स्पिक एशिया यात गुंतवणुक योग्य आहे का?

Submitted by दादाश्री on 3 May, 2011 - 08:20

स्पिक एशिया नावाने सर्वे कंपनी नेट वर कार्यरत आहे , अंदाजे ३ महीन्यात पैसे दुप्पट देउ करत आहेत . सर्वे घ्या अन त्याबदल्यात रुपये तेही आमेरिकन डोलर मध्ये Happy काय आहे हे मदत करा .आम्ही लाखो रुपये कर्ज काढुन सरळ साधे व्यवसाय कष्टान करतो अन नफा जेमतेम . पण आस काही आल की सचोटीन काम करणारे तनं मनं लोभान भरकटतं. मग काय आसेल हा फंडा ? मित्रांनो कळवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy या .

पैसे दिल्यानंतर पैसे पण विसरा आणि दुप्पट पण .>>>

एकदम बरोबर!! या असल्या स्कीम वाल्या लोकाना उभे ही करु नये. आपल्याला शाहीर अनंत फंदी आधीच सांगून गेलेत " कष्टाची बरी भाजी भाकरी , तुपसाखरेची चोरी नको... संसारा मधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको."

माझा नवरा ऐकत नाहीये.. गुंतवायचे म्हणतो.. त्याच्या मित्राला म्हणे मिळले १५k.. १ महीन्यात..
Sad

वाचवा..मदत करा Sad

ओ, ही अ‍ॅड सारखी इकडे भारतीय चॅनल्सवर दाखवत आहेत.. आता समजलं यांचा फंडा.. बेटर नॉट टू गेट इन्वॉल्व्ड इन इट

माझ्या बहीणीच्या सरांनी गुंतवलेत पैसे ( १२,००० रुपये) आणि त्याना मिळाले परत (महिना ५०००), म्हणुन ते बाकीच्याना घ्यायला सांगत आहेत. सुरुवातीच्या काही लोकाना मिळतील आणि नंतर छू मंतर होतील असे वाटते. पण टी. व्ही. वरही ह्याची जाहिरात होते, त्यामुळे नक्की काय ते कळत नाही.

अनिल,
सुरुवातीला १२,००० भरायचे. दर आठवड्याला २ असे महिन्याला ८ सर्वे भरायचे ( कसले कोण जाणे). तुम्हाला दर महिन्याला ५००० मिळणार अशी मला मिळालेली महिती.

सुरुवातीच्या काही लोकाना मिळतील आणि नंतर छू मंतर होतील असे वाटते. <<< हो, असे आधीही झाल्याचे ऐकले आहे.

मी काहितरी वेगळच एइकून आहे...सर्वे करायचा असतो , मग तुमच्या काउंटला पैसे जमा होतात... ब्ला ब्ला ब्ला...

माझा अजिबात विष्वास नाहिये...

लोकहो कशाला असल्या फंदात पडताय , ती मारुतीच्या बेंबीची गोष्ट माहीती आहे ना ? असा कोण आहे या जगात जो विनाकष्टाचे फुकट पैसे वाटणार आहे, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुशिक्षित लोकच जास्त फसतात अशा स्कीमस मध्ये .
जागो जनता जागो.

ह्या आणी ह्यासारख्या पैसे गुंतवायला सांगणार्‍यांना, 'कंपनीच्या लेटरहेडवर 'य' वर्षात 'क्ष' रुपये तुम्हाला देऊ.' असं लिहुन द्यायला सांगायचं. कुणीही तयार होत नाही असं सांगितलं की. (स्वानुभव)

या कंपन्या पुर्ण फसव्या असतात.

याचा व्यवसायाचा कालावधी हा फार तर ४-५ महिनेच असतो. सुरवातिला सेल्स प्रमोशन साठी गुंतवणुक म्हणुन येणारा पैसा वाटला जातो तेही पुर्ण रक्कम दिली जात नाही तर त्याचेही स्लॅब असतात म्हणजे ५००० गुंतवले तर तिन महिन्यांनी ३००० + ३०००+ ४००० असे काहिसे असते. त्यातला पहिला हप्ता आणि फार तर दुसरा हप्ता वेळेवर मिळतो. यात त्यांना मिळणार्‍या पैश्याचे गणित एकदा करून पहा म्हणजे समजेल.

