Submitted by अज्ञात on 7 July, 2008 - 01:17
चित्र पहातांनाही खळबळ
उरात उठते वादळ
श्वास वाहतो वारा
डोळ्यामधून झरतो ओघळ
खारे पाणी गोड आठवण
हळहळते मेघावळ
मुठीतले अवशेष रेशमी
जुनीच ती गुंतावळ
फिरतांना वळतो मागे
ह्या बंद कुपीतिल दरवळ
मी आहे त्या तिथेच अजुनी
धावते सनावळ
...................अज्ञात
१२७३,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
फिरतांना
फिरतांना वळतो मागे
ह्या बंद कुपीतिल दरवळ
मी आहे त्या तिथेच अजुनी
धावते सनावळ
>>> मस्त!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
आशु, कौतुका
आशु,
कौतुकाचे आभार !
...............अज्ञात
सुरेख
सुरेख कविता!!!
वाय के
वाय के के,
किती बरं वाटलं तिला म्हणून सांगू ! तिला वाटलं म्हणून मला आनंद झाला. धन्यवाद !!
........................अज्ञात
अज्ञात
अज्ञात छानच आहे कविता. थोडी दुरुस्ती सुचवू का?
कविता मीटरमध्ये असली तर अजून छान वाटले असते वाचतांना. पहिले कडवे माझ्या मते असे बदलले तर?:
चित्र पाहता उठते खळबळ
उरात चाहूल घेते वादळ
श्वासामधूनी वाहतो वारा
नयनद्वयांतून झरतो ओघळ...
आगाउपणाबद्द्ल माफी असावी, सुरेख आहे कविता.