Submitted by मीन्वा on 4 July, 2008 - 12:23
कधी कधी आपण सगळ्या मिळून,
नुसत्या हसत राहतो खदाखदा..
उगीचच, कशावरही,
किंवा कशावरच नाही बहुधा.
खदखदून हसत राहतो आपण सगळ्याजणी..
डोळ्यात पाणी येतं, तरीही हसत राहतो.
हसता हसता रडत राहतो,
कि रडता रडता हसत असतो?
कधी कधी हसत राहतो आपण सगळ्याजणी,
जरासं भेसुरपणे, खदाखदा..
गुलमोहर:
शेअर करा