आप्पा आणि बाप्पा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
Time to
read
<1’

" काहीतरी उद्योग काढ बघू" आप्पा प्रधान
" आता गुपचूप झोप " बाप्पा सरमळकर
" अरे बाप्पा मनाला काहीतरी चाळा हवा ना"
" खरच नको रे आप्पा. गेल्यावेळेला काय गोंधळ झालेला. आठवतय ना? त्यांनी आपल्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला असता. आपण बाबा-पूता केल म्हणून थोडक्यात निभावल "
" आता त्याची आठवण कशाला ? "
" मग आता का चिडतोस ? "
" चिडत नाही. पण आत्ता काय करायचय बोल ?"
" ठीक आहे. तूझा जर एवढा आग्रहच असेल तर..."
.
***************************************************************************************
आप्पा सबनीस आणि बाप्पा महाले हे दोघ जीवश्च कंठश्च मित्र. आप्पा थोडासा घाबरट. तूमच्या आमच्या सारखा. बाप्पा एकदम बिनधास्त. त्याला जारण- मारण, अघोरी विद्या या बाबतीत भरपूर रस. तसा तो कुणाजवळ असा शिकला नव्हता पण काही लोक असतात ना पुस्तक वाचून शिकतात अगदी त्याच जातकुळीतला. आपण नाही का पुस्तक वाचून टेनीस खेळायला शिकतो, स्वयंपाक करायला आणि (स्वतः केलेला स्वयंपाक जेवायला शिकतो) त्याच प्रकारात मोडणारा. बाप्पाच्या घरात म्हणे कुणा पूर्वजाला 'तसल्या' गोष्टीत भरपूर रस होता. त्याचेच गुण बाप्पात उतरलेले. ही विद्या शिकायला बाप्पाला घरन परवानगी मिळण शक्यच नव्हत. म्हणून तो चोरुन मारुन कशीतरी ही विद्या शिकलेला. अश्या माणसाला कोण शहाणा माणूस आपली मुलगी देईल म्हणा. पण असे महाभाग असतातच ना हो दूनियेत. कुण्या एका अडलेल्या माणसाने आपली पोरगी ह्या घरात उजवली खरी. लग्नानंतर दोनच वर्षात ती कसलासा आजार होऊन वारली म्हणे. पण लोक काही वेगळच बोलत. लोकांच काय १० तोंड आणि १०० गोष्टी
.
ह्या उलट आप्पा. अगदी साधा नाका समोर चालणारा. ३६ वर्ष पोष्टात नोकरी करून रिटायर झाला. पोरांनी त्याचे फंडाचे पैसे संपताच त्याला बाहेरचा रस्ता दाखवला सरळ. त्याला बाप्पा भेटला म्हणून व्रुद्धाश्रमात जाव लागल नाही इतकच. आणि आता त्यालाही, बाप्पा बरोबर राहून जारण-मारण विद्येत रस वाटू लागला होता.
.
परवाच बाप्पाला कुठलस पुस्तक मिळालेल त्यात 'तसल्या शक्तीच' आवाहान करण्यासाठी यथासांग विधी दिलेला. आवाहन करण्याची वेळ, जागा, आकृती बंद सगळ सगळ अगदी डीटेल मध्ये. तो प्रयोग करायला आजचा दिवस अगदी योग्य होता. आज अमावास्या होती. अनशान पोटी हा विधी करायचा म्हणून दोघांनी आज उपास केलेला. आणि पुस्तकात दिल्या प्रमाणे काळे कपडे परीधान केलेले. सगळ्यात पहिल्यांदा बाप्पाने आकृती बंद काढून घेतला, त्यावर मोहोरी पसरल्या आणि पुस्तकात दिल्या प्रमाणे मंत्रोच्चार सुरू केला. त्या मंत्रोच्चाराचा अर्थ बाप्पाला माहीती होता. त्यात त्या अज्ञात शक्तीची प्रशंसा करून त्याला यायचे आवाहन केले जात होते. पण ही अज्ञात शक्ती फुकटात काही करत नाही. त्या शक्तीला त्याचा बळी द्यावा लागतो. आणि जर का त्या शक्तीला बळी पसंत पडला नाही तर.... . तर मात्र ती शक्ती रुष्ट होण्याचा संभव असतो. आज त्या शक्तीला प्रसन्न करायला ते त्या 'शहाणे' चा बळी देणार होते. शहाणे त्यांचा घरमालक. सारख असल्या गोष्टी बंद करा म्हणून तुणतुण लावायचा. त्याचा आज ते बंदोबस्त करणार होते. त्याकरता त्याच्या केसाची बट त्यांनी न्हाव्याला थोडे पैसे देऊन मिळवली होती.