Submitted by देवा on 3 July, 2008 - 01:26
'जाऊ नकोस' बोलायचे राहून गेले होते?
जीव आपुला झोकायचे राहून गेले होते
मी सोडलीच होती सवय माझी बोलण्याची
सोडण्याआधी कळायचे राहून गेले होते
मी तुझीच आहे तू बोलली होतीस खरी
भाव शब्दात घालायचे राहून गेले होते
निरोप घेतांना तिच्याशी बरेच बोललो होतो
आता येतो म्हणायचे राहून गेले होते
मी पत्रात माझ्या लिहिले सारेच होते परंतु
फक्त तुझाच मी लिहायचे राहून गेले होते
वाटले होते लागायचे पाणी ज्या जागेवरी
नेमके तिथे खोदायचे राहून गेले होते
काल ऐकण्यास गेलो ठुमरी टप्पे कोठ्यावरी
दाद गाणार्यास द्यायचे राहून गेले होते
गुलमोहर:
शेअर करा
वोक्के.. मी
वोक्के..
मी पत्रात माझ्या लिहिले सारेच होते परंतु
फक्त तुझाच मी लिहायचे राहून गेले होते
हा आवडला.
देवा माफ
देवा माफ कर पण र्ह्स्व दीर्घाकडे अजून लक्ष द्यायला पाहिजे
पाणि, जाउ खटकले
बोललीस होती >>> च्या जागी बोलली होतीस जास्त बरोबर वाटते असे वाटते
बाकी पत्राचा शेर सगळ्यात आवडला
चु.भु.दे.घे.
================
नव्यानव्या दागदागिन्यांची ददात नाही तुला तरी
कशास देहावरी जुने चांदणे मिरवतेस ... सांग ना!
सुखात आहेस ऐकतो...
-एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!
धन्यवाद
धन्यवाद मिल्या आणि चिन्नु..:)
सुधारणेला बराच जास्त वाव आहे..:)
मी बदल करेन..
वेगळे मीटर
वेगळे मीटर वाटले... असे मीटर छान निभावूने नेले आहे...
मी तुझीच आहे तू बोलली होतीस खरी
भाव शब्दात घालायचे राहून गेले होते
निरोप घेतांना तिच्याशी बरेच बोललो होतो
आता येतो म्हणायचे राहून गेले होते
मी पत्रात माझ्या लिहिले सारेच होते परंतु
फक्त तुझाच मी लिहायचे राहून गेले होते
हे आवडले...
देवद्त्त, म
देवद्त्त,
माझे मराठी एवढे पक्के नाही म्हणून जास्त टीप्पणी करु शकणार नाही. कविता व त्यातला भाव छान आहे एवढे खरे.
नरेन्द्र
'जाऊ नकोस'
'जाऊ नकोस' बोलायचे राहून गेले होते?
तुझ्या जीव झोकाण्यात वाहून गेले होते,
तू सोडलीच होती सवय तुझी बोलण्याची
निशब्द भाव तरीही समजून आले होते,
भाव शब्दात माझ्या नसतील कदाचित
डोळ्यात शब्द मात्र उमटून आले होते,
निरोप घेतांना तु बरेच बोलला होता
परत ये म्हणायचे राहून गेले होते,
तुझाच मी लिहायचे जरी राहून गेले होते
माझाच आहेस तू , हे तव ऊमगले नव्हते,
तिथे खोदायचे जरी राहून गेले होते
नकळत तिथे पाणी साठुन आले होते,
दाद गाणार्यास द्यायची राहून गेली तरीही
गाणार्याचे गाणे अजून चालूच होते,
इतके मनास तू लावून घेऊ नकोस,
मी युगयुगांतरी तुजसवेच होते.