शोधून पहा!

Submitted by इरसाल on 24 April, 2011 - 03:14

फक्त एकदा...
एकदा मला शोधून पहा..!
बंधातील त्या प्रेमाच्या
तराजूत तोलून पहा!

हिरव्या गवतातील....
हिरव्या गवतातील वाळक पानं
हिरव्या शेतातील, कोरडं रान
हिरव्या रंगात घालून पहा
फक्त एकदा...
एकदा मला शोधून पहा!

आता स्वतःचं काय घेऊन बसलीस
स्वतःच स्वतःलाच छान
त्तूझ्या एकट्या 'स्व' मध्ये
मला बोलावून पहा...
फक्त एकदा...
एकदा मला शोधून पहा..!

तू 'नाह्री' म्हटलीस तरी
नकळत तू हो म्हणून जा
गदगदलेल्या शब्दातून
मी शांत बोलताना पहा
फक्त एकदा...
एकदा मला शोधून पहा..!

आता सर्व काही मनाला विचार
मन दाटून येतय का पहा
अलगद झुकलीच नजर तुझी...
मिटलेल्या पापण्यात मात्र मलाच पहा..
फक्त एकदा...
एकदा मला शोधून पहा..!

*************

गुलमोहर: 

अलगद झुकलीच नजर तुझी...
मिटलेल्या पापण्यात मात्र मलाच पहा..
फक्त एकदा...>>

आवडली!