तुम्ही चहा कसा करता?????

Submitted by भुंगा on 18 April, 2011 - 06:50

चहा....... म्हणजे पृथ्वीवरचं अमृतच म्हणतात. तसं बघितलं तर अगदी सोम्यागोम्या कोणालाही अगदी बेसिक करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे चहा.....

पण वर वर साधा दिसणारा हा चहा सुध्दा अतिशय वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अगदी एकाच घरातली चार माणसे चार वेगळ्या पद्धतीने चहा करतात आणि चव बदलते. पाणी, चहा पावडर, साखर यांचं भिन्न घेतलं जाणारं प्रमाण...... पाण्याला किती वेळ उकळी दिली, उकळायच्या आधी साखर, पावडर एकत्र घातली की साखर घालून मग उकळल्यावर पावडर आणि मग पुन्हा एक उकळी. काही जण दुधातच साखर आणि चहापावडर घालून उकळवतात. असे एक ना अनेक प्रकार व्यक्तीगणिक बदलतात.

वरवर साधा वाटणारा हा चहा करता मात्र कित्येक प्रकारे करता येतो आणि प्रत्येक कृतीची चव निराळी लागते. याचमुळे कधीकधी अत्यंत रद्दड झालेला टमरेलभर चहा (टमरेल म्हणजे आकाराने मोठा कप Proud ) कसाबसा घशाखाली ओतावा लागतो.

तर अश्या निरनिराळ्या पध्दतीतून तुम्ही नेमका चहा कसा करता ते इथे जरूर लिहा....
कृपया इथे स्टेपवाईज लिहा कृती. कारण दूध आधी घालतो की नंतर चहापावडर आणि साखर एकत्र घालतो का, किती उकळवतो अश्या छोट्या छोट्या गोष्टीवर चहाची चव बदलते.

तुमच्या घरात ४ माणसं आली आहेत आणि तुमच्यासकट आता ५ जणांचा चहा तुम्हाला करायचाय.....

कसा कराल?????? गुरू होजा ओ शुरू........ Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाच चप पाणी + पाच चमचे चहा पावडर + दहा चमचे साखर + त्या प्रमाणात दूध
हे सगळे एकत्र शेगडीवर (खाली गॅस सुरू करून) ठेवतो.
उकळलं की ढोसायला देतो.

सुरुवात माझ्यापासून करतो.

५ जणांच्या चहासाठी साधारण ४ ते साडेचार फूल कप पाणी घेणे. ते उकळत ठेवणे. थोडी उकळी फुटल्यावर त्यात 10 चमचे साखर घालणे. पुन्हा थोडी उकळी देणे. मग पाच चमचे चहा पावडर (डस्ट असेल तर) दाणेदार ब्रूक बॉंड वगैरे असेल तर चार चमचे पुरे.......
(आता इथे चमच्याचा आकरही महत्वाचा बरं का :स्मित:)

मग पुन्हा उकळी देणे. सणसणीत उकळला की त्यावर झाकण ठेवून वाफ त्यातच जिरू देणे. मग दुसर्‍या गॅसवर उकळलेले दूध घेणे. आता उकळून थोडा थंड झालेला चहा गाळणीतून गाळून घेणे आणि त्यात चहाला हवा तो लालसर रंग येईपर्यंत (दुधाचे प्रमाण सोयीनुसार / आवडीनुसार) दूध घालणे.

आता चहा तयार.

आता मामीला फोन करू तिच्याकडून बिस्किटे मागवणे..... आणि पाहुण्यांना नाही आवडला तरी आपण भुरके मारत बिस्किटे खात चहा पिणे. Proud Wink

धन्स मंजुडी.......

अरे हे मस्त आहे इथे मायबोलीवर. बरेचसे विषय आधीच डिस्कस झालेले असतात. पण आपल्याला माहित नसल्याने तसेच विचार मनात आले की आपण ते मांडतो. प्रत्येक बॅचमध्ये समविचारी माणसं असतात तर Happy

माझी पद्धत अत्यंत अनोखी.
आमच्याकडे उत्तम प्रतिचा इंस्टंट चहा मिळतो. त्यामूळे कपात दोन चमचे लो फॅट मिल्क पावडर, एक चमचा इंस्टंट चहाची पावडर, एक गोळी शुगरफ्री घेऊन त्यात उकळते पाणी वरुन ओतायचे आणि ढवळायचे. बस झाला चहा तयार.
मग रात्री टेरेसवर जाऊन, चांदण्याची मजा घेत चहा प्यायचा.

कृपया इथे स्टेपवाईज लिहा कृती. कारण दूध आधी घालतो की नंतर चहापावडर आणि साखर एकत्र घालतो का, किती उकळवतो अश्या छोट्या छोट्या गोष्टीवर चहाची चव बदलते.

मामी, चहा कसा करता ते लिही आधी......... बोलवत नाही तर निदान इथे तरी कळू दे चहा कसा करतेस ते........ Biggrin

आता चहा करणारा महाराज तुझ्या २४ च्या लिस्टमधला नसेल अशी मी ब्रूक बाँड चरणी आशा करतो. Rofl Lol

पाच चप पाणी + पाच चमचे चहा पावडर + दहा चमचे साखर + त्या प्रमाणात दूध
हे सगळे एकत्र शेगडीवर (खाली गॅस सुरू करून) ठेवतो.
उकळलं की ढोसायला देतो. >>> पाच कप चहाला पाच कप पाणी... मला चुकुनही कधी चहाला बोलवु नको Uhoh Lol

पाच कप चहासाठी अडीच कप पाणी+ अडीच कप दुध + १० चमचे साखर + ५ चमचे चहा पावडर + १/२ सेंटीमीटर आलं (ठेचुन) एका पातेल्यात साधारण ५ मिनीट उकळुन घेतल्यावर जर चहा कमी पडेल असं वाटलं तर अजुन पाव कप दुध टाकुन १-२ उकळ्या आल्यावर गाळुन घेणे...ही माझी साधी सोपी सुटसुटीत पद्धत.. पण मला स्वतःला मी केलेला चहा आवडत नाही, आईने केलेलाच आवडतो Happy

५ जणांच्या चहासाठी साधारण ४ ते साडेचार फूल कप पाणी घेणे. ते उकळत ठेवणे त्यामधे आलं ठेचून घालणे. तीन चमचे चहा पावडर घालून उकळी फुटू देणे आणि त्यात चहाला हवा तो लालसर रंग येईपर्यंत दूध घालणे. चहा गाळून सर्वांना देणे... देताना सोबत साखर किंवा शुगर फ्रि चमच्यासह Happy देणे

हि झाली आतची पद्धत, नाहीतर जुन्या पद्धती प्रमाणे

चहा पावडर आणि त्यात ५ चमचे साखर पहिल्या उकळीनंतर घालणे. आणि त्यात चहाला हवा तो लालसर रंग येईपर्यंत दूध घालणे. चहा गाळून सर्वांना देणे Happy

यांना विचारून सांगते ... हेच करतात चहा.

>>>>>

Biggrin बघण्याच्या कार्यक्रमाच्यावेळी एकदा तू केला असशील मामी चहा, नंतर तुझे अहो म्हणाले असतील असूदे ग, मीच करत जाईन चहा....... "तू फक्त बिस्किटंच खा हो" Proud Rofl Lol

"तुम्ही चहा कसा करता???" भुंग्या, अगदी हाच प्रश्न मला एका फायनल Interview ला विचारला होता. Happy क्षणभर मी जरा गोंधळलो, (मनात विचार केला कि आयटी मध्ये काम करायचे आहे कि चहाच्या टपरीवर :फिदी:) त्यांच्याकडुन ५ मिनिटांचा वेळ मागुन घेतला. थोडा वेळ विचार केल्यानंतर जाणवले कि हा प्रोजेक्ट रीलेटेड प्रश्न आहे. Happy चहा म्हणजे एक प्रोजेक्ट आणि तो मी कसा हाताळु शकतो हेच त्या प्रश्नांतुन त्यांना जाणुन घ्यायचे होते.

