रंगीबेरंगी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बराच मोठा ब्रेक घेतलाय ना मी ?
अजून थोडे दिवस, मग येतोच इथे.

dipakali.jpg

विषय: 
प्रकार: 

नाव काय ह्या फुलाचं? मी इकेबानामध्ये ह्याची अरेंजमेंट केली होती.

खरंच खुप मोठा ब्रेक घेतलात तुम्ही.....
नंतर कळलं कुठे गडप झालात ते, आश्चर्यच वाटले आणि आनंदही, आता पर्यंत काही ओळखीची/काही ओळख आहे बहुतेक असे वाटणारी फुले/झाडे पाहिली, आता अगदी अनोळखी झाडांशी भेट होईल आमची.

लवकर दाखल व्हा, नवीन खजीना घेऊन..
वरिल फुल कोणते? केळफुलाच्या फुलाशी साधर्म्य आहे असे मला वाटले बघुन तरी..

साधना.

हे फूल केळी कर्दळीच्या कूळातले असले तरी, आपल्याकडे नविन आहे. एका प्रदर्शनात मी याचे नाव, "दीपज्योति" असे वाचले होते. अगदी समर्पक नाव आहे.
खरे तर हे फूल नाही, हा आहे पुष्पकोश. या कुळाची हिच तर खासियत आहे.
या केशरी "पाकळ्या" च्या आत एक कामचलाऊ फूल असते.

दिनेश, काय सुंदर आहे दीपज्योती! डोळे दिपलेत बघून! तो गुलाबी रंग आणि केशरी रंग अगदी ठासून मनात भरला. इथे सिंगापूरमधे हा पुष्पकोश आहे पण हा गुलाबी रंग मी कधीच त्यात पाहिला नाही.

व्वा ! फारच सुन्दर आहे ! फुल आणि फोटो ही .

अजुन पत्ता नाही तुमचा....................

साधना

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

अजुन पत्ता नाही तुमचा....................

साधना

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

dineshda whr r u? kiti divas zale tumacha kahich pattach nahiye. ya na lavkar navin rangiberangi mahiti ghevun. mast ranphula pulali aahet sagalikade, tumhich savistar mahiti devu shakal.so plz com soon, waiting 4 ur posts.

अश्विनि
दिनेश सर मि अश्विनि इचिबान मधुन
कसे आहात? तुम्हाला खुप मिस करते. फुल फारच छान आहे, आणि त्याचि माहिति पण.

दिनेशदा, कुठे गेलात? तुमचे लिखाण मिस करतोय आम्ही सगळेच जण. लवकर लवकर या ना............ Happy

दिनेश,

दीपज्योती सुंदर.. ! अलिकडे मायबोलीवर फार येणं झालं नव्हतं.. काल अनेक दिवसांनी आले.. आणि जिथे थोडीफार फिरले तिथे कुठेच तुम्ही दिसला नाहीत.. काय प्रकार आहे कळेना.. आज शोधत शोधत इथे येऊन पोहोचले.. कुठे गायब झाला आहात ? आणि पुन्हा आगमन कधी ?