शब्दकोडे

Submitted by sudarshankulthe on 16 April, 2011 - 04:04

आज कुठल्याही वर्तमानपत्रात शब्दकोडे असतेच. किंबहूना शब्दकोडे हा वृत्तपत्रांचा अविभाज्य घटकच आहे असं म्हणायला हरकत नाही. वर्तमानपत्रांतून शब्दकोड्यांचा कॉलम हा ठरलेलाच आहे. तसा परस्परांचा संबंध फार घनिष्ठ आहे.

जगातलं सर्वांत पहिलं शब्दकोडं बनविलं ते ‘ऑर्थर वेन्नी’ यांनी. ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’ या वृत्तपत्रात रविवार, २१ डिसेंबर १९०३ रोजी ते पहिलं कोडं छापलं गेलं. ख्रिसमसच्या सणानिमित्त छापल्या जाणार्‍या विषेश पुरवणीत काहीतरी नविन छापावं असं त्यांना वाटलं आणि त्यातून त्यांनी ‘वर्ड क्रॉस प

झल’ असं नांव देऊन ते तयार केलं. डायमंड आकार असलेल्या चौकटीच्या रचनेतून त्यांनी शब्दांची जुळवाजुळव केली होती. लोकांना हे पझल (कोडं) फारच आवडलं. त्यातच काहीसे बदल होऊन आज आपण सोडवतो ते ‘क्रॉसवर्ड’ म्हणजेच ‘शब्दकोडे’ जगासमोर आले. झपाट्याने त्याचा प्रचार आणि विस्तारही झाला. ‘क्रॉसवर्ड’ हा प्रकार एवढा लोकप्रिय झाला की, जगातल्या प्रत्येक देशात आणि प्रत्येक भाषेत ‘क्रॉसवर्ड’ बनू लागले. विषेश म्हणजे जगभरातली लोकं आपापल्या भाषेतल्या ‘क्रॉसवर्ड’शी कायमचीच जोडली गेली. संपुर्ण जगात सर्वांत वेगाने जर कुठली साहित्यकृति पसरली, विस्तारली, लोकप्रिय झाली आणि अजूनही तशीच टिकून आहे ती म्हणजे ‘क्रॉसवर्ड’ म्हणजेच ‘शब्द

कोडे’ असं म्हणणं वावगं ठरणार नाही. शब्दकोड्याने जगभरातल्या आपापल्या प्रत्येक स्वतंत्र साहित्य क्षेत्राचा कायमचाच कब्जा जमविला.

फक्त मराठीच नाही अनेक भाषांमधली वृत्तपत्रं देखिल त्या भाषांमधून शब्दकोडी प्रसिद्ध करत असतात. जगाच्या पाठीवरील क्वचितच काही वर्तमान पत्रं सोडली तर प्रत्येक देशातील तसेच प्रत्येक भाषेतील वृत्तपत्रांत शब्दकोडी सापडतात. बरीच अशी वृत्तपत्रं आहेत की ती फक्त

शब्दकोड्यांमूळेच प्रसिद्ध झालेली अढळतात. रंजक अशी शब्दकोडी छापून आणल्यामूळे त्या वृत्तपत्राचा खप वाढल्याचेही लक्षात आलेले आहे. फक्त शब्दकोड्यांचीच (बातम्या नसलेली) वर्तमानपत्रं असल्याचेही बघायला मिळते.

फक्त ‘टाईमपास’ म्हणून नसून शब्दकोड्यांत बरंच काही दडलेलं आहे. शब्दकोडी ही बुद्धीला खुराक आणि चालना देण्यासाठी उपयुक्त ठरतात. आपल्याच मातृभाषेतले अनेक शब्दच आपल्याला माहिती नसतात. म्हणजे वापरातल्या शब्दांच्या व्यतिरिक्तचे अनेक शब्द आपल्यापासून लपलेले असतात. शब्दकोडी अशा शब्दांना उजाळा देतात. आपल्या जवळचा शब्दसाठा अधिक समृद्ध होतो.

विद्यार्थी, नोकरी करणारे, स्वत:चा व्यवसाय असणारे, गृहिणी, भाषेचे अभ्यासक आणि अगदी चहाच्या टपरीच्या वर्गातील लोक सुद्धा शब्दकोडी सोडवितांना दिसतात. शब्दकोडे सोडविणं हे एक प्रकारचं बुद्धीला हवं असणारे व्यसनच आहे असं म्हणायला हवं. किंबहूना ते प्रत्येकाला असावंच कारण ते उपयुक्त असतं.

बुद्धांक वाढावा म्हणून ‘शब्दकोडी सोडवत जा’ असा सल्ला काही जेष्ठ मंडळी देत असतात. शब्दकोडी सोडविणं हे चांगल्या दर्जाचं कार्य समजलं जातं. शब्दकोड्याचा नाद फार वाईट, त्याच्या मार्गाला कुणी जाऊ नये असं कोणी म्हणत नाही.

जगाचा सगळा व्यवहार हा (भाषा कुठलीही असो तरी) शब्दांवरच चालू असतो. लेखक, वक्ते, धर्मोपदेशक, शिक्षक ही मंडळी शब्द घेऊनच व्यवहारयात्रेला निघतात. नियमित शब्दकोडी सोडविल्याने शब्दसंपत्ती वाढते. काही लोकांना वाटते की, ‘ही (ज्या भाषेतलं शब्दकोडं असेल ती) तर आमची मातृभाषाच असल्याने ती शिकण्यासाठी किंवा शब्द साठा जमविण्यासाठी आम्हाला शब्दकोड्याची गरज काय?’ पण जेव्हा आपण शब्दकोडं सोडवितो आणि ते आपल्याला पुर्णत: कधी कधी सुटत नाही तेव्हा आपल्याच मातृभाषेचा आपला अभ्यास किती हे आपल्याला लक्षात येतं.

शब्दकोषात असलेले अनेक शब्द एक ना एक दिवस संपतील आणि मग शब्दकोड्यांमध्ये तोच तोच पणा येईल असंही काही जणांना वाटू शकतं. फक्त शब्दकोषांमध्ये आहे तेवढीच आपली भाषा आहे का? असाही विचार आपण केला पाहिजे. तसं असतं तर जास्तीत जास्त शब्द ज्या शब्दकोषात आहे तो घेऊन फिरलो की झालं आणि मिळवलं त्या भाषेवर प्रभुत्त्व ! असं होत नाही. शब्दांकडे बारकाईने पाहिलं तर आपल्याच लक्षात येईल की आपल्या कितीतरी पिढ्या उलटून जातील पण शब्दांचा अखंड प्रवाह, त्यांचा प्रवास, त्यांची निर्मिती कधीही न संपणारी आहे.

काळानुसार भाषेतही बदल होत जातात. शब्द बदलत असतात. त्यांचे अर्थ, त्यांचा वापरही कालापरत्वे बदलत जातो. इतर भाषांमधील शब्दही परस्परांमध्ये मिसळले जाऊन त्या भाषेचे मुळ शब्द असल्यासारखेच वाटू लागतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता शब्दांचंच कोडं सोडविणं हे आपल्या भाषेचं ज्ञान वाढवण्याच्या दृष्टीने नक्कीच फायद्याचं ठरतं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: