बीजिंग च्या बाहेर एका तासाच्या अंतरावर असलेल्या समर पॅलेस मागे ८०० वर्षांचा इतिहास आहे.
८०० वर्षापूर्वी मंगोल डायनेस्टी चा सम्राट कुबलाय खान,याने स्वतःसाठी हा राजवाडा बांधून घेतला.
नंतर बाराव्या शतकाच्या सुरुवातीला छिंग डायनेस्टीच्या सम्राटाने हा पॅलेस अजून वाढवून ,नव्याने भर टाकून आपल्या आईला, तिच्या साठाव्या वाढदिवशी भेट म्हणून दिला.
छिंग डायनेस्टीचा सम्राट 'शिएनफंग' याच्या झनानखान्यात १६ वर्षाची 'लान' ची जेंव्हा भरती झाली तेंव्हा कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल कि ही रखेली एक दिवस चीन वर सलग ४८ वर्षं राज्य करणार म्हणून.
सम्राटापासून तिला एक मुलगा झाला आणी लान चे नशीब फळफळले. सम्राटाच्या मुख्य कॉनक्युबाईन (रखेली / उपपत्नी) चे पद तिला प्राप्त झाले. तिचं नाव बदलून 'छ शी' ठेवण्यात आले. .. १८६० मधे सम्राटाचा मृत्यू झाल्यावर ,तिने अनेक कपट,कारस्थानं करून सम्राटाच्या पट्टराणी आणी युवराजाचा काटा काढला. आपल्या अल्पवयीन मुलाला राज्याभिषेक करून स्वतःच राज्य करू लागली. ती सिंहासनामागे एका जाळीदार पडद्याआड बसे. म्हणून तिला लेडी बिहाईंड द कर्टन असंही म्हणत.छ शी ने स्वतः च्या चैनीसाठी खूप मोठ्या प्रमाणात,मन मानेल तसा पैसा खर्च केला. २९० हेक्टेअर जागा व्यापलेल्या या महालात छ शी ने अपरंपार वैभव भोगले. नौसेनेसाठी असलेला फंड केवळ स्वतःच्या सुखविलासा करता तिने एक (न हलणारी)संगमरवरी नौका बांधण्यात खर्च करून टाकला. महालासमोर १०,००० मजूर लावून विशाल तळे बनवले.या तळ्यात छ शी ला मोत्ये आवडत म्हणून खास शिंपल्यांची शेती करण्यात येई आणी इथून निघालेले मोती सर्वच्यासर्व एकटी छ शी वापरत असे. या तलावात विहार करायला छ शी खेरीज अजून कुणालाच अनुमती नव्हती.
लवकरच तिचा मुलगा मरण पावला. तिने सर्व नियम धाब्यावर बसवून आपला पाच वर्षाचा भाचा,'क्वांग शू'ला गादीवर बसवले. क्वांअ शू ला खरोखरच प्रजेसाठी काही करावेसे वाते. छ शी च्या लक्षात आले कि जर प्रजा सुधारली तर सत्ता आपल्याहातून निघून जाईल.त्यामुळे तिने चिडून जाऊन ,'क्वांग शू' ला या समर पॅलेस मधे एका लहानश्या जागेत तो मरेपर्यन्त डांबून टाकले . ती नेहमी म्हणे कि ती क्वांग शू मेल्यानंतरच मरेल. आणी खरोखरच तसे झाले. कैदेत १५ वर्षं राहिल्यावर दुर्दैवी क्वांग शू केवळ ३४ व्या वर्षी मरण पावला. योगायोग असा कि दुसर्याच दिवशी 'छ शी' वयाच्या ७४ व्या वर्षी मरण पावली. नंतर दोनच वर्षानी, १९११ मधे छिंग डायनेस्टीचे साम्राज्य संपुष्टात आले.
समर पॅलेस च्या समोरच्या बागेत ,आपल्या आईला आरामात फिरता यावे म्हणून सम्राटाने बांधलेला हा ७२८ मीटर लांबीचा हा पॅसेज, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मधे शामिल आहे. लाँग कॉरिडॉर ला प्रवेश फी नाही.त्यामुळे इथे दिवसभर बरेच ज्येष्ठ नागरीक,पोराबाळांसमवेत बागेतून फिरायला येतात. इतकच नाही तर कॉरिडॉर च्या दोन्ही बाजूंनी कमरेइतक्या उंच ,रुंद कठड्यावर बसून पत्ते,माजोंग इ. खेळायची पण मुभा आहे.फक्त पैसे लावून जुगार बिगार खेळायला परवानगी नाही.
पॅलेस समोर,तळ्याकडे तोंड करून उभा असलेला हा क्विलिन्,रक्षणकर्त्याचे कर्तव्य पार पाडतोय
चीने च्या पॅलेसेस मधे महालाच्या प्रवेशद्वाराबाहेर पुरुष प्रधान संस्कृतीचा सिंबल म्हणून उजव्या बाजूला ड्रॅगन तर डाव्या बाजूला राणी चं सिंबल म्हणून फीनिक्स असतो. मात्र छ शी च्या राज्यात ड्रॅगन आणी फिनिक्स च्या जागा बदललेल्या होत्या
उगाच नाही तिचा आज ही उल्लेख' ड्रॅगन लेडी' म्हणून केला जातो.
हीच ती ड्रॅगन लेडी,' छ शी'
महालाच्या आतल्या बाजूचे भाग, निरनिराळे महाल्,अंगणं,चौक..
या महालात छ शी ने सम्राटाच्या पुत्राला जन्म दिला. पुढे ती स्वतः शेवटपर्यन्त इथेच राहिली.
छ शी चे शयन कक्ष, येथील भांडी,पात्रं,वस्तू शुद्ध सोने आणी पाचू वापरून बनवलेल्या आहेत.
सोन्याच्या पत्र्याने मढवलेले असे अनेक हंडे त्यांच्यात पाणी भरून महालांबाहेर ठेवण्यात येत. हे त्या काळचे अग्निशामक यंत्री असत. पुढे युरोपिय सत्तेने चीन मधे आपले पाव रोवल्यावर सर्व हंड्यांवरचे सोने त्यांनी चाकूद्वारे खरवडून पळवले.
छ शी ला उधळपट्टी करायला खूप आवडे. तिच्या जेवणाकरता तीन हॉल वापरले जात. एकेका वेळी पन्नास पन्नास खाण्याचे पदार्थ टेबलावर तिला हवे असत. मग एका खोलीत ती ती फक्त जेवणाचा वास घेई, दुसर्या खोलीत थोडं चाखे,मग तिसर्या खोलीत जेवण घेत असे.
तसच तिला फुलांपेक्षा फळांचा सुवास आवडे म्हणून तिच्या खोलीत शेकड्यांनी ताजी फळं ठेवली जात्,जी दिवसातून दोन वेळा बदलली जात.
महालाच्या परिसरात अशी 'भुतहा' झाडं खूप दिसली
हा राजाचा महाल. इथे छ शी राजासोबत बसून त्याच्या रखेलींची निवड करे. राजाला आवडणार्या रखेलीला त्याच्यापासून मूल न होऊ देण्यासाठी, छ शी च्या हुकुमावरून तिच्या पाठीखाली कमरेवर लाकडाच्या ओंडक्याने खरपूस मार देण्यात येई.
राजाच्या महाला च्या आसपास च्या महालांमधून त्याच्या ३००० रखेलींचे वास्तव्य होते
सम्राटाच्या उम्मीदवार रखेल्यांचा एक फोटो इकडे ठेवण्यात आलेला आहे.या लहानग्या पोरींचे इनोसंट चेहरे पाहून मन भरून आलं
या परिसरात असलेल्या एका लहानश्या महालात बाहेर पडायच्या सर्व दरवाज्यांवर भिंती बांधून बंद करून टाकल्यात. इथेच क्वांग शू ला १५ वर्षं बन्दिवास भोगावा लागला. त्याला महालासमोरच्या छोट्याश्या अंगणात कडक पहार्यात फिरायची मुभा होती.
From Summer palace
ही च ती भिंत.. तिला पाहून सुद्धा गुदमरायला झालं
पॅलेस समोरच्या तळ्यावरून दूरवर दिसणारा पॅगोडा
आणी हे ते मोत्ये पिकवणारे, छ शी ला नावेतून सैर करवणारे सुंदर, मॅन मेड अतिविशाल तळे
आता या तळ्यात आम पब्लिक ही नौका विहार करू शकतात.. शिवाय इकडे निघणारे मोती ही विकत घेऊ शकतात.
ती फेमस मार्बल बोट

























वरून तिसरा फोटो खालीवर
वरून तिसरा फोटो खालीवर स्क्रॉल करून पहा..
कमाल कि फोटोग्राफी
अंगावर काटा आला! केवढं ते
अंगावर काटा आला! केवढं ते क्रौर्य!
लेख आणि फोटोज छान!
वर्षु - खूपच सुंदर
वर्षु - खूपच सुंदर .अप्रतिम!!आणि खूप छान माहिती दिलीस . एवढे प्रचंड छान फोटो नि सखोल माहिती .
चीन म्हणजे नुसती बजबजपुरी वाटत होती .पण तेथील महाल ,देवळे, झाडे ....कसली अप्रतिम
लिहित रहा. वाचणार आहेच .
पुढील लेखासाआठी उस्तुक
छान माहिती आणि फोटो.
छान माहिती आणि फोटो.
मस्त माहिती आणि फोटोही. वरून
मस्त माहिती आणि फोटोही.
वरून तिसरा फोटो खालीवर स्क्रॉल करून पहा..
>>>भारिये ते एकदम!
मस्त मस्त मस्त ! लेख पण
मस्त मस्त मस्त !
लेख पण छान आहे...
आवडलं.
आवडलं.
अरे बापरे! डेंजरच!
अरे बापरे! डेंजरच!
सुंदर लिहिलं आहेस वर्षु.
सुंदर लिहिलं आहेस वर्षु. फोटोही ग्रेट.
तो लाकडी कॉरिडॉर आहे मात्र केवळ अप्रतिम! लाँगेस्ट आर्ट गॅलेरी.
वर्षु मस्तच लेख आणि फोटो
वर्षु मस्तच लेख आणि फोटो सुद्धा...एका नविनच जगाची ओळख झाली...
चला या सत्तालोलुप सत्ताधार्यांच्या यादीत एक महिलाही आहे हे पाहून गंमत वाटली...
अशक्य होती ही छची..आणि राजाला ३००० रखेल बापरे..
फोटो व माहिती खुप आवडले. खरच
फोटो व माहिती खुप आवडले.
खरच भयानक इतिहास आहे!!!
त्या लहान मुलींचे फोटो पाहुन
त्या लहान मुलींचे फोटो पाहुन खुप वाईट वाटले..
खरं तर हा इतिहास माहित नसता, तर किती रम्य ठिकाण वाटलं असतं. >> अनुमोदन
बाकी फोटो आणी वर्णन मस्त आहे..
पु.ले.शु.
आवडले फोटो आणि वर्णन . छ्शी
आवडले फोटो आणि वर्णन . छ्शी ची बोट राक्षसिणीसारखी लांब आहेत.
तुझ्या ह्या माहिती-प्रयोगाला
तुझ्या ह्या माहिती-प्रयोगाला मात्र मनापासून दाद!!
धन्स सर्वांना श्री.. ती
धन्स सर्वांना
श्री.. ती खोटी नखं लावायची.. बोटं मेणबत्तीसारखी सुंदर ,निमुळती दिसावीत म्हणून. (बाली डांसर्स ही अश्या प्रकारची अर्टिफिशल नखं लावतात)
आडो- नेकी और पूछ पूछ.. टाक ना झब्बू
थँक्स वर्षू. हा क्विलिन From
थँक्स वर्षू.
हा क्विलिन
From China
ड्रॅगन
From China
पॅगोडा
From China
हा तळ्यातला 'मार्को पोलो' ब्रिज
From China
व्वा छानै तुझा झब्बू पण आडो.
व्वा छानै तुझा झब्बू पण आडो. थांकु
छ शी च्या वैभवपूर्ण जीवनाच्या
छ शी च्या वैभवपूर्ण जीवनाच्या काही तसबिरी
दुसरा फोटो नौकाविहाराचा आहे
दुसरा फोटो नौकाविहाराचा आहे वाटतं?
छ शीने तिच्या आयुष्यात वाजवीपेक्षा जास्तच मजा केली म्हणायची.
छान माहिती आणि फोटो
छान माहिती आणि फोटो

दिनेशदांना अनुमोदन... हा इतिहास माहीत नसता तर हे ठिकाण रमणीय वगैरे वाटलं असतं.
खरंतर, इतिहासातील या क्लेषकारक नोंदींत त्या वास्तूचा काहीच दोष नाही. पण राजवाड्याचं नशीब तिथे राहणार्या माणसांच्या क्रौर्याशी जोडलं गेलं ते कायमचंच... असा भव्य-दिव्य राजवाडा निर्माण करणाराही मानवच आणि त्याच्या सौंदर्याला आपल्या कृष्णकृत्यांनी काळीमा फासणाराही मानवच...
आडो- हो. हा फोटो नौका
आडो- हो. हा फोटो नौका विहाराचा. त्यावेळी हे तळं कमळांनी भरलेलं असायचं म्हणे..
ललिता,अगदी खरं बोललीस..
माणसासारखं , वास्तूचंही बरं वाईट नशीब असतं .. माझा या गोष्टीवर विश्वास आहे..
छान प्रची अन वर्णन ..
छान प्रची अन वर्णन ..
फोटो व माहीती दोन्ही छान.
फोटो व माहीती दोन्ही छान.
त्या ड्रॅगनच्या फोटोत मधेच पडलेली ती पाण्याची बाटली कसली विसंगत वाटते आहे. 
@कांदापोहे- खरच.. ती बाटली
@कांदापोहे- खरच.. ती बाटली माझ्याही लक्षात आली नव्हती.नाहीतर फोटो काढण्यापूर्वी मी उचलून बिन मधे टाकली असती

बरं झालं छ शी ने नाही पाहिली
धन्स रोहित
फोटो व माहिती दोन्ही फारच
फोटो व माहिती दोन्ही फारच छान...
छ शी च्या लक्षात आले कि जर प्रजा सुधारली तर सत्ता आपल्याहातून निघून जाईल>>>>
आजच्या भारतातल्या राजकारणाला ही गोष्ट अगदी तंतोतंत लागू पडते नाही...
छ शी आणि तिच्या राजासारखे
छ शी आणि तिच्या राजासारखे नमुने राज्यकर्ते मानव जातीला लाभतच(?) असतात. छान फोटोग्राफी आणि वृत्तांत देखिल.
वा. छान (?) माहिती मिळाली.
वा. छान (?) माहिती मिळाली. माहित नसलेली जागा आणि तिचा इतिहास- दोन्ही आवडले.
त्या लहान मुलींचा फोटो पाहून खरेच कळवळले! त्यांचं वय काय आणि त्यांनी भोगले काय! भीषण!
वर्षू ,नेहेमीप्रमाणे हे फोटो
वर्षू ,नेहेमीप्रमाणे हे फोटो पण छान्.आणी महितीही. छ शी राणी चे क्रौर्य आणी राजाच्या अल्पवयीन रखेल्यांचे फोटो पाहून अंगावर काटा आला.अनेक वर्षांपासून आजपर्यंत स्त्रियांचे शोषण चालूच आहे.
अशीच ह्या देशाची माहिती तुझ्या कडून मिळावी ही अपेक्षा.
मस्त !
मस्त !
वर्षू तुझ्यामुळे आमच बिजिंग
वर्षू तुझ्यामुळे आमच बिजिंग दर्शन होतय.
Pages