भारुडाचा अर्थ

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'दादला नको गं बाई मला नवरा नको ग बाई' या भारुडाच अर्थ कुणी उलगडून सांगू शकेल का? माझ्या गंजलेल्या बुद्धी पलिकडलं आहे ते.

आगाऊ धन्यवाद!

प्रकार: 

परागकण, इथे हे अख्खं भारूड आहे. यातल्या शेवटच्या काही ओळी वाचल्या तर अर्थ लक्षात येईल.

एका जनार्दनी समरस झाले
( अग झालीस न समरस )

पण तो रस येथे न्हाई
मला दादला नको ग बाई !

नाथांच्या बहुतेक भारुडात हे एकटेच उरणे, समरस होणे दिसतेच.
भागाबाई काय, विंचू काय किंवा रोडगा काय. वरवर विनोदी वाटले तरी शेवटच्या दोन ओळीत खरा अर्थ कळतो.

दिनेशदा,

आपल्या मतांशि सहमत. काही काही भारुडांच्या अर्थाचा शोध घेताना संत एकनाथांना काय अपेक्षीत असाव याचा विचार करावा लागतो.

दादला आला म्हणजे संसार आला, मुल आली. अशी स्त्री देवाच नाव घ्यायला स्वतंत्र रहात नाही हे रुपक आहे.

दादला नको ग बाई या भारुडात संसारीक तापाने वैतागलेली स्त्री जीला अध्यात्माची ओढ आहे तिची नित्याची अवस्था काय आहे याच सुरवतीला वर्णन आहे.

पहिल्या कडव्यात संसारात काय काय भोगाव लागत याच वर्णन आहे. रोज तेच जेवण त्यात वैवीध्य नाही. रुचीही नाही याच वर्णन करताना दादला मध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात.

" कण्याची भाकर, अंबाड्याची भाजी
वर तेलाची धारच नाही मला दादला नको ग बाई.

ज्वारीच्या कण्या ह्या कुणी पिकवत नाही आणि विकतही नाही. या फक्त मागीतल्यावर दिल्या जातात. संसारात उत्पन्नाच साधन पक्क नसेल तर हे मिळेल ते खाउन रहाव लागत आणि त्यात दिवसभाराचा वेळ खुप जातो हे सांगण्यासाठीच्या या ओळी आहेत. अंबाडिची भाजी ही फुकट मिळणारी भाजी आणि त्यावर साध्या तेलाची अपेक्षा करावी तर ते ही नसावे.

फाटकच लुगड, तुटकीच चोळी
शिवायला दोरा नाही, मला दादला नकोग बाई.

अन्न, वस्त्र आणि निवारा या साध्या मुलभुत गरजा जर पुर्ण होत नसतील तर स्त्री आनंदी राहील का ? अश्या परिस्थीत कसल अध्यात्म ? संसारच नको ही भावना दृढ होईल.

दादला नको ग बाई, भवानी आई रोडगा वाहीन तुला आणि आईचा जोगवा मागेन ह्या तीनही भारुडातून संसाराचे पाश सुटावे,कामक्रोधादि रिपूंवर विजय मिळवता यावा आणि ईशचरणी एकरूपता साधता यावी अशी इच्छा व्यक्त केलेली दिसते. जोगव्यामधे तर विषयवासनांतून सुटका होऊन कुंडलिनीजागृतीचा (अत्युच्च शारीरसुखाचा) मार्ग मोकळा केला असा सूक्ष्म अर्थ जाणवतो.