ओरिगामी प्रदर्शनातील काही मॉडेल्स

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 16 April, 2011 - 04:24

पुण्यात ओरिगामीचं प्रदर्शन लागलं होतं - डॉ. जोशी ह्यांच्या कलाकृतींचे. त्यातील काही मॉडेल्स -

हत्ती

बॉक्स

प्रचि३

गणपती

प्रचि५

दिपमाळ

३ माकडं

प्रचि८

प्रचि९

प्रचि१०

प्रचि११

पर्स

प्रचि१३

प्रचि१४

प्रचि१५

प्रचि१६

प्रचि१७

प्रचि१८

प्रचि१९

प्रचि२०

प्रचि२१

प्रचि२२

प्रचि२३

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

थँक्स फॉर शेअरिंग प्राजक्ता.
मी मुलीलाही दाखवले. काही काही फारच सुरेख आहेत.

छान , आवडली सगळीच मॉडेल्स,
लहानपणी ते कागदांचे बेडुक , चेंडु , होडी बनवायचो ते पण ह्याच प्रकारात मोडतं का ?

झक्कासच!!! खासकरुन प्रचि १६, १७ मस्त बनवलेत ते ओरिगामी...

एक सहजच प्रश्न, काहीकाही ओरिगामीवर (# ८, #९) मुदामहुन त्यांचा स्पष्टीकरण लिहिलय का, कि लोकांना समजाव नक्की काय बनवायचा प्रयत्न केलाय Happy

सॉल्लीड! १०,१६, १७ आणि १८ बनवायला कसला पेशन्स लागला असेल. धन्स इथे प्रचि टाकल्याबद्दल!

मस्त Happy

टिळक स्मारकला लागलं होतं का प्रदर्शन? दोन वर्षांपूर्वी मी देवल सरांकडे ओरिगामी ची मॉडेल्स बनवून घेऊन जायचे तिथलेच जोशी असतील हे.
हे माझे झब्बू-
हंस-
hans.jpg
मायकल लाफोसचं फुलपाखरु- अशी अनेक प्रकारची/जातीची बनवता येतात.
Picture 102.jpg
मी दोन वर्षापूर्वी पुण्यात शिकायला होते तेव्हा माझ्या हॉस्टेलच्या खोलीची भिंत मी काहीशा अशा प्रकारे सजवली होती. ओरिगामीचीच फुलपाखरं आहेत ती.
Picture 104.jpg

@ मणिकर्णिका , नाही बालगंधर्वला लागलं होतं. हंस अप्रतिम झालायं, नुकतचं प्रदर्शन पाहील्यामुळे मी नेटवर शोधून मॉडेल्स बनवायला सुरू केलयं, एका शिबिरात लहान मुलांना १-२ मॉडेल्स शिकवायचा विचार आहे.

प्राजक्ता...
मी शेवटच्या दिवशी गेलेलो प्रदर्शन बघायला...

सहभागि झालेल्या मुलांच्या वयाचा अंदाज केला तर, सादर केलेल्या कलाकृती खरोखरच अप्रतिम होत्या... बर्‍याच कलाकृति 'रिपीट' झालेल्या दिसत होत्या... प्रचि ०३, १०, १६, १७, १८ वगळता ईतर कलाकृती मधे जो 'फिनेस' अपेक्षीत होता त्याची कमतरता जाणवत होती.. पण त्यामुळे कलाकृतीचे महत्व किंवा कलाकाराच्या प्रयत्नाना कमीपणा येत नव्हता... फक्त प्रकर्षाने जाणवलेली एकच गोष्ट - वर्तमान पत्रातल्या बातमीत श्री. जोशींच्या ज्या काही कलाकृति जाहीर केलेल्या होत्या, त्यातल्या बर्‍याच कलाकृती प्रदर्शनात नव्हत्या... त्यामुळे थोडा विरस झाला...

साधारण पणे दोन-अडीच वर्षां पूर्वी 'टिळक स्मारक' मधे ओरीगामी कलाकृतींचे प्रदर्शन भरवलेले होते, पण त्यामधे श्री. अनील अवचट, श्रीमती इंदुमती टिळक ... यां सारख्या दिग्ग्ज ओरिगामि कलाकारांनी भाग घेतलेला होता... त्याची पुन: एकदा आठवण झाली... असो...

एक वेगळिच कला 'मायबोलि'वर सादर केल्याबद्दल धन्यवाद...