Wall E

Submitted by लालू on 30 June, 2008 - 00:00

Wall E - चांगला आहे. 'ग्रेट' नाही आहे. ऍनिमेशन सुंदर आहे, प्रश्नच नाही. पण ते सुरवातीला जेव्हा वॉल ई पृथ्वीवर असतो तेव्हा आणि काही स्पेस मधले सीन्स आहेत त्यात. वॉल ई आणि ई sss व्हा ss च्या बॉडी लॅन्गवेज आणि डोळ्यांमधून भावना छान दाखवल्या आहेत. नंतरच्या भागात ऍनिमेशन काही खास नाही, नेहमीसारखे. वॉल ई कडे बघून थोडी 'शॉर्ट सर्किट' मधल्या रोबोची आठवण येते. मुख्य दोन्ही पात्रे क्यूट आहेत आणि पाळलेले झुरळ पण. संवाद फारसे नाहीत तरीही काही प्रसंग छान, निखळ विनोदी आहेत.
लांबी तशी कमी आहे, आणि अचानक संपतो. सगळे पृथ्वीवर परत येतात त्यानंतर पुढे अजून काही घडावं अशी लोकांची अपेक्षा असते पण तिथेच संपतो. थिएटरमध्ये पाहिल्यामुळे ते जाणवले.. 'ह्म्म, ओके' अशी सगळ्यांची प्रतिक्रिया. मुलांना आवडतो.
आधी एक 'प्रेस्टो ऍन्ड द बनी' नावाची पिक्सारचीच शॉर्ट फिल्म दाखवतात, ती मस्त आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म... असंय होय !

***
Insane : When you're crazy and it bothers you.
Crazy : When you're insane and you like it.

लालु, तुम्ही अंतिम श्रेयनामावली नाही पाहिली का? त्यामध्ये सर्वजण मिळुन सिव्हीलायझेशन पुन्हा उभी करतात असे दाखवले आहे. मला व्यक्तिशः वाल्-ई आवडला.आणि माझ्याबरोबर आलेल्या सर्वानाच आवडला.

श्रेयनामावली पाहिली हो. पण तोच भाग मूळ चित्रपटात का नाही घेतला? चित्रपट फार मोठा नाही, मग अजून १० मिनिटं वाढला असता तर चाललं असतं, पुन्हा चांगलं ऍनिमेशन दाखवायची संधी होती. आणि नामावली वाचायची की त्यातून स्टोरी घ्यायची? चित्रपट वाईट मुळीच नाही, पण रिव्ह्यूज मध्ये त्याचं जेवढं कौतुक केलं होतं, तसा तो नाही.

WALL-E बघितला. ओके वाटला खुप ग्रेट नाही. तुकड्या तुकड्याने आवडला. त्यामुळे या मोसमातल्या (उन्हाळ्यातल्या) बेस्ट animation चा मान कुंग फु पांडा लाच Happy २ वेळा बघुन पण परत बघावासा वाटतो. Happy

कुणी वॉल-ई( Wall-E ) पाहिला का?
डिस्ने चे चित्रपट मला आवडतातच. हा तर खूप आवडला. दोन रोबोंची प्रेमकहाणी खूप मस्त वाटली. चित्रपटाची कथाही खूप भावली. ऍनिमेशन्पट असूनही खूप सुंदर आणि भावूक चित्रपट आहे. कथा उलगडत जाते तसतशखुपकड घट्ट होत जाते.

वॉल-ई च्याआसगळ्या गमति जमती खूप मजा आणतात.

अवश्य पहा!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

कालच स्टार मुव्हीज वर WELL-E नावाचा चित्रपट पाहीला.....तसा लहान मुलांसाठी आहे.....पण मोठ्यांनी हि बघायला हवा....तसा मी उशीरा ने चालु केलेला...त्या मुळे सुरवात मिळाली नाही........

थोडक्यात कथानक असे होते की... पृथ्वी वर आता मनुष्यवस्ती नाही आहे....ती दुसरी कडे अंतराळात एका मोठ्या यानात राहते...पृथ्वी वर जिवन आता राहीलेले नाही....नाही कोणती वनस्पती अस्तित्वात आहे....पृथ्वी वर आता फक्त रोबोट राहतात....जे स्वतःची कामे स्वतः करतात..त्यात एका कचर्‍याच्या गोदमात well-e नावाचा रोबोट कचर्‍याचे ढीग बनवण्याचे काम करत असतो..त्यात जाणिवा पण दाखवली आहे..