ही एक कंपनी पुण्यामधे होती
Easy Deals Sales & Services Pvt.Ltd.
http://www.consumercomplaints.in/?search=easy%20deals

मुंबईत पण 'रॉयल ट्विंकल', 'पॅन क्लब' ह्या नावाने अशा कंपन्या धुडगुस घालतच असतात. काही स्पेसिफिक मेंबर बनवले की आपल्याला पैसे मिळायला चालु होतं. मग ते मेंबर बनवण्याच्या नादात आल्यागेल्या सर्वांना पुराण ऐकवलं जातं.

आरे सगळ्यांचे मनःपुर्वक आभार. त्यां कंपनी ची वेबसाइट आहे. मी श्रीकांत यांना सहमत झालो Happy . इंद्रधनु ताइंना वाचवायला हवं .

मुंबईत पण १३-१४ वर्षांपूर्वी बेस्टच्या एका कर्मचार्‍याने अशी योजना काढली होती. सुरुवातीला काही लोकांना पैसे दुप्पट करून मिळाले. नंतर अर्थातच............

सत्यकाम , थोडे काय.. सरळ ११ हजार टाकावे लाग्तात आधी..

मग १० $ पर सर्वे, असे आठवड्याचे २ सर्वे.
महीन्याचे ८ कमीत कमी..

८०० $ म्हणे महीन्यचे.. विश्वास आहे का?
मुख्य म्हण्जे माझी हिम्मतच नाही...

आणी असले चीट 'फंड' च अस्तात.. त्यांच्या 'फंदात' पडु नये.. Sad
माझ्या नवर्याला कोण सांगेल हे देवा Sad

दर दोन तीन वर्षांनी आमच्या गावात काही केरळी लोक येतात आणी एक योजना सुरु करतात. आज शंभर रुपये भरा, तीन महिन्याने तीनशे रुपयांची भांडी घेऊन जा. सुरुवातीला लोकांचा विश्वास संपादन करायला भांडी देतात आणी मग एकदा भरपूर पैसे जमले की पोबारा करतात. या स्पीक एशिया बद्दल तर माझ्या भारतातल्या नातेवाईकांनी माझ्याकडेच पैसे मागितले आहेत, आज दोन लाख दे, तीन महिन्यात व्याजासकट परत करेन म्हणून :(. एकदा चटका बसून अक्कलखाती रक्कम गेली की मग शहाणपण येइल.

मलाही एकाने ही योजना चिकटवण्याचा प्रयत्न केला होता. थोडेसे गुगलुन पहातांना ही लि़ंक मिळाली. अत्यंत महत्त्वाची आणि सखोल माहीती दिली आहे.

http://www.india-forums.com/forum_posts.asp?TID=1671122

सॉलिड माहितीची काय गरज आहे? ३ महिन्यात पैसे दुप्पट म्हणजे ६ महिन्यात चौपट, ९ महिन्यात ८ पट व १२ महिन्यात १६ पट झाले. म्हणजे वार्षिक १५०० टक्के व्याज झाले. आज १ रूपया गुंतविला १ वर्षाने त्याचे १६ रूपये होतील. जेव्हा इतर कोणतीही संस्था वार्षिक ९-१० टक्क्यांच्यावर व्याज देत नाही, तेव्हा ही कंपनी वार्षिक १५०० टक्के व्याज कशी देऊ शकेल? त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे ते त्यांनी सांगितले आहे का? जर ते गुंतवणूकदारांना वर्षाला १५०० टक्के परतावा देऊ शकत असतील तर त्यांना तुमचे पैसे इतरत्र गुंतवून किमान १६०० टक्के परतावा तरी मिळायला हवा. तेव्हाच ते तुम्हाला १५०० टक्के परत देऊ शकतील. इतका जबरदस्त परतावा असेल तर १६०० टक्क्यांमधले १५०० टक्के इतरांना देण्याऐवजी ते स्वतःच सर्व गुंतवणूक करून सर्व १६०० टक्के स्वत:च कमवू शकतील! मग इतरांकडून कशाला पैसे गोळा करत आहेत?

जरा विचार करा. जगात इतके रिटर्न्स कोणी देऊ शकेल का? अगदी सोने, चांदी, शेअर्स किंवा खनिज तेलाच्या फ्युचर्स मध्ये पैसे गुंतवले तरी वर्षाला १५-२० टक्क्यांच्यावर रिटर्न्स मिळू शकत नाहीत. मग ही कंपनी कोठून पैसे आणणार?

हा फसवणूकीचाच प्रकार आहे. सुरवातीचे काही महिने ते विश्वास संपादन करण्यासाठी काही लोकांना ३ महिन्यात दुप्पट पैसे देतील. असे पैसे मिळतात अशी जाहिरात झाल्यावर अधिकाधिक माणसे पैसे गुंतविण्यासाठी पुढे येतील. एकदा भरपूर पैसे जमा झाले की ही मंडळी परागंदा होतील. फसवणूक करणार्‍या मंडळींची हीच मोड्यूस ऑपरँडी आहे.

विषाची परिक्षा घ्यायची असेल तर गुंतवा तुमचे पैसे.

फिर हेराफेरी देख्या नहीं क्या?..... मास्तुरेंच लॉजिक बरोबर आहे.... Happy

पण एक पटलं.... मध्यंतरी मुंबईत पैशाचा पाऊस पाडतो म्हणुन काही लोकांना गंडा घातला गेला होता. त्यावेळी वाटायचे लोक असे कसे काय फसतात. (फसु शकतात). पण शेवटी दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये. सो पब्लिक सावध...

बेस्टच्या शेरेकरने १९९४ च्या दिवाळीत २ महिन्यात दुप्पट रक्कमेची स्किम राबवली होती... तेव्हा मुंबईतील सामान्य नागरिक त्यात भरडला गेला होता... २ वर्षाच्या कोर्ट कचेरी नंतर लोकांना गुंतवणूकीच्या ५०% रक्कम परत मिळविण्यात यश लाभले होते...

२०००च्या सुरवातीला आलेल्या सिटि लिमोझिनने वर्षाला ४५% व्याज देऊन गुंतवणूकदारांची मने जिंकली होती... जुलै २००९ नंतर कंपनीचा मालक जेल मधे सडतोय...

एक लक्षात ठेवा... कष्टाला पर्याय नाही.

माझ्या एका ओळखीच्यांकडे जाऊन तासभर त्यांचे डोके खाऊन मिळालेली माहिती अशी-

Multinational कंपन्यांना Product concept / idea मिळण्यासाठी Market Survey हवे असतात. चालू बाजारात लोकांना काय हवे आहे ते बघण्यासाठी या मोठ्या कंपन्या स्वतः survey करू शकत नाहीत. त्यामुळे Speak Asia सारख्या कंपन्या ते करून देतात. यात त्यांचा फायदा असा की हजार surveys ना magnify करून लाखांच्या सर्व्हेमध्ये convert करून कंपनीला देणे आणि आपला फायदा असा की घरबसल्या एक सर्व्हे भरून देणे.

Multinational कंपन्यांची सर्व्हे ची Strategy पाहता Speak asia च्या लॉजिकबद्दल मला शंका नाही वाटत (I mean खरंच असे सर्व्हे लागतात कंपन्यांना, आणि त्यामुळे चतुराईने स्थापन झालेला हा मधला धंदा आहे - सर्व्हे भरण्याचा), पण पैसे परत मिळतील की नाही इ गोष्टी नाही माहित बुआ आपल्याला...

कधीही कुठल्याही गुंतवणूकीचा प्रस्ताव आला की ७२ चा नियम लक्षात घ्यावा. पैसे दुप्पट होण्यासाठी व्याज दर आणि काळ यांचा गुणाकार ७२ होणे गरजेचे. म्हणजे जर व्याज दर १२% असेल तर पैसे दुप्पट होण्यासाठी ६ वर्षे लागतील. सुरवातीला विश्वास संपादन करण्यासाठी म्हणून काही लोकांना पैसे कबूल केल्या प्रमाणे दिले जातात मात्र नंतर फसवणूकच वाट्याला येते. अशा पोन्झी स्किम्स नेहमीच येत असतात, वॉरेन बफे मात्र एकच असतो. आमच्या इथे २००८ मधे उघडकिला आलेली मोठी पोन्झी स्किम होती बर्नी मॅडॉफची! तेव्हा अशा प्रकारच्या स्किम मधे पैसे घालणार असाल तर त्याला गुंतवणूक म्हणून स्वतःची फसवणूक करुन घेऊ नका.