माझे उत्तर होते कि, चहा करण्याआधी त्याची पूर्वतयारी करतो (Project Analysis), तो किती जणांना द्यायचा आहे ते जाणुन घेतो (Resource Management) इ. इ. (अर्थात तो Interview मी पास झालो हे सांगणे न लागे. :फिदी:)

विषयांतराबद्दल क्षमस्व, पण कधीही "तुम्ही चहा कसा करता???"हा प्रश्न आला कि हेच आठवतं. Happy शिर्षक पाहिल्यावर पहिल्यांदा मलासुद्धा हा "टेक्निकल प्रश्न" आहे वाटला. Happy (हा धागा आहारशास्त्रात आहे बघितलं नव्हते :-))

भुंग्या आमच्याकडचा चहा म्हणजे बासुंदिच असते Proud
पाच कपाला ४ / ५ कप दुध आणि १ / ० कप पाणी. ६ चमचे चहा पावडर ( दुध जास्त असल्याने जास्त लागते ) , १० चमचे साखर, ताजी बारीक केलेली वेलची एकत्र टाकुन गॅसावर ठेवायचे. आणी सतत ढवळत रहायचे ( साय धरु नये म्हणून हे महत्वाचे ). मस्त चहा शिजल्याचा ( मला कळतो हा ) वास आला की गाळायचा Happy

मला स्ट्राँग चहा आवडतो.
पाच कपाला:
३ कप पाणी + ६-७ चमचे साखर+ २ ते अडीच चमचा चहा हे मिश्रण चांगलं उकळवते (यातच अर्धा इंच आलं ठेचुन किंवा गवती चहा टाकला की अप्रतिम चव) चहाचा गाळ खाली बसेपर्यंत. नंतर त्यात २ कप दुध टाकते. हे ही चांगलं ५ मि.उकळु देते. मस्त घट्ट चहा तयार होतो. चहाच्या कलरवर चहा कसा झाला हे अवलंबुन असतं. खुप दुधाचा पांढरा फटक चहा, किंवा खुप चहा पावडर टाकुन केलेला काळपट चहा मला नाही आवडत.
टीपः गॅस विझवुन २-३ मि. चहा झाकुन ठेवावा...लगेच गाळु नये.

चहा कसा करतात.. ते एकदा आसाममधल्या चहाच्या फॅक्टरीत बघून यायला पाहिजे.. योग्य ती माहिती तिथेच मिळेल....

आमच्या वर्गात एका मुलीने चहा करायला ४५ मिनिटे लागतात असे दाखवले होते.. ते बघितल्यावर आमच्या सरांनी तिला वेड्यात काढले होते.. विषय होता production planning and control.... आणि तिने ते सगळे process flow वगैरे काढून दाखवले होते..

ते एकदा आसाममधल्या चहाच्या फॅक्टरीत बघून यायला पाहिजे.. योग्य ती माहिती तिथेच मिळेल.... >> आजीबात नाही... माझे एक नातेवाईकांचा चहाचा व्यवसाय आहे आणी ते नामांकित टी टेस्टर आहेत. एकदा त्यांनी केलेला चहा पीले होते.. आजीबात आवडला नव्हता Uhoh

गावाकडे निरश्या दुधाच्या चहाची चव इथे शहरात नाही Sad

३ कप पाणी त्यात २ कप दुध, साखर १० चमचे ५ चमचे चहा टाटा, नाहीतर खुला
डायबेटीज असल्या ५ चमचे, डायबेटीज पावरफुल असल्यास वेगळा करतो
उकळी आल्यावर त्यात कप बुडवुन पुन्हा खालीवर करतो, गाळणी नी गाळतो, बंगळीवर निवांत बसुन पितो बिस्कीट मात्र क्वचित खातो चहा सोबत. गरमगरम प्यायला आवडते

आमच्या वर्गात एका मुलीने चहा करायला ४५ मिनिटे लागतात असे दाखवले होते.>>>>>>>> माझी मैत्रीण करते ४५ मिनीटात चहा Happy ती अर्धा-पाउण तास चहा उकळत ठेवते.. एकदाच तिच्याकडे तसा चहा घेतला, त्यानंतर तिच्याकडे गेल्यावर माझा मीच चहा करुन घेते Happy

भुंगा...
माझी पद्धत लिहितोय...
५ कप चहा साठी:-
१> साडे-तीन कप पाणी व्यवस्थीत पणे ऊकळून घेतो...
२> ऊकळत्या पाण्यात चहा पिणार्‍यांच्या चवि प्रमाणे साखर घालुन पुन्हा ऊकळी काढतो...
३> ऊकळत्या साखरेच्या सिरपमधे चहा पिणार्‍यांच्याच चवि प्रमाणे उपलब्ध असलेली चहा-पावडर घालून पुन्हा साधारण पणे दीड मिनिटापर्यन्त उकळी काढतो...
४> या उकळत्या कोर्‍या चहा मधे दीड कप गार दूध घालून पुन्हा चांगली ऊकळि काढतो...
५> पूर्ण-पणे तयार झालेला चहा गॅस वरून उतरवून, उकळलेली चहा-पावडर पूर्ण पणे खाली बसल्यावर, नंतरच कपात चहा ओतून सर्व्ह करतो...

पण जेव्हा मी स्वत: आणि मोठे बंधूराज (परदेसाई) यांना चहाची तल्लफ येते तेव्हा - पाणी आणि दुधाचे प्रमाण १:१ ठेवून ईतर प्रक्रीया वरती सांगितल्या प्रमाणेच करतो...

गावाकडे निरश्या दुधाच्या चहाची चव इथे शहरात नाही
>>>>

अगदी खरं बोललीस. "पहिल्या धारेचा चहा" ...अहाहा. पण दूध म्हशीचं पाहिजे......... गाईच्या दुधाचा पाणचट लागतो.

माझा एक नियम आहे.. जास्त हायफाय लोकांच्या घरी मी कॉफीच घेते.. चहा म्हणजे काळे पाणी असते नुसते Lol

आमच्या घरी आम्ही दुध कधीच तापौवुन ठेवत नाही. पिशवीतुन हवे तेव्हडे घ्यायचे आणि एका पातेल्यात पिशवी उभी ठेवायची. असे केल्याने दिवसातला कुठलाही चहा ताज्या दुधाचा वाटतो. ( पण त्यामुळे घरी तुप कधीच होत नाही Sad )

वर्षे... १०० टका सच बोली तु!!! Lol

हो गं! चहा शक्यतो कच्च्या दुधाचाच करावा... मलईदार लागतो.
रच्याकने: मला चॉकलेटी चहा पण खुप आवडतो.

माझा एक नियम आहे.. जास्त हायफाय लोकांच्या घरी मी कॉफीच घेते.. चहा म्हणजे काळे पाणी असते नुसते

वर्षे ईथे प्यायला नाही करायला सांगितला

वर्षे ईथे प्यायला नाही करायला सांगितला >>> अरे इथे सांगितले म्हणजे इथे जे हाय्फाय असतील ते मला कॉफीच देतील घरी गेल्यावर Lol

आमच्याकडे तबेल्यातलं ताजं दूध येतं किंवा आणलं जातं. पुर्वी अनेकदा तबेल्यात मी उशीरा पोचलो आणि तबेल्यातलं दूध संपलं की मग एका डेअरीतून आणायचो...... चहाच्या चवीवरून आईबाबांना कळायचं की आज हा उशीरा पोचला आणि मग दुसर्‍याच डेअरीतलं दूध आणलय. त्यामुळेच घरी अजून पिशवीचं दूध नाही आणत. ताजं तबेल्यातलं दूध मस्ट. Sad

भुंग्या तबेला कश्याचा
गोठ्यातल का नाही

आता विचारतोच आहेस म्हणून सांगते.

माझी चा करायची पध्दतः
जेवढे कप हवे तेवढे पाणी घेणे. (समजा २ कप). ते उकळवणे. खाली उतरून २ चमचे आणि थोडी वर अशी चहापत्ती टाकणे (सहसा सोसायटी किंवा ताज). लगेच झाकून ठेवणे. दूध मावेमध्ये गरम करून घेणे. जरावेळाने चहा मुरला (म्हणजे चहापत्ती खाली बसली) की त्यात दूध मिसळून घुटके घेत पीणे. मी चहात साखर घालत नाही. कोणी आले तरी वेगळी साखर देते कारण किती लागेल ते समजत नाही.

कधी कधी उकळलेल्या पाण्यात चहापत्ती टाकून थोडं आणखी उकळवते. अशावेळी दीड चमचा चहा पुरतो. मग त्यातच दूध घालून आणखी जरा गरम करून चहा गाळते.

नवर्‍याची चा करण्याची पध्दत : (सकाळाच्या चहाची जबाबदारी त्याच्याकडे आहे.)
तो कधी पाणी मोजत नाही. अंदाजाने जरा जास्तच पाणी उकळत ठेवतो. मग त्यात आलं ठेचून आणि घरच्या लेमनग्रासचं एक पान बारीक कापून टाकतो. हा काढा बराच उकळवतो. मग खाली उतरून त्यात जेमतेम १ चमचा (किंवा त्याहूनही कमी) चहा टाकतो. सकाळी दूध गरमच असतं त्यामुळे जरावेळानं ते या चहा कम काढ्यात मिसळून (पण दूध किती? तर अर्धा चमचा) दोन बंपर कपातून ओततो.

मी चहा कसा करतो (मी असा करतो, माझ्या घरचे सगळे वेगळ्या पद्धतीने करतात)

५ कप चहाला- ३ कप दूध, २ कप किंवा थोडंसं जास्त (सव्वादोन कप) पाणी.
आधी से मिश्रण उकळत ठेवायचं. साखर आणि चहापूड सोडून अन्य काही (म्हणजे आलं, वेलची इ.) घालणार असू, तर ते आधी घालून थोडावेळ ते गरम करायचं. आणि आता उकळी येणार अशी परिस्थिती असताना अंदाजे थोडं आधी चहापूड घालायची. ५ कपाला- ५-५.५ चमचे चहापूड. (अगदी वस्त्रगाळ पूड असेल तर ४ चमचे पुरते.)
आम्ही डस्ट+ गोळी मिक्स आणतो. चहापूड टाकताच ते मिश्रण जरा जास्तच उकळतंय असं वाटतं क्षणभर.
अशा वेळी गॅस थोडा कमी करायचा. दुधाचा रंग हळू हळू बदलून लालसर होऊ लागला की चवीनुसार साखर घालायची. ५ कपाला प्रत्येकी १.५ चमचा या हिशोबाने ७.५ ते ८ चमचे साखर मला पुरेशी वाटते. (वेलदोडे जास्त घातले असतील तर एखादा चमचा साखर जास्त घालायची)
हे सगळं मिश्रण उकळत असताना एखादा खोलगट डाव किंवा चमच्याने ढवळायचे. चहापुडीत गोळी जास्त असेल, तर ती चहापूड डावाने चहाच्या भांड्याच्या तळाशी थोडी रगडायची (थोडीच जास्त नाही)
चहाच्या वाफेचा वास मस्त यायला लागला की गॅस बंद करून अगदी १ मिनिट (१ मिनिटही जास्त वेळ आहे) त्यावर झाकण ठेवायचं आणि चहा गाळायचा.
(या चहाबरोबर मला काहीही खायला आवडत नाही. चहाची चवच जाते बिस्किट वगैरे खाल्लं एकत्र की.)

या प्रकाराला, मी चहा ढवळत असल्याने आमच्या घरात उपहासाने, 'अमृततुल्य' चहा म्हणतात Happy

वर्षे सेम हियर...

मला रेग्युलर चहापेक्षा माझ्या आईच्या पद्धतीचा गवती चहा आणि हर्बल टी आवडतो...

आम्ही गवती चहात चहापावडर घालत नाही... गवती चहाच्या कांड्या दुधात टाकायच्या... साखर टाकायची आणि मग दुधाच्या निम्मं पाणी घालून उकळायचं... अहाहा जीव सुखावतो अगदी... Happy

वर्षे मला तो हायफाय चहापण खुप आवडतो. कॅमोमाईल टी, जास्मिन टी पण आवडतात. डिप-डिप चहा पण आवडतो. एकूणात काय, चहाच आवडतो.

न आवडणारे चहा:
१. चहाच्या नावाखाली देण्यात येणारी बासुंदी अज्जिबात आवडत नाही. जास्ती दूध आणि साखर घातली की चहा हा चहा रहात नाही. (हे माझे मत आहे. वाद नकोत. Happy ) २. तसंच चहाचा मसाला घातलेला आणि अति उकळवलेला चहा आवडत नाही.
३. उडप्याच्या हाटेलातला चहा तर अजाबात आवडत नाय. त्याला एक विशिष्ट वास येतो.

याच कारणास्तव, बाहेर कुठेही गेले तरी मी सहसा कॉफी पिणे पसंत करते.

तबेला की गोठा? तबेला घोड्यांचा असतो ना? ए.भा.प्र.

>>>

मंदार... यू टू????? अरे म्हशीचा पण तबेलाच असतो..... घोड्याची असते त्याला खरं तर "पागा" म्हणतात... तबेला नाही......... तू कॉन्व्हेंट मधे शिकलास ना रे गधड्या..... तरीच ते Angry Wink

एक कप चहा बनविण्याची गणिती कृती...

१५० मिली पाणी + १ टीस्पून चहा + २ टीस्पून साखर एकत्र घेऊन उकळत ठेवावे... बरोबर एक आल्याचा छोटा तुकडा किंवा गवती चहाची बारिक केलेली १० पाने टाकावीत... उकळल्यावर त्यात ५० मिली दूध घालावे.. सकाळचा चहा असेल तर निरसं दूध आपोआप असते.. दुपारचा असेल तर तापवलेले दूध.. त्यानुसार चहाचा रंग बदलतो बरका.. परत एकदा उकळी आली गॅस बंद करून चहा गाळून घ्यावा.. साधारण १७५ मिली चहा तयार झालेला असतो.. बरोबर टी टाईम मारी बिस्कीटाचा पुडा फोडावा आणि चवीचवीने चहा प्यावा...

पाच कप करायचा असेल तर वरील प्रमाणाला ५ ने गुणावे.. गुणाकार शक्य नसल्यास १ शून्य वाढवून २ ने भागावे.. ते ही न जमल्यास एकच आकडा ५ वेळा लिहून बेरीज करावी.. ती चुकल्यामुळे चहा बिघडल्यास त्याचा दोष चहा पावडर चांगली नाही म्हणून दुकानदाराच्या माथी मारावी...

भुंगा Lol मस्त धागा आहे!!!

चहाची चव तो करण्यावर तर अवलंबून असतेच, पण चहाच्या ब्रँडवरही ती असते हे माझे मत.... (मला रेड लेबलचा नॅचरल केअर हा चहा बाजारात आल्यापासून दुसर्‍या कुठल्याही चहाची चव आवडत नाही... त्यातल्या वनौषधींनी चहाला खुप मस्त चव लागते. आता हे वाचून कोणी रेड लेबलचा नॅचरल केअर चहा घेतला तर मला कमिशन मिळायलाच हवे हं :फिदी:)

माझी चहाची पद्धतः
साहित्यः
४ माणसांच्या चहासाठी २ कप पाणी + २ कप दुध (३.५% फॅट असलेले दुध. १.५% असेल तर फक्त दुधाचा चहा करते.)
६ चमचे साखर (दर डोकी १.५ टि स्पून)
६ चमचे चहापावडर (मला स्ट्राँग चहा आवडतो)
२ वेलच्या कुटून (वेलची पावडर आणि कुटलेल्या वेलच्यांच्या चवीत फार फरक आहे.)