एके दिवशी त्याला काम करत असताना एक छोटेसे रोपटे मिळते....अचानक पणे मिळालेल्या या गोष्टीचा सांभाळ तो निट करु इच्छीतो..त्याला नीट ठेवुन तो परत कामाला लागतो...काही दिवसांनी एक यान तिथे उतरते.....आणि त्यातुन एक रोबोटिन येते ( हिरोईन हवी ना) ती सतत काही ना काही शोधत असते.....वेली तीच्या प्रेमात पडतो....इवा नाव तिचे ठेवतो.....रोबोट चे हावभाव अत्यंत सुरेख दाखवले आहे.....काही ही वाक्या नसुन सुध्दा ते काय बोलु इच्छीतात ते कळते...एक दिवस तिला तो ते रोपटे दाखवतो.....आनि ति अचानक ते रोपटे घेउन बंद होते....बाहेर गेलेल्या मनुष्याने तिला पृथ्वी तर काही जीवन आहे का हे शोधन्या साठी पाठवलेले असते...तिच्या अचानक बंद झाल्यामुळे वेली अस्वस्थ होतो..तीला घेउन जानार्‍या यान मधे चोरुन तो शिरतो आणि तिच्या पाठोपाठ अंतराळात जातो... जीथे मनुष्या राहतो तिथे आता सगळे नियंत्रण रोबोट च्या हातात असते...रोपटे भेटल्या वर खरे तर मनुष्यांना पृथ्वी वर परत यायचे असते......पण तिथे नियंत्रण करनारे रोबोट यास विरोध करतात...इथुन वेली - ईवा यांची लढाई इतर रोबोट यांच्या विरुध्द सुरु होते...गडबड गोंधळ करत शेवटि विजय मिळावुन.....मनुष्यास परत पृथ्वी वर घेउन येतात.....

या चित्रपटात........जे काही अनिमेशन केले आहे त्यास तोड नाही.....हाव भाव.....इतके सुरेख आहे कि.....एक रोबोट समोर उदास होत आहे हे जाणवते...

सुंदर...चित्रपट आहे......रोबोट असुन सुद्धा जी जाणिवा मनुष्याला असायला हवी......ती त्याला आहे..
रोबोट च्या नजरे हा चित्रपट आहे...मनुष्यांमुळे उध्वस्त झालेली पृथ्वी एका रोबोट मुळे परत हरीत होते.......

मस्त आहे की सिनेमा. त्यात अमेरिकन जीवनशैलीवर थेट टिप्पणी आहे. नुसते खात बसून राहणारे जाडे अमेरिकन आजकाल सर्वत्र दिसतात. मशिन्सवर जास्त अवलंबून राहणे. व्यायाम आजिबात नाही. रेडीमेड जेवणे त्यात पोषण मूल्ये नसणे. ती शहरे शेवटी कचरा बनून जाणे, सर्वव्यापी कॉर्पोरेशन्स जे तुमची विचार करण्याची शक्तीच हिरावून नेतात व तुमचे जीवन पूर्णपणे रेग्युलेट करतात. त्यातील तो ऑटोमेटिक पायलट स्पेसशिप मधला व्हिलन दाखविला आहे. मानवी सदसद्विवेक बुद्धी न वापरता मशीन्स द्वारे सर्व कामे करून घ्यायची ही मानसिकता दाखविली आले. याची उदाहरणे खूप सापड्तील
ड्रोन अ‍ॅटॅक्स वगैरे. त्यात लोकांचे बसून खाल्ल्यामुळे शरीर कसे खराब होत जाते ते दाखविले आहे ते फार रंजक व मुलांना अगदी समजण्यासारखे आहे. अ‍ॅनिमेशन जबरदस्त आहे. बुटात उगवलेले छोटेसे झाड म्हण्जे नवीन जीवनाची सुरुवात आहे. सिविलायझेशन दहा मिनिटात रिबिल्ड झालेले कसे दाखविणार.
पण यात मुलांसाठी ग्रीन जीवनशैली अंगिकारण्याचा सुरेख मेसेज आहे. वॉली इव्हा चा स्पेसमधील रोमान्स सुरेख दाखविला आहे. इव्हा त्याच्या पासून कितीतरी पटीने प्रगत आहे. ती त्याच्या घरी येते तेव्हा ते मस्त लक्षात येते. व तो बिचारा फार वेळा मार खातो. एकटे राहणारे गोड स्वभावाचे माणूस,
ज्याच्या पुढे कामाचे लक्ष डोंगर आहेत व जे काम शेवटी खरेतर कचराच आहे अश्या सामान्य, थोड्याश्या
आउटडेटेड माणसाचे वाली हे प्रतीक आहे. तो नव्या घातक, त्याच्या कंट्रोलच्या बाहेर असणार्‍या घाबरतो
हे अगदी पट्ते. पिझा बर्गर साठी हट्ट करणार्‍या मुलांना हा सिनेमा जरूर दाखवावा.