नजरेत आली चांदणी.

Submitted by किंकर on 13 May, 2011 - 09:51

पडलो होतो अंगणी
नजरेत आली चांदणी
करून डोळे किलकिले
मला तिने बघितले.

स्वतःशीच कुजबुजत,
मला तिने विचारले
या मध्यान रातीला
कोण आहे साथीला?

दचकून तिच्या प्रश्नाने,
मीच मला सावरले.
मग म्हणालो तिला
गूढ मनीच्या आभाळी
एक चांदणी लपलीय
इतकावेळ लुकलुकून
आत्ताच ती झोपलीय.

तर ती म्हणाली...
नको करूस हालचाल आणि आवाज श्वासाचा
तिला भेटलाय राजकुमार आत्ताच तिच्या स्वप्नांचा
पडून राहा असाच झोप येईल डोळ्यात
हसू तिचे ऐकू येईल गालावरच्या खळ्यात.

निरोप तिचा ऐकून मी स्वप्नी सुखावलो
अन जाग येताच तिच्या आठवणीने दुखावलो

गुलमोहर: