Submitted by अज्ञात on 5 July, 2008 - 03:43
पंखहि माझे माझी ईर्षा
पिले उडाली गगनी
आकाशाची निळी पोकळी
भरली ओल्या सदनी
स्वप्नामधली तुम्हीच आशा
सजविण्यास ही अवनी
कितीही मारा उंच भरारी
पहा एकदा वळुनी
मेघ म्हणाला मी ही एकला
माझी तीच कहाणी
भरकटलो हरवलो लक्ष तरी घरी
सांगतो स्मरुनी
भोग असो वा योग
विरह गाठीत बांधला कसुनी
काही म्हणा गाभारा रिताच
मुळात सारे असुनी
.................अज्ञात
१२६९,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
आइ पासुन
आइ पासुन मुल दुर गेल कि होनारि तगमग मस्त व्यक्त केलिय !
ड्रीम, विषय
ड्रीम,
विषय पोहोचल्याचं समाधान झालं. धन्यवाद.
सुंदर. मला
सुंदर. मला वाटते अज्ञात, तुम्ही भावनेच्या एका एका कंगोर्यावर एक एक कविता करु शकताय.
ये हो..
ये हो.. तोडलस मित्रा....
सुंदर,
सुंदर, अज्ञात. सुंदर!