Submitted by पल्ली on 15 April, 2011 - 02:32
निरोप घेऊ नकोस माझा
तु मला फसवून जा.
श्वास श्वासातुनी गुंतला
तो जरा उसवून जा.
वाहत्या त्या निर्झरांची
धार तु बुजवून जा.
अन उपाशी पाखरांना
ठार तु मारुन जा.
ओ़ंजळीतल्या मोगर्याला
क्रूर तु उधळून जा.
आठवांचे मोरपीस ते
मातीत तु गाडून जा.
रात्रीचे चांदणे उशाला
तु तसा विझवून जा.
जमेल का तुज असा कुस्करा?
हाय तु सांगून जा.
मी अजूनी नादात गाते
सूर तु मिटवून जा.
विष कि अमृत प्याला
तु मला देऊन जा...
गुलमोहर:
शेअर करा
येस, धिस इज इट !
येस, धिस इज इट !
सही..... खूप आवडली
सही..... खूप आवडली
मला एक सुरेख मराठी गझल
मला एक सुरेख मराठी गझल आठवली.
पाहीजे आहे तसे मज तू चूकवून जा.
छान... कदाचित मस्त गझलपण होईल
छान... कदाचित मस्त गझलपण होईल याची. नाही का?
ओ़ंजळीतल्या मोगर्याला क्रूर
ओ़ंजळीतल्या मोगर्याला
क्रूर तु उधळून जा.
खासच ग पल्ली! खूप खूप आवडली!
विशाला, आभारी चिमुरी येस
विशाला,




आभारी चिमुरी
येस गोजिरी
मी मुक्ता... गजल?? बाप रे
क्रांती......
पल्ले, मस्तय कविता, फक्त
पल्ले, मस्तय कविता, फक्त कुस्कराच्याऐवेजी काही बदलता आल तर बघ..:)
व्वा !
व्वा !
तुझी भावना/विचार अगदी स्पष्ट
तुझी भावना/विचार अगदी स्पष्ट आणि प्रभावीपणे पोहोचविणारी उत्तम कविता!!!
क्या बात है.. वेगळीच !!
क्या बात है.. वेगळीच !!
ठांकु
ठांकु