Submitted by मी मुक्ता.. on 6 May, 2011 - 00:05
हे म्हणजे भलतंच...
माध्यम आलं म्हणजे माध्यमाची चौकट आली..
बंधनं आली..
गावाला पोहचणं लांब राहिलं..
गाडीचा मेंटेनंस आणि वाहतुकीच्या नियमांनीच जीव काढलाय..
बरं सगळं असच असावं ना मग.
तर ते ही नाही..
अफाट वेगाचं वेड घेवुन दर्याखोर्यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ,
आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक
यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय..
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..
गुलमोहर:
शेअर करा
वाहवा!
वाहवा!
धन्यवाद ह.बा.
धन्यवाद ह.बा.
(No subject)
खरंच का ग .....?
खरंच का ग .....?
मुक्ता, कविता चांगलीये, पण
मुक्ता,
)
कविता चांगलीये, पण काही गोष्टी पटल्या नाहीत (किंवा झेपल्या नसतील, तसं असेल तर आपण प्रकाश टाकावा.
गावाला पोहचणं लांब राहिलं..
शेवटी ते पाळलं नाही, तर गावाला सुखरूप पोचणार तरी कसे? सगळं असंच असावं ही अपेक्षा मात्र चांगलीये.. 
गाडीचा मेंटेनंस आणि वाहतुकीच्या नियमांनीच जीव काढलाय..
बरं सगळं असच असावं ना मग.
तर ते ही नाही..
>>>> गाडीचा मेंटेनंस आणि वाहतुकीचे नियम जरी जीव काढत असले तरी एका अर्थाने ते जीव वाचवतात पण नाही का?
अफाट वेगाचं वेड घेवुन दर्याखोर्यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ,
आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक
यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय..
>>>> ह्म्म्म्म.. अफाट वेगाच्या वावटळ सारखी "बेफिकिरी" जोपर्यंत दर्याखोर्यात आहे, तोवर ठीक. मनुष्यवस्तीत घुसली तर विध्वंस ठरलेलाच..
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..
>>>> हे आवडलं.
ऋतूवेद, के अंजली.. खूप खूप
ऋतूवेद, के अंजली..
खूप खूप आभार.. 
निवडुंग,
नियम आणि मंटेनंस जीव वाचवण्यासाठी बनवलेत पण ते ज्यासाठी बनवलेत, दे आर नो मोअर सर्व्हिंग दॅट पर्पज. असा अर्थ आहे.
ती दर्याखोर्यात ठिक आहे. आहेच. आणि तिला दर्याखोर्यातच रहायचं असतं. पण वावटळीला मनुष्यवस्तीत रहाण्याची किंवा त्यांच्या नियमांनी वागण्याची सक्ती असेल तर? ती नियमांनी वागली तर तिची घुसमट. तिच्या वृत्तीने वागली त विध्वंस. इकडे आड, तिकडे विहीर अशी गत आहे..
प्रतिसादाबद्दल आभार.
नियम आणि मंटेनंस जीव
नियम आणि मंटेनंस जीव वाचवण्यासाठी बनवलेत पण ते ज्यासाठी बनवलेत, दे आर नो मोअर सर्व्हिंग दॅट पर्पज. असा अर्थ आहे.
>>>> आपल्या आधीच्या ओळीत "गावाला पोचण्याचा" संदर्भ होता, म्हणून हे नियम (की निर्बंध?) जरी जाचक वाटत असले तरी ते पाळावे लागतील/लागतात असा अर्थ घेतला होता. त्यामुळे त्यांचा पर्पज सर्व्ह होत नाही हे तितकसं प्रतीत झालं नाही असं वाटलं.
वावटळीचा मुद्दा पटला. धन्यवाद..
असं इतकं खरं कसं लिहू शकतं
असं इतकं खरं कसं लिहू शकतं कोणी!! भिडलं अगदी!
निवडुंग, गावाला पोचायचं आहे
निवडुंग, गावाला पोचायचं आहे आणि आता ते पोचणच लांब राहिलय हे नमूद केलय मी..
असो.. धन्यवाद..!
खूप आभार प्रज्ञा..
>>जगण्यासाठी शरीर हे भलतच
>>जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे>> एक्क नंबर
धन्यवाद पल्ली..
धन्यवाद पल्ली..
वाह!!!! खतर्रनाक!!! खूप खूप
वाह!!!!
खतर्रनाक!!! खूप खूप आवडली...
असंच लिहित रहा...
ही पण छान. उशीरा वाचली.
ही पण छान. उशीरा वाचली. पुस्तक ड्यू आहे ग.
अफाट वेगाचं वेड घेवुन
अफाट वेगाचं वेड घेवुन दर्याखोर्यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ,
आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक
यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय..
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..
उत्तम !!
हात्तिच्या मारी.....साष्टान्ग
हात्तिच्या मारी.....साष्टान्ग दण्डवतच घालायला लावनार व्हय?????
या विचारात अध्यात्मविचार आहे.
या विचारात अध्यात्मविचार आहे. हा कवयत्रीला अपेक्षीत आहे का ?
