तरंग

Submitted by अज्ञात on 24 April, 2011 - 01:30

येतो असा वसंत पानात पान दंग
रानातुनी वहातो झुळुकेसवेस गंध
ये मागुती श्रॄतींचा आवेग वृत्त छंद
छेडीत भावनांना गाई कुहूक मंद

नभ आश्रयास देते छायेस शीत रंग
घरटी पिलांस माया वात्सल्य गोत संग
सारेच सावरे हे एकास मेक अंग
का त्वांसि आकळे ना; कुरवाळितोस व्यंग

सोडून आड वाटा कर दुष्टता दुभंग
अंकूर सुष्टकोषी जोपास लय अभंग
आनंद जीवनाचा जीवास दे तरंग
आवास साधनेचा जोडूनिया सवंग

..............................अज्ञात

गुलमोहर: 

येतो असा वसंत पानात पान दंग
रानातुनी वहातो झुळुकेसवेस गंध
ये मागुती श्रॄतींचा आवेग वृत्त छंद
छेडीत भावनांना गाई कुहूक मंद

खूपच छान ..!!