प्रणयगीत

Submitted by UlhasBhide on 19 April, 2011 - 00:18

प्रणयगीत

आवेगे तू मिठीत घेता अंग अंग थरथरले
मीपण माझे, माझ्या नकळत मला सोडुनी गेले

अधीर तालातील स्पंदने श्वासही नादावले
शृंगाराच्या लय-सूरांनी गात्र गात्र मोहरले

आलापी, मुरक्या अन् ताना धुंद सुरावळ डोले
ते शब्दातित गीत उभयतां नि:शब्दें गायीले

अजून गुंजारवे तयाच्या तन मन हे हुळहूळे
अजून झुलती मनात माझ्या स्वर्गसुखाचे झूले

..... उल्हास भिडे (१९-४-२०११)

गुलमोहर: 

ते शब्दातित गीत उभयतां नि:शब्दें गायीले >>
अगदी आवडल्या या ओळी, सर्वच कविता जमलीये अगदी.....मस्त.