सर्व मायबोलीकरांना ''महावीर जयंती''च्या शुभेच्छा.
सुमारे अडीच हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इ. स. पूर्व 599 मध्ये वैशालीच्या क्षत्रिय कुंडलपूरात पिता सिद्धार्थ आणि माता त्रिशाला यांनी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर महावीर वर्धमानाला जन्म दिला. लोक महावीरांना 'वीर', 'अतिवीर', आणि 'सन्मति' या नावानेही ओळखतात.
जैन धर्मीयांचे चोवीसावे तीर्थंकर महावीर स्वामी अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन त्याग आणि तपस्येत व्यतीत केले. ज्या युगात हिंसा, पशू हत्या, जातीभेदाचे प्रमाण वाढले होते. त्याच युगात महावीरांचा जन्म झाला होता. महावीराने आपल्या प्रवचनातून जगाला सत्य आणि अहिंसेचे धडे दिले. संपूर्ण जगाला पंचशील तत्वाचा उपदेश दिला.
या पंचशील तत्वात सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेह आणि दया यांचा समावेश होतो. त्यांनी आपल्या काही खास उपदेशातून जगाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रत्येक प्रवचनात ते सत्य आणि अहिंसेचा प्रचार करत असत.
सत्य
सत्याविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'हे मानवा! सत्य हेच खरे तत्व असून प्रत्येकाने सत्याच्या आज्ञेत राहीले पाहिजे.'
सत्यालाच खरे तत्व मानण्याचा उपदेश करून भगवान महावीर म्हणतात, की सत्याचे पालन करणारा मृत्यूसही सहजरित्या पार करू शकतो. असत्याचा त्याग करून खरे व हिताचेच बोलण्याचा ते उपदेश करतात.
ते म्हणतात की, आपल्या किवा दूसर्याच्या फायद्याकरीता खोटे बोलू नये. राग किवा भीतीच्या आहारी जाऊनही खोटे न बोलण्याचे ते आवाहन करतात. स्वतः तर खोटे बोलूच नये याशिवाय दूसर्यांनाही खोटे बोलण्यास प्रवृत्त करू नये.
सत्य जर हानीकारक असेल, दुसर्यांना दुःख पोहचत असेल, प्राण्यांची हिंसा होत असेल तर ती गोष्ट बोलणे टाळावे. भगवान महावीरांच्या मते चोरास चोर, नपुंसकास नपुंसक, रोग्यास रोगी म्हणून संबोधणे सत्य असले तरी तो योग्य नाही.
यामुळे संबंधित लोकांना दुःख पोहचते. महावीरांच्या मते पायात खिळा रूतला तर थोडा वेळच वेदना होतात. त्या खिळ्यास सहज काढणेही शक्य आहे. मात्र, टोचून बोलण्याने ह्रदयावर कायमच्या जखमा होतात.
वर्षानुवर्षे त्या मनात राहून दुःख देत असतात. यामुळे द्वेष, वैर पसरून भीती निर्माण होते. महावीरांनी सांगितल्याप्रमाणे विचारल्याशिवाय उत्तर देणे किवा दुसर्याच्या मध्ये बोलणे योग्य नाही.
अहिंसा
भूतलावर अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करू नये. त्यांच्याप्रती मनात प्रेम भावना ठेवून त्यांचे संरक्षण मानवाने करावे. अशा प्रकारचा अहिंसा संदेश भगवान महावीर आपल्या उपदेशात देत असत.
अपरिग्रह
परिग्रहाविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'जो मनुष्य सजीव आणि निर्जीव वस्तूंचा संग्रह करतो. तसेच दुसर्यांकडून संग्रह करून घेतो किंवा दुसर्याला अशा प्रकारचा संग्रह करण्यास परवानगी देतो. त्या व्यक्तीची दु:खापासून कधीच सुटका होत नाही. हाच संदेश महावीरांनी अपरिग्रहाच्या माध्यमातून जगाला देण्याचा प्रयत्न केला.'
ब्रह्मचर्य
ब्रह्मचार्य उत्तम तपस्या, नियम, ज्ञान, दर्शन, चरित्र, संयम आणि नम्रतेचे प्रतीक आहे. तपस्यात ब्रम्हचर्य सर्वश्रेष्ठ असल्याचा अमूल्य संदेश महावीरांनी दिला. जो पुरूष स्त्रीशी संबंध ठेवत नाही त्याला मोक्षप्राप्ती मिळते असे ते आपल्या संदेशात म्हणत असत.
