भेट क्र.२

Submitted by prashansa on 7 July, 2008 - 14:49

तुझी आणि माझी भेट ही
गम्मतच आहे एक मोठी
याला 'भेट' म्हणायचे का
दुविधाच आहे मला मोठी
एकाच रस्त्याने जाता-येता
लागलो ओळखू एकमेका
शब्दही नाही बोललो जरी
अनाम नाते जुळले तरी...
रस्ते बदलले,सन्दर्भ सम्पले
मनात एकच शल्य राहिले
तुझ्याशी कधीतरी काहीतरी
एकदातरी मी का नाही बोलले?
अनेक वर्षानी पुन्हा एकदा
असेच अचानक सन्दर्भ नसता
एकमेका समोर आलो जेव्हा
क्षणातच ओळख पटली तेव्हा
हसून पण न थाम्बता
नेहमीप्रमणेच न बोलता
क्षणात तू दिसेनसा झालास
नकळतच दुखावून गेलास
न बोलल्याचे शल्य असून
मी तर साधी हसलेही नाही
कारण नसता अपेक्षा ठेवून
सध्या आनन्दाही घेतले नाही
परत कधी भेटलास तू जर
बोलेनच मी काहीतरी तर
नाहीच बोलू शकले जरी
हसून साजरे करेन तरी!!

गुलमोहर: