Submitted by उमेश कोठीकर on 23 April, 2011 - 04:16
जेथ भेटलो आपण दोघे
गंध तेथला अजून येतो
जेथ उमटले श्वास मिठीचे
माती तेथील चुंबून घेतो
सोडून जाशील; घेशील तेंव्हा?
हृदयाला या अलगद हाती
वाट बनावी तुझ्या पाउली
उरेल जी देहाची माती
माती बनूनी वाट पहावी
जन्म जन्म मी तुझ्याचसाठी
मेघांमधूनी बरसून ये तू
जीवन दे मज अमृत ओठी
माती चाळून सोने उरता
हृदयामधूनी तशीच प्रीती
मातीच्या या उदरामध्ये
जन्म घेतसे सगळी नाती
मातीच्या या देहामध्ये
कुणी लाविले हृदयाचे बीज?
सजीव झाले श्वास श्वास अन
सुरू जाहले आत्म्याचे गुज
गुलमोहर:
शेअर करा
जियो, जियो कविराज...... बहोत
जियो, जियो कविराज......
बहोत खूब, तुझ्या कविता वाचल्या की जीव भरुन पावतो.
मस्त, लयबद्ध! शशांकला
मस्त, लयबद्ध! शशांकला अनुमोदन.
तुझी "अर्पणपत्रिका" अजुन मनात आहे.
खूप छान!
खूप छान!
छान
छान
धन्यवाद मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो.
माती बनूनी वाट पहावी जन्म
माती बनूनी वाट पहावी
जन्म जन्म मी तुझ्याचसाठी
मेघांमधूनी बरसून ये तू
जीवन दे मज अमृत ओठी
>> सुरेख ओळी.. भ्रमरला अनुमोदन. अर्पणपत्रिकेची बातंच न्यारी मित्रा !
ग्रेट.. सुंदर लय आणि कवितेत
ग्रेट.. सुंदर लय आणि कवितेत सुरेख आवर्तन..
मस्त..
वाह वाह.... अप्रतिम!!!
वाह वाह.... अप्रतिम!!!
आवडली कविता
आवडली कविता
सुंदर
सुंदर
धन्यवाद बेफिकीरजी, डॉ., सत्या
धन्यवाद बेफिकीरजी, डॉ., सत्या आणि मुक्ता.
नेहमीप्रमाणेच सुंदर!!!!!
नेहमीप्रमाणेच सुंदर!!!!!
awesome......
awesome......:-)
उमेशजी, नेहमीप्रमाणे...
उमेशजी, नेहमीप्रमाणे... झ्याक!!!
तुझी "अर्पणपत्रिका" अजुन मनात
तुझी "अर्पणपत्रिका" अजुन मनात आहे. >> अगदी अगदी
सुंदर रचना उमेश