ममी रिटर्न्स

Submitted by श्रद्धा on 8 July, 2008 - 02:21

(लई झाली मराठी आणि हिंदी सिनेमांची चिरफाड.)
.
एकतर हिंदीमध्ये संवाद डब केल्याने काही बाबतीत माझा गोंधळ झाला होता. ज्या सेनेसाठी ममी आरामशीर थडग्यातून उठून येतो ती सेना नक्की कुणाची याबद्दल. अनुबिस कोण आणि स्कॉर्पियन किंग कोण, की ते दोघं एकच असून स्कॉर्पियन किंगला सिझोफ्रेनिया आहे, त्यामुळे तो कधी अनुबिस तर कधी स्कॉ किं असतो असे नाना विचार मनात येऊन गेले. शेवटी चार वेळा सिनेमा पाहिल्यावर आज विकिपीडियावर कथानक वाचले. असो.
.
अन्क-सू-नमून ही आदल्या जन्मात इम्होटेप पकडला गेल्यावर 'मेरी रुह अब तुम्हारे राजा की गुलाम नही है' (काय पण हिंदी सिनेमास्टाईल!) म्हणत सुरा खुपसून जीव देते.
कट टू आत्ताचा जन्म. क्लायमॅक्स सीन.
इम्होटेप आणि रिक दोघेही पाताळाच्या काठाला लटकत असतात. (तुम्हारे पैर कबर मे लटक रहे है. - अजून एक साजेसा हिंदी सिनेमास्टाईल डायलॉग.) तर हिंदी सिनेमांतल्या आदर्श नायिकेसारखी इव्ही येते आणि रिकला वर खेचायला लागते. ममी ते बघून अन्क्-सू-नमून ला साद घालतो. तर ही बाई चक्क पळून जाते. (ते प्रेम गेलं कुठे? की दरवेळी या इम्होटेपपायी मरायचीच वेळ येते, हे जाणवल्याने तिला नैराश्य आले? 'हम तुमपे मरते है' वगैरे अक्षरशः खरे व्हायची वेळ आल्याने कुणालाही नैराश्य येईल म्हणा.) यानंतर ममीच्या चेहर्‍यावरचे भाव अगदी हिंदी सिनेमाच्या हिरोला साजेसे (डोळ्यांतल्या अश्रूंसकट!).
.
स्कॉर्पियन किंगला मारतानाचा प्रसंग. ममी पाताळापर्यंत गेलेल्या भेगेच्या या कडेला असतो नि रिक आणि स्कॉ किं त्या कडेला. स्कॉ किं ला रिकने मारल्यावर मात्र पुढच्या सीनमध्ये ममी आणि रिक पाताळाच्या एकाच बाजूला लटकलेले दिसतात. ममी दु:खाने अलिकडच्या काठापर्यंत उडी टाकतो की काय नकळे!
.
ममीचे सैनिक किंवा 'मुर्दोंका शहर' मधले मुर्दे किंवा ती अनुबिस ची सेना 'माती असशी, मातीत मिळशी' ही उक्ती सार्थ करून दाखवतात. गोळी घातली की भुगा!
.
ब्रिटिश म्यूझियममध्ये ममीला 'उठवण्याचा' एवढा प्रयत्न चाललेला आणि बाकी कुणाला पत्ताही लागत नाही. तसेच त्या 'मंत्रांनी' बाकीच्या मम्याही जागृत व्हायला लागतात त्यांचे पुढे काय होते, तेही कळत नाही.
ममीचे सैनिक रिक आणि कंपनीच्या पाठलाग करताना म्यूझियमची भिंत फोडून बाहेर येतात तेव्हा त्यांना 'ह्ये नुस्कान तुझी ममी देनार है का भरून?' विचारायला एक साधा गार्डही नाही.
.
जोनाथन आणि ऍलेक्स दुमजली बस कुठून आणतात हेही एक कोडेच. की पाठलागापासून वाचायला यांना लागली तर असू द्यावी, म्हणून 'LMT' ने ती तिथे आणून ठेवलेली असते?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Order is for idiots. Genius can handle chaos.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'माती असशी, मातीत मिळशी' ही उक्ती सार्थ करून दाखवतात. गोळी घातली की भुगा! Biggrin
'ह्ये नुस्कान तुझी ममी देनार है का भरून?' विचारायला एक साधा गार्डही नाही. Rofl
बेष्ट श्रध्दा!

Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

दरवेळी या इम्होटेपपायी मरायचीच वेळ येते Lol

पण श्रद्धा तो गंगा जमुना सरस्वती पूर्ण बघायचा (आणि येथे लिहायचा) सोडून हे कशाला बघत बसलीस (ती ही हिन्दी व्हर्जन आणि ती ही चारदा)? आधी तो ब्याक्लॉग पूर्ण कर Happy

बाय द वे याचा तिसरा पार्ट चांगला वाटतो The dragon emperor का काहीतरी.

'ह्ये नुस्कान तुझी ममी देनार है का भरून?'
Rofl

बाय द वे याचा तिसरा पार्ट चांगला वाटतो The dragon emperor का काहीतरी.<<<<<<<
तो ऑगस्टमध्ये रिलीज होतोय. पण त्यात तो 'ममी' नाहीये. तेव्हा जाऊ दे. तो 'ममी' जाम हँडसम आहे म्हणून चारदा पाह्यला. Proud
.
गं ज स लागलाच नाहीय पुन्हा. कसा बघणार? Sad
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.

ममी ३ आला..................

मी रविवारी बघणार आहे...

.......................

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
अहं त्वाम सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श्रुचः ||

सर्व फिल्मान परित्यज्य ममी तीनम शरणं व्रज |
ममी त्वाम बोरफिल्मेभ्यो मोक्षयिष्यामि मा श्रुचः ||

Happy

मस्त लिहिलयस ग Happy
>> की दरवेळी या इम्होटेपपायी मरायचीच वेळ येते, हे जाणवल्याने तिला नैराश्य आले?
>> ह्ये नुस्कान ....
जब्बरीच एकदम Proud

मंड्ळी, ममीचा तिसरा भाग बघितला नसेल तर बघू नका, एकदम टुकार आहे

आणि मजा म्हणजे शांगरीला मध्ये यतींबरोबर राहिलेली अमर चायनीज चेटकीण रिक आणि एव्हीबरोबर इंग्लिशमध्ये बोलते Happy तिला काय कोकाटे फाडफाड शिकवायला गेले होते वाटतं Happy

अर्रे, वाचायचं राहूनचे गेलं होतं हे परीक्षण.
खल्लास Rofl

ह्ये नुस्कान तुझी ममी देनार है का भरून?' विचारायला एक साधा गार्डही नाही. >> Lol

LMT>> केवळ अ श क्य Rofl

सही.. Rofl