नंगे सत्य

Submitted by अज्ञात on 7 July, 2008 - 01:10

नाही अंकुश पळे वय पुढे
मन फरपटते मागे
खरचटते कधि हळहळते
सुटतांना रेशिमधागे

हिरवळकाठावर झुलणारे
सण पहातांना अवघे
खोड जून तरी स्वप्न उरातिल
असते अखंड जागे

गुदमरतो काळजात दरवळ
सयी सोबती संगे
कल्पनेतले द्वंद्व मुके
डोळ्यातिल काजळ रंगे

हवेत वारा; वारा अवखळ
फिरतो शोधित भुंगे
थकल्या गात्रांमधेही दंगे
सत्य असे हे नंगे

....................अज्ञात
१२७२,नाशिक

गुलमोहर: 

मस्तच!
<<कल्पनेतले द्वंद्व मुके>> मधल्या मुके वर कोटी आहे का हो? Wink