भेट अशीही असते
नको असतानाही होते
बरेच काही नकळतच
शिकवूनही जाते...
होतीस कधी तू माझे विश्व
होतो मी तुझे सर्वस्व
होतो का पण खरच तुला
पूर्णत्वाने मी ओळखत?
आज तू भेटलीस
तेव्हा जशी दिसलीस
आजपर्यन्त तशी मला तू
कधीच नव्हती भेटलीस
वाटले होते तू टाळशील
न ओळखल्याचे नाटक करशील
आक्रसून जाशील ,चोरटी होशील
कदाचित चिडशील,रागावशील
पण भेटल्यावरचे ते मोकळे हसू
प्रेमळ चौकशी आणि अचानकच
त्याची करून दिलेली ओळख...
हे मी कधीच नव्हते अपेक्षिले...
त्याचही ते मोकळे हसण
सहजतेने गप्पा मारण
सुखी सन्साराचे तुझ्या
चित्र रन्गले समोर माझ्या
दुखावलो मी मनात तरीही
दुराभिमानी असावे किती मी ही
मझ्याविनाही आहेस तू सुखी
हा विचार मला मानवला नाही
खरतर आहे मी ही सुखी
माझ्या छोट्याश्या सन्सारी
एकशब्दी अशी ओळख तिची
पण मी देऊ शकत नाही
इथेच हरलो आज मी
हार मला रुचली नाही
एवढा बदल घडवेन पण मी
त्याशिवाय तुला भेटणार नाही!!
भेट क्र.३
Submitted by prashansa on 7 July, 2008 - 15:23
गुलमोहर:
शेअर करा