काही जखमा उरल्या होत्या

Submitted by किरण कुमार on 15 April, 2011 - 05:59

काही जखमा भरल्या होत्या
काही जखमा उरल्या होत्या
उरल्या जखमा मात्र सा-या
आयुष्याला पुरल्या होत्या....

जखमा द्याव्या कशा कुणी
याही गोष्टी ठरल्या होत्या
जिंकून सार जगं देखील
तूझ्यापुढे का हरल्या होत्या....

एका हाकेच्या प्रतिक्षेतच
नजरा या झूरल्या होत्या
तू गेलीस तिथेच मग मी
आठवणीही पुरल्या होत्या.....

- किरण कुमार

गुलमोहर: 

मूड असलेली कविता!

जखमा द्याव्या कशा कुणी
याही गोष्टी ठरल्या होत्या>> मस्तच!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

किरणकुमार,
खरंतरं इथे मी अजून एखादी आपल्या स्टाईल ची कविता पोस्टली असेल म्हणून आलेलो, आणि प्रतिसाद पाहण्यास.. Proud
घोर निराशा केलीत.. पण चांगल्या प्रकारे..
उत्तम कविता.. आवडली.. Happy

मला खूप आवडली.. Happy
किकु तुम्ही कधी कधी अगदी मार्मिक लिहून जाता.. Happy

पुलेशु!!

(बाकी ही कविता डोके लावून लिहिलीत ना? Happy छान जमलिये)

आभार मित्रांनो, बेफिकीर,ऑर्फि,आर्या.
(दक्षिणा -अहो डोक देवानं दिलय तर लावलच पाहिजे)
निवडूंग -आपली निराशा ऐकून वाईट वाटल लवकरच आपली अपेक्षा पुर्ण करु