विनोद - आचार्य अत्रे

Submitted by limbutimbu on 8 July, 2008 - 05:39

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर Sad

गुलमोहर: 

हे मस्त काम केलत हो लिंबूदा Happy

चांगले केलेत हे टाकुन्.पण तो रेड्याचा जोक मी नेमका उलटा ऐकला होता.पुल उशिरा गेले आणि म्हणाले मी रेडा आधीच पाठवुन दिलाय असे मी ऐकले होते

लिंब्या आहे भारी. पण एक सुचना. राग मानु नको पण गुलमोहोरात फक्त स्वःताचे साहीत्य अपेक्षीत आहे ना?

गुड, लिंब्या तु थोडा बदलला आहेस. Happy

@ लिंबुटेंबु
वा!! आता इथं समग्र अत्रे यावयास हरकत नाही. Happy

दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"

एकदा पंगतीत बसले असताना, जेवण वाढायला आलेल्या बाईना अत्रे म्हणाले 'पातळ सोडून सर्व वाढा...'
.
.
एकदा एक लेखिका अत्र्यांकडे काही चर्चा करायला आल्या होत्या. बोलता बोलता उशीर झाला तेव्हा त्या म्हणाल्या..
'अय्या, एवढे तास कसे गेले कळलंच नाही...'
तेव्हा अत्रे म्हणाले,
'अजून थोडा वेळ थांबलात तर दिवस कसे गेले तेही कळणार नाही....'..
.
(अत्र्यांचे विनोद यावर बरंच काही खपवलं जातं. त्यातलेच काही)....

हा एक वाचलेला: एकदा कोणत्यातरी समितीतून काही सदस्य बाहेर पडले व म्हणू लागले की आम्हीच खरी समिती आहोत व ती (मूळ समिती) शेषसमिती आहे, तेव्हा अत्रे - "अहो एकदा एका घोड्याने लीद टाकली. बाहेर पडल्यावर लीद म्हणाली की मीच खरा घोडा आहे, हा उरलेला शेष घोडा आहे" Happy

अप्रतिम्...........खूप मजा आलि वाचून्.....अजुन काहि असेल तर वाचायला नक्कि आवडेल...

फाळणीच्या बाबतीत समाजवादी पक्षाने तटस्थ रहायचे ठरविले. या बाबतीत समाजवादी पक्षाचे पुढारी अच्युतराव पटवर्धन यांनी खुलासा करताना सांगितले, "आम्ही फाळणीच्या ठरावाला पाठिंबा दिला असता, तर आम्ही जातीयवादी ठरलो असतो आणि फाळणीला विरोध केला असता तर साम्राज्यवादी. म्हणून आम्ही तटस्थ रहायचे ठरवले." तेव्हा अत्रे थट्टेने म्हणाले, " लग्न केले तर आपण संसाराच्या जाळ्यात अडकतो, आणि ब्रह्मचारी राहिलो तर आपण निसर्गाच्या विरूद्ध वर्तन केल्यासारखे होते. म्हणून माणसाने लग्न न करता एखादी बाई ठेवावी, तसला तुमचा युक्तीवाद आहे."

हौशी नाटकांच्या प्रयोगाबिषयी बोलताना आचार्य अत्रे भाषणात म्हणाले, "नाटकाच्या तालमी करायच्या नाहीत अन आयत्या वेळी कशीतरी वेळ मारून नेली म्हणजे स्वतःला कृतकृत्य मानायचे हे हौशी नाटकवाल्यांचे एक ठराविक तंत्र होऊन बसले आहे. नाटक बसवायचे म्हणजे वाच्यार्थ्याने अक्षरशः ते खाली बसवूनच दाखवतात." पुढे ते म्हणाले, "अशाच एका हौशी नाटकाच्या प्रयोगाला गेलो असता सर्वात कोणाचे काम चांगले झाले असे सांगण्याची माझ्यावर वेळ आली, तेव्हा प्रॉम्पटरचे काम सर्वान चांगले झाले, असे सांगणे मला भाग पडले..." Proud

आचार्य अत्रे पुण्यामध्ये राहत असताना एकदा काकासाहेब गाडगीळ त्यांना म्हणाले "तुमच्या साहीत्य संमेलनाला मी कधी येत नाही."

अत्रे: "हो मी तुम्हाला कधी साहीत्य संमेलनात पाहीले नाही.

काका : "मी साहीत्य संमेलनाला का येत नाही विचारा"

अत्रे : "का बुवा येत नाही?"

काका: तुमच्या त्या साहीत्य संमेलनात सगले डँबिस लोक असतात.

अत्रे : मग तेवढ्यासाठी तुम्हाला न येण्याचे कारण काय? इतक्या डँबिस लोकां अजून एक आला तर बिघडलं कुठं?

