माझ्या मनातला चंद्र.....

Submitted by रोहित ..एक मावळा on 13 April, 2011 - 04:56

निघालोय एकटाच...
प्रकाशाच्या शोधात...
भेटेल का कुठे आशेचा किरण...
या काळोख्या जगात....

हरवुन तर जाणार नाही ना...
असा प्रश्न पडे मनात.....
पण लुकलुकत्या चांदण्यांची ....
साथ आहे ना डोळ्यात...

आयुष्याची ही नौका...
वादळात करेल का घात...
पण माझ्या मनातला चंद्र ...
नक्किच करेल त्यावर मात.....

-रोहित ..एक मावळा
गुलमोहर: 

पहिल प्रयत्न असेल तर मस्तच सुरुवात .. !!!

एक छोटीशी गोष्ट : जर चंद्र त्या दिशेला असेल तर होडीच्या ह्या दिशेला सावली असेल ...अंधार असेल ....इथे प्रकाश दाखवला आहेस ...तेव्हढे खटकले .
.
पण प्रयत्न मस्त

धन्यवाद लोक्स..
यो... >> हो हळुहळु शिकतोय रे.... Happy
तुझ्या "मनातला चंद्र" आला, आता "चांदणी" येऊ दे >> जिप्स्या ती पण नक्की येईल. Happy

प्रगो प्रतिसादाबद्दल धन्यवाद... थोडासा बदल केलाय... Happy

आणखीन एक टेक्नीकल सुधारणा : पौर्णिमेला पुर्णचंद्र असताना आसपास चांदण्या दिसणार नाहीत Proud

( मला वाटतय ...पुढच्या ट्रेक मधे रोहित मला टेक्नीकल मार देणार Biggrin )

पौर्णिमेला पुर्णचंद्र असताना आसपास चांदण्या दिसणार नाहीत >> हो प्रगो ते मला माहित आहे.
पण म्हणून तर म्हंटलय माझ्या मनातला चंद्र... Happy