आठ्वणी

Submitted by अरुण वि.देशपाडे on 27 April, 2011 - 02:13

आठवणी
आवडत्या माणसांच्या आठवणी
ठेवाव्यात मनाच्या पुस्तकात
खुणा असतात त्यांच्याच
पानापानागणिक !
केंव्हाही वाचावं मनातल्या मनात
आपल आवडतं माणूस
त्याच्या आठवणींसकट.....
बिनबोभाट....!
***********
-अरुण वि. देशपांडे.

"रसिक हो- "मन डोह " हा माझा दूसरा कविता संग्रह दि.०८ मे-२०११ रोजी प्रकाशित होतो आहे.

गुलमोहर: 

आवडत्या माणसांच्या आठवणी
ठेवाव्यात मनाच्या पुस्तकात..
फार छान कविता आहे ही.

केंव्हाही वाचावं मनातल्या मनात
आपल आवडतं माणूस
त्याच्या आठवणींसकट.....
बिनबोभाट....!

कल्पनाच किती सुंदर! आवडली कविता.
मन-डोहसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! Happy