क्षमा
क्षमा या पंचशील तत्वाविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'मी सर्व प्राणीमात्रांना क्षमा करू इच्छितो. जगातील सर्व प्राणीमात्रांबरोबर मैत्री केली पाहिजे. कुणाशीही वैर नसावे. मी अंतकरणाने धर्मात स्थिर झालो आहे. सर्व प्राणीमात्रांना मी सर्व अपराधांची क्षमा मागतो. माझ्याविरूद्ध ज्याने अपराध केला असेल त्यालाही मी माफ करू इच्छितो. माझ्या मनात आलेल्या वाईट विचारांबद्दल किंवा माझ्याकडून झालेले सर्व पापांचा नाश होऊ दे.
धर्म
धर्म सर्वात चांगला मंगळ आहे. अहिंसा, संयम आणि तप हाच खरा धर्म आहे. जे धर्मात्मा आहेत आणि त्यांच्या मनात नेहमी धर्म असतो. त्यांना ईश्वरही नमस्कार करत असल्याचे महावीर म्हणतात. भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनात धर्म, सत्य, अहिंसा, ब्रम्हाचार्य आणि अपरिग्रह दयेवर अधिक भर दिला आहे.
त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील आणि सदाचार हे त्यांच्या प्रवचाचे सार होते. त्यांनी चतुर्वेद संघाची स्थापना केली. देशातील विविध भागात फिरून त्यांनी आपल्या पवित्र संदेशाचा प्रचार आणि प्रसार केला. भगवान महावीरांनी वयाच्या 72 व्या वर्षी इ.स. पूर्व. 527 मध्ये कार्तिक कृष्ण अमावस्येला पावापुरी येथे समाधी घेतली.
अनिल मतिवडे
माहितीबद्दल धन्यवाद अनिल. मला
माहितीबद्दल धन्यवाद अनिल. मला महावीरांच्या विचारांतील सर्वात आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे क्षमा. स्वतःला क्षमा करायची, इतरांना क्षमा करायची व ज्यांना जाणते अजाणतेपणी आपण दुखावले असेल त्यांची क्षमायाचना करायची.... क्षमेसाठीही मोठे धैर्य लागते आणि मन विशाल करायला लागते. आपोआपच करुणा, अहिंसा, सत्य, अपरिग्रह त्यापाठी येतात. ''अद्वैता''त क्षमेला स्थान नाही.... कारण जर कोणी ''दुसरे'' असेल तरच क्षमा करणार ना.... जिथे एकच ब्रह्म आहे तिथे कोण कोणाला क्षमा करणार..... परंतु व्यवहारी जग द्वैताच्या पातळीवर चालते. आणि त्या पातळीवर क्षमेसारखा सुंदर अलंकार नाही.
भगवान महाविरांना आदरांजली.
भगवान महाविरांना आदरांजली.
लेख खूप छान अहे अनिलजी.
लेख खूप छान अहे अनिलजी.
चांगला विषय आणि माहिती आपण
चांगला विषय आणि माहिती आपण दिलीत.
आणि त्या पातळीवर क्षमेसारखा सुंदर अलंकार नाही.
---- क्षमा करण्याबद्दलचे तुमचे मत आवडले, पण व्यावहारी जगात किती वेळा आणि कुणाला क्षमा करायची याचे काही नियम आहेत?
छान माहिती आहे..
छान माहिती आहे..
क्षमा करण्याबद्दलचे तुमचे मत
क्षमा करण्याबद्दलचे तुमचे मत आवडले, पण व्यावहारी जगात किती वेळा आणि कुणाला क्षमा करायची याचे काही नियम आहेत? >>
उदय, जिथे ''अपराध'' आहे तिथे ''क्षमा'' आहे. संस्कृतमध्ये एक सुंदर श्लोक आहे :
करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वाऽपराधम् |
विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो ||
भावार्थ : हे महादेव, मी हात, पाय, वाणी, कृती, कान, डोळे वा मनाने केलेल्या ज्ञात - अज्ञात अपराधांना क्षमा करा. हे करुणासागर महादेवा, तुमचा जयजयकार असो.
व्यवहाराच्या नियमांप्रमाणे गुन्ह्याला किंवा अपराधाला शिक्षा आहे, परंतु त्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्यावर त्या व्यक्तीला पुन्हा सर्वसामान्य, किल्मिषरहित जीवन जगण्याचा अधिकारही आहे.
क्षमा ही मानसिक पातळीवर करण्याची गोष्ट आहे. स्वतःला आणि दुसर्यालाही.
अरुंधती,पाषाणभेद,उदय्,भ्रमर,म
अरुंधती,पाषाणभेद,उदय्,भ्रमर,मी मुक्ता

सर्वांचे आभार !
अरुंधती,

क्षमा करण्याबद्दलचे तुमचे विचार खरंच परफेक्ट वाटले !
मस्त लिहले... :स्मितः
मस्त लिहले... :स्मितः