असल्या स्कीम्स बाबतीत हुरळून जाणं अतिशय सहज आहे. पण साधा कॉमन सेन्स आणि बेसिक लॉजिक वापरून बघा.

धरून चालूयात की एखाद्याकडे एक अतिशय स्मार्ट स्कीम आहे ज्यात खरोखरच ३ महिन्यात पैसे दुप्पट होतायत. तर तो भला माणूस जगाचं कल्याण कशाला करत बसेल? अगदी त्याने एका वर्षाकरता स्वत: दुसर्‍यांचे पैसे उसने घेऊन किंवा कर्ज काढून त्या स्कीममध्ये गुंतवले तरी तो स्वतः (कर्जाची रक्कम व्याजासहीत परत करूनही) रग्गड पैसा कमवू शकेल. मग तर त्याला तुमच्या पैशाचीही गरज राहणार नाही.

तुमच्या स्वत:कडे अशी काही जादू असती तर तुम्ही स्वतःचे पैसे दुप्पट केले असते की जगाचे करत फिरला असतात? इतका साधा विचार करा आणि पैसे गुंतवू नका.

हे लोकांचे पैसे दुप्पट करणारे आणि भोंदूबाबा यांत काहीही फरक नाही. 'दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये|'

यावरूनच आणखीही एक गोष्ट आठवली. हा इशाराही महत्त्वाचा. पूर्वी एका ऑफिसात काम करत होते तिथला एकजण एकदा आम्हाला विचारत होता की, तुम्हाला पैसे गुंतवायचेत का एका महिन्याकरता? दुप्पट होतील. अट फक्त एकच कुठे गुंतवलेत ते विचारायचं नाही. आम्ही कोणीही असल्या भलत्या भानगडीत पडलो नाही अर्थात. कारण हे पैसे ड्रग्जच्या धंद्याकरता वापरले जात असतील तर? किंवा बेटिंगकरता वापरले जात असतील तर? असाच विचार मनात आला.

तर, एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये पैसे दुप्पट होतायत म्हणजेच काहीतरी सॉल्लिड लोचा आहे याची खुणगाठ मनाशी पक्की बांधायची. There is no free lunch.

There is no free lunch. >> चूक, अनेक धार्मिक स्थळं, लंगर मधे लंच, डिनर फ्री असते Lol
जोक्स अपार्ट,

मास्तुरे, मामी >> अनुमोदन.

tumchya kona kade kivha gorvement kade hya product chi orignal complent aali ahi ka?

सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे, जर नुसता सर्व्हे भरुन देण्यासाठी जर का कुणी पैसे देणार असेल तर सुरुवातीला एवढेच भरा आणि तेवढेच भरा कशाला ? काही काळापुरते हे खरं मानलं की अनेक multinational कंपन्यांना असे सर्व्हे लागतात, आणि स्पीक्-एशीया त्या कंपन्यांच्या वतीने सदर सर्व्हे भरुन घेण्याचे काम करते व त्या बद्दल त्या-त्या कंपनीकडुन त्यांना परतावा मिळतो. पण तरी सुरुवातीला भरावे लागणारे रु. ११०००/ बद्दल दुरान्वयेही संबंध कळत नाही. ते न भरताही प्रत्येक सर्व्हे मागे संबंधीत व्यक्तीला त्या सर्व्हेची किमंत देता येईलच की.
त्यामुळे हे सर्व fraud वाटते.

मला स्पीक एशिया आणि राम सर्वे दोन्हीसाठी ११००० + ३५०० भरा असे म्हणणारी एक व्यक्ती काल भेतली होती... १५ तारखेनंतर स्पीक चा दर १५००० होणार आहे, लगेच भरा म्हणत होती..

Pages