गोठलेल्या शब्दांचं गीत

Submitted by नादखुळा on 9 May, 2011 - 02:28

हजार पाने उलटून गेली..
काही भरलेली काहिशी कोरीच..
पण तरीही आज मनात
वेड्यासारखी घुटमळणारी एक आस आहे,
राहून राहून वाटतं,
तु कुठेतरी आसपास आहे..

मग माझं मलाच कळतं..
हा तर तुझ्या माझ्या
अंतरासवे छळणारा भास आहे..

राहूदेत रे,

हिच भासांची दुनिया आज मला,
तुझ्यापेक्षा जास्त ओळखीची वाटते,
तुझ्या प्रत्येक चोरट्या कटाक्षाला,
मिठीतल्या उबदार स्पर्शाला अनुभवताना,
मी क्षणाक्षणाला मोहरते..लाजते..

पैंजण घुंगरांची हि कुजबूज
अजूनही माझ्या अवाक्यात नाही,
तुझ्या वाटेवर दूर दूर धावताना,
सावलीचा पाठलाग किंवा
उन्हाशी वैर घेणं आजही सुचतही नाही..

बघ ना..

मला कायमची वेडी ठरवून,
पांगलेले कितीतरी दिसतील,
पण, दिसेल का रे तुला?
माझ्या वेडेपणात एकजुट
वेडावलेली तुझ्यावरची प्रीत,
वेडावलेलं संगीत आणि थरथर ओठांवरती,
गोठलेल्या शब्दांचं गीत ?

-- न्नादखुळा

गुलमोहर: 

>> तुझ्या वाटेवर दूर दूर धावताना,
सावलीचा पाठलाग किंवा
उन्हाशी वैर घेणं आजही सुचतही नाही.. >>
हे आवडलं