पाणवनस्पती (लेकीने काढलेले चित्र)

Submitted by अनुश्री. on 17 May, 2011 - 16:18

माझी लेक मिहिका वय साडेपाच वर्षे, ती गेले ३ महिने चित्रकलेच्या क्लास ला जाते. तशी तिला १-२ वर्षापासुन चित्र काढायची आवड आहे पण हल्ली खुपच छान (वयाच्या मानाने) चित्र काढते.
मागे तिचे चित्र इथे टाकले होते तिथल्या प्रतिक्रिया तिला वाचुन दाखवल्या होत्या खुप खुश झाली होती तेव्हा. म्हणुन मला आवडलेली तिची काही चित्रे इथे द्यायच्या विचारात आहे. इथल्या प्रतिक्रियांमुळे तिला जास्ती हुरुप येईल.

Photo_E7A88243-BFF1-242B-78B0-AB8B83FEF877.jpg

हे चित्र सॉफ्ट पेस्टल कलर ने काढल आहे.
आम्ही (आई-बाबांनी) कोणतीही मदत केली नाही. Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हो तिनेच काढल आहे. आम्ही तिला मदत केली नाही पण तिने कुठले कलर वापरु ह्या बद्दल तिच्या क्लास च्या टिचर ला विचारले होते. त्यांनी तिला ग्रे कलर बेस ठेऊन रात्र दाखवायला सांगितली.

लालू तुझ्या लक्षात आहे Happy
दीपांजली तुझा इंग्रजी प्रतिसाद तिला वाचता आला. खुप छान वाटल तिला:)

Mihika, Great job !! अनू, अजून असतील तर टाक तिची चित्रं.

धन्स सगळ्यांना.
अंजली, मैत्रयी तुमच्याही इंग्रजी प्रतिक्रिया तिला वाचता आल्या. लगेच नविन चित्र काढायला घेतल आहे Happy
मैत्रयी नक्की टाकेन तिची चित्र.

लगेच नविन चित्र काढायला घेतल आहे
<<< ग्रेट , आमच्या तर्फे शाबासकी दे अता मिहिकाला Happy
चित्रकले साठी नवीन नवीन विषय द्यावेसे वाटतायेत तिला कलरिंग स्किल बघून :).

( हि फुलं काढलीयेत तसे पाण्याखालचे रंगीबेरंगी मासे, मर्मेड, फुगेवाला , रंगपंचमीचा सीन ,बागेतली फुलपाखरं, पर्‍या , नाचरा मोर अशी चित्रं मस्तं जमतील तिला Happy )

डिजे हे अवघड आहे Proud
सध्या असलेल्या वयानुसार आपण काही काढायला सांगितल की पण मला हे काढायच आहे ना! अस उत्तर येत. त्यामुळे स्वतःला हव ते चित्र काढते. पण तस एक चित्र (म्हणजे पुस्तकातल वैगरे ) समोर असेल तर आणी खुप आवडल तर बघुन काढायला जास्ती आवडत (तेच जास्ती जमत)
रंगसंगती मात्र पुस्तकातली घेत नाही ती स्वतःच्याच मनाची.

वॉव.. अनु.. काय सुरेख चित्र काढलंय आणी रंगसंगती पण उत्तम.. अमेझिंग.. लेकीचा चित्रकला क्लास कद्धीसुद्धा बंद करू नकोस Happy

सऽऽही. एकदम कलाकार आहे तुमची मुलगी. चित्रकला/पेंटींग करू शकणार्‍या लोकांबद्दल मला अतीव आदर आहे.
माहे अप सिनेमातला पक्षी मिहीकानेच काढला होता ना, अजून आठवतोय तो.
Mihika, Keep it up, you are brilliant.

Very well done Mihika Happy you have a great skill. continue with what you enjoy. we would love to see your new drawings, paintings, sketches etc. so keep posting them here on Maayboli.

All the very best to you!! Happy

अनु, लेकीला असेच प्रोत्साहन देत रहा. तुमचे ही कौतुक Happy

आधीच्या चित्राची लिंक देशिल का प्लिज?

hey cute painting. only mermaid can draw like this. keep it up. just be with colour's and may your own world colourful.

अनु ३ खरोखर खूप प्रगती आहे मिहिकाच्या चित्रकलेमधे. असेच प्रोत्साहन देत रहा. हेच आहे ना तीने काढलेलं पक्ष्याचं चित्र?

wow!! Great job Mihika.
अनु३ तुमचेही कौतुक.

Good job, Mihika! I loved the color combination and detailed work.

अनू, तिची अजून चित्रे टाकत रहा इथे.

Beautiful !
लै भारी आहे अनु. टाकत रहा अजून चित्रं. अतिशय मस्तं आहेत. Happy
मलाही तो पक्षी आठवतो आहे.

Pages