दोघही धीर गंभीर आवाजात मंत्रोच्चाराची आवर्तन करत होते. हुंकारत होते. कुठल्याश्या अद्रुष्य शक्तीच आवाहन करत होते. जसा जसा त्यांचा मत्रोच्चाराचा स्वर टिपेला पोहोचला तस तस वातावरणात एक जडपणा आला. खोलीतली हवा अगदी कुंद झाली. आणि खोलीत कसलीशी बेचैनी पसरली. उन्हाळ्याच्या दिवसात खोलीत एक अनैसर्गीक गारवा पसरला. त्या दोघांनाही अस काहीस होणार हे माहीत होत. नव्हे खात्रीच होती. त्या अद्रुष्य शक्तीच्या प्रकटण्याची ती नांदी होती.
.
खोलीत काहीतरी 'वेगळ' आल्याची जाणीव दोघांना झाली. खोलीत कसलीशी दूर्गंधी पसरली. आणि कुणी तरी रडल्या, किंचाळल्या सारखा आवाज येऊ लागला. थोडीशी चिडचीड खोलीत पसरली. त्या दोघांच्या हे सवयीच होत म्हणून बर. जर कुणी तर्‍हाईत तिथे असता तर नक्कीच सहन करु शकला नसता. आणि अचानक तो आवाज बंद झाला. खोलीतली दूर्गंधी कमी कमी होत जाऊन नाहीशी झाली. खोलीतली हवा पूर्ववत झाली. खोलीत बेचैनी, गारवा जणु कधी नव्हताच. हे त्या दोघांनाही पूर्ण पणे अनपेक्षीत होत. अस आक्रीत कधी घडल नव्हत. असा विधी कधी अर्धवट राहीला नव्हता. आपल काय चुकल दोघ विचार करत राहीले. पण आज काहीतरी चुकल खर. दोघांनीही पुन्हा पुन्हा ते पुस्तक पडताळून पाहील. अगदी त्या आकृती बंदा पासून ते मंत्रोच्चार, समय, जागा सगळ सगळ अगदी त्या पुस्तकात दिल्याप्रमाणे. ते पुस्तकात लिहीलेल खर होत का? का केवळ कुणी मुद्दाम चावटपणा केलेला? ह्या गोष्टी साध्य करण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 'ह्या विद्येवर' अगाढ श्रद्धा असावी लागते. पण आज त्यांचा विश्वास डळमळत होता. कदाचित हेच तर कारण नसेल आजचा विधी फसण्याच? आणि आजचा दिवस शुभ (का अशुभ म्हणाव ? ) नव्हता हेच खर.
.
आता दोघांनाही भुकेची जाणीव झाली. घरात असलेला दूधभात त्यांनी खाऊन घेतला आणि ते निजायला म्हणून अंथरुणावर पडले.आजची रात्र फुकट गेली म्हणायची. दोघ तासभर निजले असतील नसतील. आप्पाला अचानक जाग आली. त्याला जाणवल की खोलीतल्या त्या कोपर्‍यात कुणी तरी आहे. सुरूवातीला त्याला तो भास वाटला. पण नंतर त्याची खात्री पटली हा भास नाहीये. कुणीतरी आपल्याकडे रोखून बघतय. आप्पा मुळात भित्रा होताच. त्या नजरेने तो आणखीनच अस्वस्थ व्हायला लागला. बाप्पाला जागवण्यासाठी म्हणून त्याने पाहील तर बाप्पा जागेवर नव्हता. दिवा लावायला म्हणून तो धावला पण दिवा लागत नव्हता. ती कोपर्‍यातली नजर अधिकच क्रुद्ध होत गेली. अगदी सहन होण्याच्या पलीकडे. आप्पाच्या अंगाची थंडी वाढायला लागली. घश्याला कोरड पडली. त्याला जाणवल की ती कोपर्‍यातली वस्तू त्याच्या दिशेने वेगाने सरकतेय. त्याने दिर्घ किंकाळी फोडली आणि ....