जगण्यासाठी शरीर हे भलतच
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे.. >> अगदी खरंय.. पर्याय नाही
नवीन प्रतिसादकांचे खूप खूप
नवीन प्रतिसादकांचे खूप खूप आभार...
अश्विनीमामी, काही कळलं नाही.. कोणतं पुस्तक?
अनमिका, दंडवत वगैरे काही नको हो. आपलं कौतुकच पुरेसं आहे..
नितीनचंद्र, चला, कोणीतरी हा उल्लेख केला.. मला अपेक्षित होता..
अतिशय छान कविता
अतिशय छान कविता
फार छान कविता.
फार छान कविता.
छ्या... जगण्यासाठी शरीर हे
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..
तुमच्या चिंतांनाचा ,भावनेचा फोर्स समजला .पण मग जगण्याचं सर्वोत्तम माध्यम कोणते ?
कविता खूप आवडली ॰
सर्वांचे खूप खूप आभार...
सर्वांचे खूप खूप आभार...
कमलाकर, तेवढं कळलं असतं तर मग अजून काय हवं होतं..
याचं असं आहे की प्रत्येकाने आपापलंच उत्तर शोधायलं हवं. एकाचं दुसर्याला चालत नाही..
आणि माझं अजून मिळालय की नाही कळत नाही...
शेवटच्या ओळीने मी गारद झाले
शेवटच्या ओळीने मी गारद झाले अक्षरश: .... !!
अशक्य कल्पना आहे.. सुन्न अनुभव
वाह ! भन्नाट कविता
वाह ! भन्नाट कविता !

जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..
नाही समजलं
खरंय अगदी. सुंदर कविता
खरंय अगदी. सुंदर कविता
छान ! आवडली कविता !! <<
छान ! आवडली कविता !!
<< जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे.. >> आणि << शरीरासाठी जगणं आतां गैसोयीचं बंधन झालं आहे > > या दोन मनःस्थितींमधला काळ म्हणजे खरं ' जगणं' असावं, असा विचार मनात चमकून गेला !
खूप खूप आभार सर्वांचे..
खूप खूप आभार सर्वांचे..
अनिल, अहो, आतल्या भावनांना, उर्मीला जगण्यासाठी, भोगण्यासाठी शरीराचं जे बंधन आलय त्यातली घुसमट आहे ही. म्हणून म्हटलय की शरीर गैरसोयीचं आहे..
भाऊ, व्वा..! क्या बात कही है..! लई भारी..
छ्या... जगण्यासाठी शरीर हे
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे.
मुकताजी ,माझ्या प्रतिक्रियेवरची आपली प्रतिक्रिया उशिरा वाचली .आपल्या म्हणण्यातील भाव मी समजू शकतो .त्यामुळे फालतू प्रतिवाद मी करत नाही .आणि मला ते मुळात आवडत नाही .चिंतनाच्या काही पाकळ्या मोकळ्या व्हाव्यात म्हणून थोडासा(आत्म )संवाद ..
" .छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे""
हे ही सांगण्यासाठी शरीर हेच सर्वोत्तम माध्यम नाही का ? "त्या "निर्गुण परमात्म्याला सुद्धा जेव्हा जीवनाचा आणि जगण्याचा आनंद घ्यायचा असतो तेव्हा तो शरीर हेच माध्यम निवडतो .सर्व भाव फक्त शरीरावरच उमटू शकतात .आपल्यासारखे प्रतिभावंत त्या भाव भावनांना ,घुसमटीला शब्दरूप देतात .त्यासाठीही शरीरच लागतं .ज्ञानोबा माऊली शरीराचा कमाल लाभ सांगताना म्हणतात "या कारणे मी बोलेन !बोली अरुपाचे रूप दाविन !अतींद्रिय परी भोगविण !इंद्रियांकरवी !! माऊलींची ही ओवी म्हणजे शरीरासंबंधीचे कमालातले .कमाल आकलन होय .
मानवी शरीर ही कुठल्याही भावभावनांना शब्दरूप देऊ शकणारी धमाल आणि कमाल अशी गोष्ट आहे ".क्षमस्व" .
माझे आकलन चुकल्यास .शरीरासंबंधीची तुमची मानसिक घुसमट मी समजू शकतो .माझीही घुसमट त्याहून वेगळी नाही .
मुकताजी ,पान नंबर दोनवरची
मुकताजी ,पान नंबर दोनवरची प्रतिक्रिया पहावी .
कमलाकर साहेब.. छानच बोललात..
कमलाकर साहेब..
छानच बोललात.. सगळं मान्य. पण सध्या शरीर हे एकच माध्यम ज्ञात असल्यामुळे ते सर्वोत्तम मानावच लागेल. कोण जाणे कदाचित अजून काही उपलब्ध आहे की नाही? असो.. मलाही वाद नकोच आहे.
एका मनःस्थितीतून बाहेर आलं की शरीराला पर्याय नाही हे ही पटतच हो.. पण एखादी एखादी वेळ येते आणि आपण लिहून जातो.. 
Pages