प्रगती पत्र!
कपाळावर आठी हातात काठी
डोक्यावर काळी टोपी
होते शिघ्रकोपी
सदरा गळाबँद
डोळे होती लालबुँद
संपले पहिले सतारा
देता हाती प्रगती पत्र ....(1)
इतिहासाची झाली पुनरावृत्ती
यँदाही झालो paas काठावरती
भुगोलातला वाचता नकाशा
ना समजल्या कधी दिशा
चुकले रस्ते हिँडलो दाहीदिशा
गणिताचे पाडे घोकले
पँधराचोक कधी साठ कधी सत्तर
कसाबसा पास झालो ,नशीब बलवत्तर...(2)
समाज शास्र शिकलो आम्ही
ना कळले हे कसले पुढ़ारी
मँडळे अन समित्या स्थापल्या
...की संपते का बेकारी
प्राणिशाश्राचि केली चिरफाड
भोवळ आली न पाहता रक्ताचा थेंब
पण डोनेशनच्या नावाने बोंब
लटपट कापती पाय आमुचे
राँगा मैलभर
साँगा कसे होऊ आम्ही डागदर .....(3)
समाजसेवा विषय घेवुनि
निवडले दगड ,झाडले रस्ते
बघता बघता परोपकार ...
सोपे वाटले नुसते
अर्थशाश्र ना समजले कधी
जमाखर्चाचा बसे ना मेळ
महिनाअखेर झाली सात दिवसाँचा खेळ ......(4)
भुमितीचा उलटा त्रिकोन
ना शिकले नियोजन
घरोघरी पाळणे हालती
विचारुन नका लोकसँख्या किती? ......(5)
वनस्पतीशाश्राची ओळख झाली .....
भाजी मँडईत
पिशवी नाही भरली पुरती
प्रत्येकजण घासाघिस करती
झोँबल्या मिरच्या नाकाला
भाव भघुन काँद्याँचे ....
खडा लावला कानाला
अश्रू डोळ्यात आता ....भाव मनीचे दाटता....(6)
नागरिक शाश्र शिकुन झाले
पण झालो बिलँदर
कसले आदर्श कसले "टुजी"
केले आम्ही हाजीहाजी ......(7)
चित्रकलेची अवीट गोडी
प्रियँकराची अतुट जोडी
खरडल्या देवळाराऊळाँच्या भिँती
ना मिळाली एक सोबती
कोरले कित्येक सँगमरवर
झाले पिरेम अजरामर .....(8)
पर्यावरणाचे धढे राहिले पुस्तकात
टायर जाळून वितळविला डाँबर
रसत्या रस्त्यावर
जरूर नसता भोँपु वाजवुनि
जागे केले सारे ईस्पितळ
ना जाणल्या वेदना ,ना सोसली कळ,
सबसीडीतले डीजेल घालुनी
गाड्या चालवील्या बेफाम
धुर ओकला ,भुळघाण केली
व्रुक्ष्हान्ना झाला ...
अस्थमा अन जुकाम.....(9)
असेल जर असे प्रगती पत्र
यँदाचे होईल अखेरचे सत्र ....(10 )
किरण ..7मार्च 2011
बापरे! केवढी मोठी कविता
बापरे! केवढी मोठी कविता आहे.पण आवडली.(फक्त पहिली दोन कडवी वाचुन.:हाहा:)
धन्यवाद
धन्यवाद