कृती:
सगळे एकत्र करुन चहाला उकळी येऊ द्यावी आणि ३ मिनिटे मध्यम आचेवर चहा शिजवावा. चमच्याने मधून मधून ढवळत रहावे.

अतिशय मस्त चव लागते! Happy

भुंग्या,
'पाण'चट चहा पिऊन पिऊन असा झालायंस तर.. Proud Light 1

असो आमच्या घरी लहानपणापासूनच दुधाचा चहा पितात त्यामुळे मला ही तोच आवडतो, तु टाकलेली चहाची रेसिपी इंग्लिश आहे, मला अजिबात आवडत नाही. तसल्या चहापेक्षा प्रसिद्ध 'पाटणकर काढा' प्यायलेला बरा.. हेमावैम आहे. कृपया गरजूंनी (तसा चहा पिणार्‍यांना वरिल वक्तव्याचा राग आला असेल तर त्यांनी ):दिवा: घ्यावा.

माझी पद्धत एक कप चहासाठी..

पाऊणकप दूध, वर उरलेल्या कपाच्या भागात पाणी घेऊन एकत्रं पातेल्यात टाकणे, सव्वा दोन चमचे साखर, आणि सव्वा चमचा (गोळी) चहा, डस्ट मी वापरत नाही.
उकळवायचा, मधुन मधुन हलवायचा... दुधकट वास आल्यास, थोडं पाणि घालून पुन्हा उकळवायचा.. दुधकट वास गेलेला लगेच कळतो... उकळल्यामुळे दाटसर होतो मस्त. Happy

चहा कोणत्या दुधाचा शिवाय कोणती पावडर वापरून करताय त्यावर त्याची चव अवलंबुन असते. मी मुळची कोल्हापूरची असून मला तिथल्या गोष्टींचा उगिचच सार्थ वगैरे अभिमान नाही. पण गोकुळ दुधाची सर खरंच जगातल्या कोणत्याही दुधाला येणार नाही इतकं नक्की सांगते. तिथे आम्ही पर्टिक्यूलरली अमुक्-ढमूक पावडर वापरायचो नाही, पण निव्वळ दुध उत्तम असल्याने तिथला चहा फार सुरेख व्हायचा.. इथे आल्यावर ती चव मिळवण्यासाठी मी अजून धडपडतेय. Sad

पुण्यात आल्यावर (मला) नविन शोध लागला होता. गायिच्या दुधाचा.. हे दूध प्यायला आणि पचायला हलके पडते, पण याचा चहा अजिबात पिऊ नये.. Sad फार बोर होतो.

'पागा' वरून आठवले, पुण्यात एक शाळा आहे हुजूर पागा का काय ती.
त्या शाळेतल्या मुलींना आम्ही चिडवायचो
(कॉलेजात असताना, आमच्या कॉलेजमधल्या, पण हुजूरपागेत शिकलेल्या मुलींना. नाय तर मोठे असून लहान मुलींना चिडवता? वगैरे कैच्याकै प्रश्न येतील.
त्या मुलीही मला वाड्यात शिकणारा म्हणून चिडवायच्या. वाडा= टि.म.वि.)

असो, विषयांतराबद्दल क्षमस्व.
पण चहा म्हटलं की बरोबर खायला काही नसलं तरी मस्त गप्पा पाहिजेतच ना?

गाईच्या / म्हशीच्या दुधापेक्षाही दुधाच्या पावडरपासून जास्त चांगला चहा बनतो.

मामीच्या घराखाली खुन पडलेले बघितल्यापासुन भुंग्याला असले बेसिक प्रश्न फारच पडायला लागलेत Lol
मामे, अजुन काय वाचायला मिळणार आहे कुणास ठाऊक Lol
रच्याकने मी चहा कुठेही (टपरी, हॉटेल, घरी) पिऊ शकते.

Pages