हा पण वाचलेल्या पैकी एक किस्सा.
असेच अत्रे एकदा बाहेर फिरत होते तेव्हा त्यान्चे पोट सुटलेले होते, त्याच वेळी समोरुन एक स्त्री आली तिने हसतच अत्रेना त्यान्च्या पोटाकडे हात दाखवित विचारले " हा मटका किती रुपयाला देणार?" (बघा आता या बाईला काही गरज होती का?) अत्रेनी लगेच उत्तर दिल नळासकट चाळीस रुपये. Lol

आचार्य अत्रे आणि ना. सी. फडके यांच्यात बरेच वाद होते. त्यातुन बर्‍याचदा शाब्दिक चकमकी घडत.
एकदा फडके चिडून अत्र्यांना म्हणाले, "अत्रे, तुम्ही मुत्रे"
अत्रे हजरजबाबीपणे लगेच उत्तरले, " फकक्याने पुसले"
>>

हेच जोक मी असं ऐकलं होतं.
फडके: अत्रे, अत्रे म्हणजे गल्लितले कुत्रे.
त्यवरे अत्रे शांतपणे उत्तर देतात,
तुम्ही अगदी बरोबर बोललात, आम्ही कुत्रेच, आणि तुम्ही विजेचे खांब.

परकर वरकर. (पर (दुसरा) कर (हात) वर कर)
>>
हे जरा वेगळ्या पद्दतीणे ऐकलं होतं.
एकदा, अत्रे त्यांच्या मित्राच्या घरी जातात, मित्राच्या बायकोचं नाव कमल.
कमलः भाउजी, तुम्ही फार चांगले विनोद करता म्हणे, आज एखादा चांगला विनोद करुन दाखवा ना.
अत्रे: बरं ठीक आहे.
कमलः पण एक अट आहे, काना, मात्र, विलांटि, उकार काहीच नको, असं वाक्य असावं.
अत्रे: ठीक आहे, "कमल, परकर वरकर".

असेच अत्रे एकदा बाहेर फिरत होते तेव्हा त्यान्चे पोट सुटलेले होते, त्याच वेळी समोरुन एक स्त्री आली तिने हसतच अत्रेना त्यान्च्या पोटाकडे हात दाखवित विचारले " हा मटका किती रुपयाला देणार?" (बघा आता या बाईला काही गरज होती का?) अत्रेनी लगेच उत्तर दिल नळासकट चाळीस रुपये. Lol

महाराष्ट्र कर्नाटक वाद सुरु होता.. प्रश्न होता बेळगावचा. कर्नाटकचे मंत्री म्हणाले, 'बेळि म्हणजे कन्नडमध्ये पांढरा.. नावात एक कन्नड शब्द आहे, म्हणून बेळगाव कर्नाटकातच पाहिजे.'
अत्रे म्हणाले, 'हाच नियम लावायचा झाला तर लंडन महाराष्ट्रात आणायला लागेल! '

Proud

vaibhavayare123... , हे दोन दोनदा एकच जोक टाकण्याचे कारण काय ?

'हाच नियम लावायचा झाला तर लंडन महाराष्ट्रात आणायला लागेल>> लंडन हा श्ब्द मराठीत आहे का? अर्थ काय होतो त्याचा ?

RockOn हा बी चा ड्यु. आय डी आहे का?

सबंध शब्द मराठीत नाहीये. शेवटचे अक्षर गाळले तर एक ग्राम्य मराठी शब्द होतो. पुरुषाच्या ज्या अवयवाचे नाव सभ्य लोक लिहीत नाहीत, तो अवयव.

अर्थात् तुम्ही श्लील अश्लील बाफ वर पाहिले तर कळेल की मोठमोठे कवी खुशाल तो शब्द नि त्याहूनहि विकृत वर्णन लिहीतात, नि स्वतःला साहित्या समजते असा गैरसमज करून घेणारे लोक म्हणतात, 'छे: छे:, त्यात अश्लील काही नाही! ते तर थोर साहित्य!'

जसे स्वतःला चित्रकलेचे सर्वज्ञ समजणारे लोक एम एफ हुसेनच्या घाणेरड्या चित्रांची स्तुति करतात.

त्या पेक्षा अत्रे बरे. त्यांना १०० टक्के माहित होते, अश्लील काय, चांगले साहित्य काय, नि कशात काय मिसळू नये! दोन्ही वेगवेगळे ठेवावे.

हाच नियम लावायचा झाला तर लंडन महाराष्ट्रात आणायला लागेल>> लंडन हा श्ब्द मराठीत आहे का? अर्थ काय होतो त्याचा ?>>>>

नावात एक कन्नड शब्द आहे, म्हणून बेळगाव कर्नाटकातच पाहिजे.'>>>>>

RockOn आलं का लक्षात... Happy

झक्की, उगच नाही तुम्हाला मी कैच्या कै किंग म्हणत! कमाल आहे तुमची! अहो, ते लंडन "ग्रेट" ब्रिटेन मध्ये आहे अणि महाराष्ट्रा मध्ये महा येतो म्हणुन ते वाक्य टाकलं असावं अत्र्यांनी. तुम्ही सांगता त्याचा इथे काही तरी ताळमेळ लागतोय का? Lol

Pages