Submitted by क्रांति on 26 April, 2011 - 04:56
गीत
काही गाणी अगदी कायम मनात रुंजी घालत रहातात, ती आपल्याला का आवडतात हे सहजासहजी सांगता येत नाही, पण कधीतरी अचानक काही भाव, काही शब्द मदतीला धावून येतात आणि त्या गाण्याचं आणि आपलं नातं उलगडून देतात. अशा या आगळ्यावेगळ्या कल्पनेला इथून वेचलं आणि पहिला प्रयत्न केला.
जखमा फुलतील नव्याने,
थरथरेल मन तृणपाते,
भगव्याशा आभाळाचे
क्षितिजाशी धुरकट नाते
त्या कातरवेळी माझ्या
वेदनेस कंठ फुटावा
हुरहुरत्या सांजेला मी
माळून पूरिया द्यावा!
झाडांच्या पार तळाशी
घनदाट स्मृतींचा मेळा
काहूर जागवित याव्या
अन् सांजफुलांच्या वेळा
संध्येची गहिरी दु:खे
गात्रांत भरून उरावी,
मावळताना किरणांना
कविता आतून स्फुरावी
धूसरशा मेघांमधल्या
शिल्पातुन सूर झरावे,
मी ज्योतीसह थरथरता
हे एकच गीत स्मरावे,
"भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते,
मज तुझी आठवण येते!"
क्रांति
गुलमोहर:
शेअर करा
क्या बात है !! हे गाणं आहेच
क्या बात है !!
हे गाणं आहेच तसं तरल, हळवं करणारं. नकळतच डोळे पाणावतात
क्रांति,
मस्त गाणं.
>मावळताना किरणांना
>कविता आतून स्फुरावी
छानच !
सह्ह्ही !!!!!!!११ आवडले..
सह्ह्ही !!!!!!!११ आवडले.. :स्मितः
अप्रतीम !! फारच सुंदर लय;
अप्रतीम !! फारच सुंदर लय; शब्दलाघव आणि भावार्थ !! व्वा मस्त
फार सुंदर!
फार सुंदर!
फारच सुरेख!
फारच सुरेख! क्रांति.
झाडांच्या पार तळाशी
घनदाट स्मृतींचा मेळा
काहूर जागवित याव्या
अन् सांजफुलांच्या वेळा
संध्येची गहिरी दु:खे
गात्रांत भरून उरावी,
मावळताना किरणांना
कविता आतून स्फुरावी
धूसरशा मेघांमधल्या
शिल्पातुन सूर झरावे,
मी ज्योतीसह थरथरता
हे एकच गीत स्मरावे,
ही तिन्ही कडवी अफलातून आहेत.
व्वा.. अशक्य भारी..
व्वा.. अशक्य भारी..
मस्त
मस्त
अप्रतिम!
अप्रतिम!
सुरेख शब्दांची मैफल.. !
सुरेख शब्दांची मैफल.. !
>> झाडांच्या पार तळाशी घनदाट
>> झाडांच्या पार तळाशी
घनदाट स्मृतींचा मेळा
काहूर जागवित याव्या
अन् सांजफुलांच्या वेळा >>>>>
५ गावं इनाम तुला!