Submitted by शुभांगी. on 14 April, 2011 - 06:22
वळीवाची चाहुल,
तो जीवघेणा उकाडा,
गाडीच्या टपावरचा तो आवाज
आणि गारांचा आभास
खिडकीतून मारा करणारे ते टपोरे थेंब
जशी बेसावध क्षणी तू मारलेली मिठी
कधीतरी मागुन येवुन अलगद्पणे गळ्यात टाकलेले हात
मुलगी असुन कसा ग पाऊस नाही आवडत तुला
म्हणुन उगाचच हाताला धरुन तुझं ते बाहेर ओढणं
खर सांगु तुझ्यासारख नाही रे जमल कधी
पावसाच्या धारात डोळ्यातल्या पाण्याची सरमिसळ करायला
मला बरसायलाच आवडल संततधारेसारख
तू मात्र त्या वळीवत सुद्धा मिसळुन गेलास
मला मृदगंधाचा ध्यास लावुन
गुलमोहर:
शेअर करा
खर सांगु तुझ्यासारख नाही रे
खर सांगु तुझ्यासारख नाही रे जमल कधी
पावसाच्या धारात डोळ्यातल्या पाण्याची सरमिसळ करायला
मला बरसायलाच आवडल संततधारेसारख
तू मात्र त्या वळीवत सुद्धा मिसळुन गेलास
मला मृदगंधाचा ध्यास लावुन
छान. आवडली मनापासून ..!!
खर सांगु तुझ्यासारख नाही रे
खर सांगु तुझ्यासारख नाही रे जमल कधी
पावसाच्या धारात डोळ्यातल्या पाण्याची सरमिसळ करायला
तू मात्र त्या वळीवत सुद्धा मिसळुन गेलास
मला मृदगंधाचा ध्यास लावुन>>> क्या बात है!!!
मस्तच
मस्तच
सुरेख गुब्बे आवडेश.........
सुरेख गुब्बे
आवडेश.........