***************************************************************************************
"काय आप्पा कशी काय वाटली गोष्ट? "
" जबरदस्त यार. अगदी स्वतः अनूभवल्या सारख वाटल. पण दरवेळेला तू मला घाबरट दाखवतोस हे काय बरोबर नाही"
" अरे तू आहेस ना तसा. मग तूला तो रोल अगदी फीट्ट बसतो" बाप्पा गडगडाटी हसला
" चल आता रात्र फार झालीये झोपायला हवय"
" पण सांभाळ हो एक दिवस खरच कुणीतरी यायच. "
" अरे शुभ बोल रे नार्‍या आपल बाप्पा "
दोघही हसले.
" चल आता झोपूया "
.
दोघ तास भर झोपले असतील नसतील अचानक कसल्याश्या आवाजाने दोघांना जाग आली. खोलीत अनैसर्गीक गारवा पसरलेला. एरवी गारवा शरीराला खुप छान वाटतो. पण हा गारवा तसा नव्हता. अचानक अंगावर थंडगार वार्‍याचा झोत आल्यासारखा. खोलीत कसलीशी बेचैनी पसरली. कुणीतरी किंचाळतय, रडतय असा आवाज आला.त्यांना जाणवल की खोलीच्या कोपर्‍यात कुणीस आहे आणि क्रुद्ध नजरेने त्यांच्याकडे रोखून बघतय. अगदी त्या गोष्टीतल्या सारख. पण त्या गोष्टीतल्या पात्रांसारख हालचाल करण त्यांना शक्य झाल नाही. त्यांनी किंचाळी साठी म्हणून तोंड उघडल पण ती किंचाळी घश्यातच राहीली. आणि त्यांना जाणवली ती केवळ घश्याचे घरघर. त्यांना जाणवल की कोपर्‍यातल ते कुणीस त्यांच्या कडे वेगाने सरकतय आणि .......
*****************************************************************************************
"आप्पा प्रधान आणि बाप्पा सरमळकर, दोघही शरीराने विकलांग होते " डॉ़क्टर शहाणे पोलीसांना सांगत होते.
" त्या दोघांना भयकथा रंगवून-रंगवून सांगण्याचा/ऐकण्याचा भारी शौक होता. आणि त्यात ते इतके तल्लीन होत की जणू कथेतली पात्रच बनून जात. त्यांना कश्याचीही शुद्ध रहात नसे. मागे एकदा असच काहीस झालेल पण थोडक्यात निभावल. तेंव्हा त्यांना समज दिलेली. त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हणायचा. पण ह्या वेळी मात्र ... हे मनाचे खेळ दूसर काय ? तूमचा पंचनामा करून झालाय, तूम्ही बॉडीज हलवल्या आहेत आणि आता रात्रही बरीच झालीये तेंव्हा तूम्ही आता निघणार असाल. पून्हा एकदा इतक्या रात्री तुम्हाला तसदी दिली त्याबद्दल क्षमस्व "
बोलता बोलता डॉक्टर शहाण्यांनी चष्मा पूसून टेबलावर ठेवला आणि सहज हाताला काहीतरी चाळा म्हणून रिकाम्या कागदावर काहीतरी गिरवायला घेतल. कसलस चित्र. मगाशी त्यांनी आप्पा- बाप्पाच्या खोली मध्ये तो आकृतीबंध पाहीलेला ना अगदी तस्साच ......
*************************************************************************************
समाप्त

विषय: 
प्रकार: 

पण त्याना मारुन का टाकले शेवटी..? अशाच कथान्ची एक सिरीज करता आली असती ..

केद्या तु पण झपाटलास ना लेका ? Happy धम्माल कथाकल्पना ! पन मधली कथा का नाही खुलवली ? Sad

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

मला काहीच झेपले नाही. Happy खरे म्हणजे मजा नाही आला.

केदार अशा कथांचा डेली सोप करता येईल ना?

मस्त Happy