहर: 

मस्त. धन्यवाद. किती मेहनत करशील रे जरा बस निवांत. अन्नकर्त्याचे कल्याण होवो.

सा. थालीपीठ अन बिलीवेबल आहे एकदा करून घालच खायला. Happy

पानगी, फणसाची भाजी, आलू-चलाके मधली फक्त कोथींबीर चपाती, बीन्स भाजी,रवा डोसा,लेमनफिश फ्राय,अन्साफणसाची भाजी,पपई, पुपो , करंजी, फ्राय फिश व आंबाड्यचे रायते फक्त इतकच आवडेल खायला अशी एकत्र मेजवानीत.

ते गोरखगडाच्या पायथ्याशी मिळालेल्या थाळीत काय आहे? नावं लिहा ना पदार्थाची. मस्त मेनु दिसतोय.

भयानक भूक लागली आहे!!!
तरीही दिनेशदा, यात कसलीही क्रिएटीव्हीटी नाही.
लोकांनी पाक़कृती सांगितल्या, तुम्ही केल्या, फोटो टाकले ही सगळी निव्वळ चोरी आहे काय समजलात Wink
Light 1 घ्याच
रच्याकने, ब्याकग्राउंडला जरा बर्‍या गोष्टी वापरता आल्या असत्या काय?

तोंपासु!! सगळेच फोटो जबरी.
साधी साबुदाण्याची खिचडी आणि थालीपीठ सुध्दा किती छान दिसतेय. वांगीभात खासच, रेसिपी शोधुन करून बघेन.

मीरा, बांगडा / मटणासाठी मला जागूकडे जायला पाहिजे. मी केले तरी खाणार कोण ?
गोरखगड स्पेशल थाळीत, तांदळाची भाकरी, कांदा बटाटा रस्सा आणि वरण. एवढेच.

आगावा, अगदी जेवायच्या आधी काढलेले फोटो आहेत.
घास रोज अडतो ओठी.. वगैरे वगैरे. म्हणून ते असे साधेसुधे.

घास रोज अडतो ओठी..>> अगं आईग. कारे असं? माझं ही होतं हे. अगदी एका बटाट्याची भाजी केली अन एक ग्लास गार ताक केलं तरी. हे काही फेमस गाणे आहे काय?

फोटो काढायला क्रिएटिविटी लागतेच की. Happy

अगं गेले वर्षभर मी रात्री एकटाच आहे जेवायला. आधी कुणी ना कुणी असायचेच.

आणि ते गाणे.. भारतीय नागरिकांचा, घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तूमच्यासाठी.

जबरी आहेत सर्व फोटो.... रंगसंगती, मांडणी, सजावट व पदार्थांचे वैविध्य.... सारेच अप्रतिम!! Happy

लौकर कर रे बाबा केळवण आता
ये मै क्या सुन आय मिन पढ रही हु??????????????????????????????

जिप्स्या तू केळवणापर्यंत प्रगती केलीस नी आम्हाला काहीच माहित नाही???? तु नैनिताल...... इ. ठिकाणी नक्की काय पाहायला गेला होतास??????????????????

क ह र ... काय एकसे एक पदार्थ, त्याची त्याहून छान सजावट आणि त्याहून छान फोटोज !!
अहाहा, इतकी छान ई-मेजवानी कोणाला मिळेल काय ?

खुपच सुंदर...लाजवाब्...अप्रतिम...आणि ह्या कॅटेगरीत येणारी सगळी विशेषणं. तुमचं कऊतूक करावं तेवढं थोडंच.

सुंदर फोटो. मॉनिटरमधून हवी ती डिश काढून टेबलवर ठेवावी (मासे सोडून.. कारण मी जागूच्या बाफवर कितीही गमजा मारल्या तरी पक्की शाकाहारीच आहे) आणि मस्त चापावी असं वाटलं Happy

धन्यवाद इ-मेजवानीबद्दल Happy

नितिन, कधीही.
वत्सला, यातले सगळेच पदार्थ नाही लिहिलेत इथे. (निदान आता सापडत तरी नाहीत.) एखादी खास हवी असेल, तर नव्याने लिहिन.
अश्वीनी के, आपण दोनचार जणच उरलोत.

आणि दोस्तांनो, निदान नेत्रसुख तरी देऊ शकलो ना. भरुन पावलो.

सर्वच फोटो मस्त... Happy भूक चाळवली आहे..

पण पानगी पाहून जीव गेला.. आमच्या इथली एकदम खास डिश... Lol
मी कितीही खाऊ शकतो..

स्वप्ना, विपुत लिहितो घरी गेलो कि.
भटक्या, पानगी करायला इतकी सोपी तरीही चवदार. पण अनेकजणांना माहित नसते.

स्वप्ना, विपुत लिहितो घरी गेलो कि.

विपुत नको. नवीनच लिहा ना. सगळ्यांनाच होइल.

हे अस सगळ केल्यावर वाढल्यावर आणी समोरच्याच्या चेहर्‍यावर त्रुप्त्(कसं लिहायच?) भाव पाहिल्यावर कसं छान छान वाटत असेल ना?

दिनेशदा, मी पन शाकाहारीच बरका.. तुमच्याच गटात Happy

पानगी गरम गरम नुसतीच खायची. मीठ घातलेली पानगी दही आणि फोडणीची मिरची... यम्मी Happy

आणि फेण्या... आहाहा... आई करायची.. मोदकपात्रात वाफवुन... गरम गरम फेण्या...ताटात वाढली की गेली पोटात... मऊसूत Happy

दिनेशदा........सगळे फोटो एकदम तोंपासु ! माझ्यासारख्या पाककलेत शून्य प्रगती असलेल्यांना असले पदार्थ आयते मिळाले तर... :स्वप्नात दंग असलेली बाहुली :
नुसत्या बटाटयाच्या थापिची रेसिपी टाकलेली आहे का कुठे ?? नसेल तर प्लीजच मला सांगा.
...शाकाहारी गटात मीसुद्धा.
( बाकी तुम्ही स्वतः शाकाहारी असूनही फिशफ्राय वगैरे बनवता, ह्याबद्दल मानलं पाहिजे.)

Pages