कवि आणि कवितांबद्दलचं जुन्या मायबोलीवरचं हितगुज.

Submitted by webmaster on 8 July, 2008 - 23:33

नमस्कार.

मी ह्या सदरात नविन आहे..मला एका कवीतेचि महिति पहिजे आहे..
पलिकडे ओढ्यावर,
माझे गाव ते सुंदर,
झाडा झुडपात आहे,
लपलेले माझे घर....

कुनाला हि कविता पूण येते का?

मी बहिंणाबाईंच्या एका कवितेच्या ओळी शोधतेय. "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" अशी असावी असं वाटतंय. नेट वर खूप शोधूनही काही मिळालं नाही. कोणाला माहित असेल तर कळवा प्लीज.

सासरची उणीदुणी काढणार्‍या बाईला एक साधू विचारतो की बाई इतके सासर वाईट तर तू सासरी का राहतेस? तेव्हा दिलेले हे उत्तर आहे, हो ना ? सगळी कविता हवी आहे का ?

माहेरचे गाणे गायचे होते तर सासराले कश्यासाठी आली असे विचारणाऱ्याला बहिणाबाई सांगता

"अरे लागले डोहाये,सांगे शेतातली माटी

गाते माहेराचे गानं, लेक येईल रे पोटी….

दे रे दे रे योग्य ध्यान ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते"

आरती, अग ती ओळ बरोबर आहे का हेच विचारायचं होतं. सगळी कविता देऊ शकलीस तर मजाच होईल माझी. Happy धन्यवाद ग.

मनिषा, इतक्या लवकर कोणाचे उत्तर येईल असं वाटलंच नव्हतं, खूप धन्यवाद! Happy

.

आपल्याकडे जर काहि स्री जिवनावर आधारित काही लेख असल्यास क्रुपया माला पाठवा माला खुप गरज आहे त्याचि मि तुमचा आभारि राहिन जन्मभर..............
धन्यवाद.......................!

निलेश मायबोलींवर संयुक्ता नावाचा ग्रुप आहे त्यावर स्त्री जीवनावरचे चांगले लेख मिळतील...

मला गजानन वाटवे यांच "आई मला आकाशीचा चंद्र हवा ग" हे गाण हव आहे कुणाला माहीती असल्यास प्लीज पोस्ट कराल?

मला ' मै मुंबै आउ की नको ऐसा खत मे लिखो' ही पुर्ण कविता हवी आहे...

कोणाकडे असल्यास इथे टाकावी....

धन्यवाद.

सर्व कवी/यित्रींना आजच्या जागतिक कवी दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
आज रस्त्यात दिसेल त्याला अडवून कविता ऐकवू शकता. आज कवी/यत्री दिसल्यास रस्ता बदलू नये ही सर्व सहीष्णू वाचकांना नम्र विनंती.