आशिर्वादाच गाठोड

Submitted by प्रभा on 13 May, 2011 - 08:25

= चि. सीयास,[आमची नात] वाढ्-दिवसा निमित्त आजी-आबांकडून=
आशिर्वादाच गाठोड
--------------------
सीयुडी आमची गोड ग--जशी हापूस आंब्याची फोड ग,
उजाडला वैशाख मास ग--
झाले सात वरीस--
'' १४ मे'' चा दिवस--
बहरल आनंदाच झाड ग--
पाळण्यात चिमुकली गोड ग--
हापूस आंब्याची-----
आबा म्हणतात मनुबाई--
आई-बाबांची लाडूबाई--
स्वराची सीयाताई--
सगळेच करतात लाड ग--
आहेच तशी गोड ग--
हापूस आंब्याची-----
आजचा दिवस खास ग--
सातवा वाढ-दिवस--
मैत्रीणी आसपास ग--
काप cake चा piece--
आणि दे छानसा kiss --
किती-- किती गोड ग--
हापूस आंब्याची-----
आजी-आबांनी पाठवल--
आशिर्वादाच गाठोड--
शुभेच्छांचहि पोतड--
हळूवार हाताने सोड ग--
सुखाला नाही तोड ग
सीयुडी आमची गोड ग--, हापूस आंब्याची फोड ग,

= आजी-आबा=

गुलमोहर: 
शब्दखुणा: