सुंदर बाग ...!!

Submitted by प्रकाश१११ on 17 April, 2011 - 11:54

एक सुंदर बाग तयार केलीय त्याने
भरपूर मेहनत नि मशागत करून
त्याच्या मनात त्याने बाग फुलवली आहे
मस्त आभाळ नि उडणारी पाखरे
कोकीळेचां आवाज
नि कधी कधी ढग
नि इंद्रधनुष्य बांधून ठेवलेय
त्याने मनाच्या आभाळात
संनइचे सूर झिरपत येतील
जेव्हा तुम्ही हलकेच पावले टाकाल तेव्हा..!!

किती प्रकारची झाडे
निरनिराळ्या सुवासाची फुले
डोलताना दिसतील झाडा झुडपावर ,
चिमुकल्या रोपावर
फुलपाखरे झुलताना दिसतील
फुले डुलताना दिसतील

एक छानसे तळे नि हिरवागार काठ
त्यात पोहणारी बदके
नि राजहंस
रंगीत पाखरांची भीरी दिसेल आभाळात विहरताना
नि थंड हवा असेल अंगावर काटा फुलवायला

पण बागेत जायला मना आहे
तिकीट काढावे लागेल
फुकट प्रवेश बंद आहे ..!
तिकीट विडोवर तिकीट मिळते
घाबरू नका
पैसा नाही मोजावा लागत येथे
एक प्रसन्न मनाचे
आनदाचे
मन शांतीचे
तृप्तीचे तिकीट घ्यावे लागेल
त्याच्या साठी पैसा नकोय
तेवढे मन द्यावे लागेल
असेल तसे मन तर जरूर या
खिडकी उघडी आहे
प्रवेश पक्का आहे .....!!

गुलमोहर: 

शेवटचा परिच्छेद चांगला आहे. विचार छान आहेत.

हे विचार आकर्षकरित्या मांडणे हे कवितेतील सौंदर्यस्थळ असते. तुमच्याच बाजारात काहीतरी विकणा-या म्हाता-याच्या कवितेतही तुम्हाला लोकांनी याबाबत सांगितल्याचं आठवतंय..

घाबरू नका
पैसा नाही मोजावा लागत येथे
एक प्रसन्न मनाचे
आनदाचे
मन शांतीचे
तृप्तीचे तिकीट घ्यावे लागेल
त्याच्या साठी पैसा नकोय
तेवढे मन द्यावे लागेल
असेल तसे मन तर जरूर या
खिडकी उघडी आहे
प्रवेश पक्का आहे .....!!

हेच खरं आहे.... Happy