भेट क्र.१

Submitted by prashansa on 7 July, 2008 - 14:22

भेटण्यापूर्वी तुला विचार करत रहाते
विषय बोलण्याचे मनात ठरवत रहाते
पण रुचेल जो मला अन तुला
विषय असा सापडत नाही मला
आपली भेट होते जेव्हा
वादळ आपल्यात शिरते तेव्हा
आपणच आपल्या नकळत जेव्हा
वाट त्याला देतो तेव्हा
सुरुवतीला तुही सावध असतोस
चाचपडत हळूवारपणे बोलतोस
काही विषय खुबीने टाळतोस
त्यातूनच तू मला दुखावतोस
वादळ शमता शमत नाही
थाम्बवू म्हणता थाम्बत नाही
ते जेव्हा सरते तेव्हा
आपण मित्र रहात नाही
'परत नाही भेटायचे' ठरवते
तुला टाळण्याचे बहाणे शोधते
तरीही नकळत कुठेतरी मी
पुढच्या भेटीची वाट पहाते....

गुलमोहर: