स्वभाव

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 April, 2011 - 03:09

केव्हाची उभी होती ती...
हाताची ओंजळ अगदी घट्ट बंद करून
दोन-तीन हेलपाटे झाल्यावर...
कंटाळलेला वारा नकळत थबकला तिच्यापाशी
"काय लपवते आहेस एवढी? अगदी माझ्यापासूनही?"
"ठिणगी आहे..., नव्या क्रांतीची!
तु विझवशील एकाच फुंकरीत, म्हणून लपवतेय.......!"

तसा वारा खुदकन हसला...
"वेडीच आहेस....
अगं ठिणगी आहे ती !
तिला विझवण्याचे सामर्थ्य कुणातच नाही. "

आणि...
वार्‍याचा तर..., तो स्वभावच नाही !

विशाल

गुलमोहर: 

!

धन्स प्रगो, टायपो होती ती बदल केलाय.

कणखर, आता मुठ उघडेल, मग उघडेल म्हणुन तिच्या अवतीभोवती रेंगाळत वाहणारा समीर ती मुठ उघडायला तयार नाही म्हणून कंटाळला आणि शेवटी उत्सुकतेला आवर न घालू शकल्यामुळे थांबून कारण विचारता झाला Happy
आभार्स !!

विशाल, छानच लिहिलंय.... आवडलं
--------------------------------------------------------------------------------
१) फक्त प्रगो यांना अनुमोदन देत असं म्हणावसं वाटतं की
तिला विझवण्याचे सामर्थ्य कुणातच नाही?
यातील प्रश्नचिन्ह काढून टाकल्यास अर्थ अधिक सुस्पष्ट होईल.....

२) चौथ्या ओळीत समीर हा शब्द एकूण कवितेच्या बाजाला
तितकासा सूट होत नाही असं वाटतंय.
त्याऐवजी वारा हा साधा शब्द जास्त प्रभावी होईल असं वाटतं.
... अर्थात् तुमची संकल्पना ... तुमची इच्छा.
( सूचना आगाऊपणाच्या वाटल्यास क्षमस्व ! )

Proud