वाटली डाळ कशी करावी?

Submitted by गजानन on 12 May, 2011 - 04:31

तुम्ही वाटली डाळ कशी करता?
(इथे आधीच कृती असेल तर मी हा धागा काढून टाकीन.)
.

.
.
['प्रश्न' हा धागाप्रकार पाककृतींकरता कितपत उपयोगी पडतोय हेही आजमावायचा एक प्रयत्न.]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा शोधण्यासाठी खुणांमधे 'वाटली डाळ', 'चणाडाळ', 'उपाहार' इत्यादी टॅग्ज घालावे लागतील.

ह्या जुन्या मायबोलीतल्या पाककृती:
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4720.html?1197055872
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115794.html?1191219856

चणा डाळ भिजवायची. तिन तासही चालेल. साधारण नखाने दाबल्यास चुरडली गेली पाहीजे, एवढी भिजायला हवी.
कैरीचा किस, खवलेला नारळ साधारण १:२ प्रमाणात मिक्स करावा.
बिजलेली डाळ फुडप्रोसेसरच्या चिरण्याच्या पात्यातून काढावी - जराशी भरड. (मिक्सर मधुन काढु नये. मेण होते त्याचे)
भरपूर हिंग, मोहरी , हळद तेलाच्या फोडणीत, कढीपत्ता + लालमिरची टाकावी आणि सगळे एकत्र एकजीव करावे. वरून भरपूर बारिक चिरलेली कोथींबिर

गजानन- सुगरणी यायच्या आत लवकर कॉपी कर. मी इथुन उडवणार आहे.

वाटली डाळ :

साहित्य:
चणाडाळ - २ वाट्या
हिरव्या मिरच्या - ३ ते ४
धणे-जिर्‍याची पावडर - २ चमचे
२ लिंबांचा रस
मीठ, साखर चवीनुसार
ओलं खोबरं - अर्धी वाटी
फोडणी साठी - दोन डाव तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद.
बारीक चिरलेली कोथिंबीर - पाव वाटी

कृती:
चणाडाळ स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात भिजत घालावी. दुसर्‍या दिवशी सकाळी पाणी उपसून टाकावे. मग भिजलेली डाळ आणि मिरच्या मिक्सरमधे खडबडीत वाटाव्यात. वाटताना पाणी घालावे. मिश्रण इडलीच्या पीठापेक्षाही घट्ट असावे. एखाद-दुसरा डाळीचा दाणा अख्खा राहू द्यावा. वाटलेल्या मिश्रणात मीठ, साखर, लिंबाचा रस, धणे-जिर्‍याची पावडर घालून एकजीव करावे. चव बघून आणखी तिखट हवीशी वाटल्यास लाल तिखट घालता येईल. मग ते मिश्रण एका भांड्यात घेऊन कूकरमधे ठेवून कूकरच्या तीन शिट्या कराव्यात. कूकरची वाफ गेल्यावर कढईत तेल घेऊन खमंग फोडणी करावी. आणि त्या फोडणीत हे डाळीचे मिश्रण घालावे. जरा परतून त्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालावी. मग डाळ पूर्ण मोकळी होईपर्यंत परतत बसावे. हात दुखतात खूप पण कष्टाचे फळ नेहमी समाधान देते. Wink

माझाही रैनासारखाच गैरसमज झाला होता. मंजे काम चांगले केलेस फक्त पाकृ योजाटा तर भविष्यातल्या गैरसमजी लोकांचे गैरसमज दुर होतील. मला आंबाडाळ आवडत नाही अजिबात. कच्ची चणाडाळ खाताना घोडी झाल्यासारखे वाटते. Happy

दोन डाव तेल??? म्हणजे चांगले १० एक चमचे तेल होईल की...

अगं हो की मंजू.
इकडे आंबाडाळ म्हणतात ना? विसरलेच होते. थँक्स.

साधना- वाफवलेल्या डाळीला लागतेच तेल. नाहीतर चिकटते खूप. म्हणून तर करत नाही. Happy

मी पण आधी वाफवून घेत नव्हते. पण इथेच जुन्या मायबोलीवर नलिनीची डाळ वाफवून घेण्याची युक्ती वाचली आणि अंमलात आणली. वाफवून घेतली की डाळ परतायचे कष्ट कमी होतात. कारण डाळ आधीच शिजलेली असते, ती फक्त कोरडी-मोकळी करायची असते. Happy

डाळ पूर्ण मोकळी होते का पण?

मोरी डाळ अभी झुणका होणे के मार्ग पर चल रही है ऐसा मेरा अनुमान है. तरी मी शिजवून घेतलेले नाही.

जोरात हलवत रहा गजाभौ. हाताला रग लागली पाहीजे.तेल टाक थोडंसं अजून. पूर्ण मोकळी होते. पिठलं होतय म्हणजे प्रॉब्लेम आहे. Proud

पिठलं होतंय>>> म्हणजे डाळीत पाणी राहिले होते वाटताना. आणि डाळ जास्तच बारीक वाटली गेली असेल. दरदरीत वाटायची. Happy

हायला हे सगळे वाचुन मला जाम उत्सुकता लागलीय.. अब मै बी करुंगी और पिठलं होने के मार्ग पे जातेजाते अचानक ट्रॅक चेंज करके डाल वाटली डाल के मार्ग पे कैसे जाती है वो देखुंगी.

ह्म्म्म्म, तिसर्‍या फोटोत डाळीत पाणी राहिल्याचे दिसतेय. Happy
पण शेवटचा फोटो झक्कास आला आहे.
(आज करून खावी काय? )

चांगला प्रयत्न गजाभौ... ठेवा ते वर Happy

गो गजा! मस्त दिसतेय डाळ... Happy

फक्त प्राची म्हणाली तसं पाणी कमी चालेल. ही शिर्‍यापेक्षाही मोकळी होते. पण खूप म्हणजे खूप म्हणजे खूप परतावं लागतं.

मी करते ही डाळ. माझ्या गुजराथी मैत्रिणीला खायला दिली.तिने हे काय?विचारल्यावर मि तिला सांगितले हा चणा डाळीचा उपमा आहे. तिला खूप आवडला.मी फोडणित कढीलिंबाची पानेही टाकते.

वाटली डाळ :

साहित्य:
चणाडाळ - २ वाट्या
ओल्या हिरव्या मिरच्या - ३ ते ४
आल्याचा तुकडा - २ इंच
लिंबाचा रस - २ चमचे
मीठ, साखर चवीनुसार
ओलं खोबरं - अर्धी वाटी (ऐच्छिक)
फोडणी साठी - दोन डाव तेल, मोहरी, हिंग, हळद, कढिलिंब (कढिपत्ता).
बारीक चिरलेली कोथिंबीर - पाव वाटी

कृती:
चणाडाळ स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात भिजत घालावी. दुसर्‍या दिवशी सकाळी पाणी उपसून टाकावे. मग भिजलेली डाळ, मिरच्या आणि आलं मिक्सरमधे भरड वाटावे. वाटताना थोडेसे पाणी घालावे. मिश्रण आम्रखंडाइतकं घट्ट असावे. कढईत कडकडीत तेल तापवून खमंग फोडणी करावी. आणि त्या फोडणीत हे डाळीचे मिश्रण घालावे. फोडणी सगळ्या डाळीला लागेल इतकं जरा परतून कढईवर थाळी ठेवावी. एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. झाकण काढून त्यात चवीपुरते मीठ व साखर घालून, परत जरा परतून कढईवर झाकण ठेवावे. थोड्यावेळाने डाळ फुललेली व मोकळी झालेली दिसते. त्यात ओलं खोबरं (ऐच्छिक), लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी. परत एकदा ढवळून गॅस बंद करावा.

मी डाळ परतताना थोडी परतली कि त्यात १/२ चमचे कणीक घालते बाकी कृति नेहमीप्रमाणे...तयार डाळीमधे मऊ पणा रहातो..घशात रुतत नाही..तसेच फोडणीत भरपुर आले किसुन घालते..त्यामुळे चव छान लागते अन पचनाला हलकी..मप्र. मधे भुट्ट्याचा किस वाटल्या डाळी सारखाच करतात..त्यात अशीच चमचाभर कणीक घालतात..खुपच मऊ रहातो..बाठरत नाही..

मस्त. मक्याची उसळ पण अशीच. आधी न वाफवून घेता. या डाळीबरोबर दही मस्त लागते. किंवा दही भाता बरोबर डाळ? पोळीला लावून पण.

आज गणेश विसर्जन.आम्ही नास्तिक असलो तरी वाटल्या डाळीचा प्रसाद मनसोक्त खातो.
माहीतीसाठी धागा वर काढला.