मायदेशी माझ्या दारी..

Submitted by rutuved on 25 April, 2011 - 22:23

मायदेशी माझ्या दारी,
झाली ग्रीष्माची सराई,
दिस फुटे सोनियाचा,
रात तार्‍यांची चटाई.....१

विखुरल्या त्या दुपारी,
अग्नीपंखांची कताई,
मनी आंब्याचा मोहोर,
परी झुलतो गं बाई.......२

भर उन्हात सांडली,
अशी सावली वडाची,
अन् मुखावरी आली,
ती झुळूक वा-याची......३

सांडलेल्या सांजवेळी,
बकुळीचा गंध वाहे,
मग पेटीच्या सुरात,
जीव माहेराला धावे.....४

ऋतुवेद

गुलमोहर: 

व्वाह!!! या मग माहेरी Happy
बाय द वे... अशी कविता पहिल्यांदाच वाचतोय तुझ्याकडून Happy छान आहे Happy
आणि नचिकेत म्हणतोय ते बरोबर आहे... कडवं चार ओळींचंच आहे... बदल...

@नचिकेतः aye aye sir!
तरी content वर reply आवडेल..

@हर्षलः सध्या शक्य नाही Happy
बाय द वे.. अश्यातली मे बी ही पहिलीच..
अन एकदम बदल ..नचिकेत कडुन शिका शिष्यहो!
बाकी..thanks!

@मुक्ता: धन्यवाद..guidance n मागच्या discussion साठी!

@राजेश्वर : धन्यवाद!

@all : suggested बदल केले आहेत..

Happy
गिरिश जी...आमचं पुणे हरवलंय!
धन्यवाद!

झाड,क्रांति....आभार!
प्रकाश,फारएण्ड : धन्यवाद!

बरं Happy

Harshalc : धन्स!!
पेशवा: धन्यवाद!

फुल्या:
[माझ्या ७वी / ८वी च्या अभ्यासात
"माझ्या मायदेशी
यावेच सर्वांनी
फुगडया घालाव्या
फुला तारकांनी" अशी एक कविता होती i think इंदिरा संतांची, तशी वाटली काहीशी....
ही पण छान आहे!!
(अवांतर- आम्ही ती कविता "जरा तसबीरसे तू निकलके सामने आ" च्या चालीवर म्हणायचो )]

तुमच्या म्हणण्यानूसार अवांतर का होइना ती चाल try केली... आमच्या जमण्या तली नाही वाटतं...शाळेत पण दुस-या ने गाउन दा़खवल्यावरच चाल झेपायची....काही सवयी (त्रुटी) कायम राहतात...असो!
इंदिरा संतांची कविता आठवत नाहीये आत्ता, वेळ काढून शोधून नक्की वाचेन!
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद Happy

आर्चः झुळूक भासली इथेपण...my pleasure! Happy

yes i got that...i couldn't recall the indira sant's kavita evdhach mhanycha hota n chali hi aaikalya shivay zepat nahi hehi...no offences at all...
thanks for reply Happy